GeM वर नोंदणी करून सरकारला आपले ग्राहक करा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


हो, बरोबर वाचलंत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भारत सरकारने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस अर्थात जेम (GeM) हे सामान्य वापरातील वस्तू आणि सेवांच्या ऑनलाईन विक्रीला सुलभ करण्यासाठी एक-थांबा ऑनलाईन व्यासपीठ उभे केले आहे. फरक इतकाच आहे की, येथे तुमचा ग्राहक हा थेट सरकार असेल म्हणजेच वेगवेगळे सरकारी विभाग, संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने यांना लागणारी उत्पादने सरकार जेमच्या माध्यमातून तुमच्याकडून खरेदी करते.

अर्थातच ‘जेम’ हे MSME उद्योगांसाठी त्यांच्या उत्पादनांची विक्री सुनिश्चित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. यासोबत सार्वजनिक क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शीपणा, कार्यक्षमता आणि वेग वाढवण्यातही सहाय्यक आहे. एकूणच कोरोनामुळे दळणवळण ठप्प झालेले असताना जेमवर नोंदणी केल्यामुळे उद्योगांना आपला खर्च भागवण्यास मदत होऊ शकेल.

GeM मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बोली लावण्यासाठी, reverse auction साठी, demand aggregation साठी अशी साधने उपलब्ध केली आहेत, ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अख्यत्यारितील विभागांना पैशाचे योग्य मूल्य मिळवण्यास सहाय्य होते. अर्थ मंत्रालयाने GeM मार्फत खरेदी अधिकृत आणि अनिवार्य केली आहे.

GeM वरील विक्रीमध्ये उद्योगांना खालील लाभ होतात :

१. उद्योगांना सरकारी विभाग आज सार्वजनिक क्षेत्रातील अस्थापनांच्या व्यवहारांत थेट प्रवेश मिळतो.

२. भारतामध्ये कुठेही विक्री करता येते.

३. आपल्या उत्पादनाच्या प्रकारातील लिलावात सहभागी होण्यासाठी स्वयंचलित सूचना मिळतात.

४. सातत्याने चालू असणाऱ्या खरेदीच्या प्रक्रिया

याशिवाय प्रसंगानुरूप वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार GeMचा उपयोग करते. उदाहरणार्थ, सध्याच्या कोरोनाच्या संकटात सरकारी कामांमध्ये वैद्यकीय उत्पादने(व्हेंटिलेटर, अल्कोहोलपासून बनवलेली सॅनिटायजर, चेहऱ्यासाठी आच्छादने, N95 मास्क), ऑफिस स्टेशनरी(संगणक, प्रिंटर, टेबल्स) आणि स्वछता उत्पादने(रुग्णालयात वापरली जाणारी सॅनिटायजर, साबण, हँडवॉश, फ्लोअर क्लिनर) यांची गरज वाढली आहे.

तर मग आजच आपला उद्योग GeM वर नोंदवा :

https://mkp.gem.gov.in/registration/signup#!/seller

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?