ध्येय असावं SMART!
उद्योगोपयोगी

ध्येय असावं SMART!

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

कोणताही व्यवसाय करताना एका उद्योजकाला छोटी-मोठी टार्गेट्स ठरवावी लागतात. ती आपण कधी घाईघाईत किंवा फार विचार न करता ठरवतो आणि त्यांचा दूरगामी परिणाम आपल्याला सहन करावा लागतो.

आपले ध्येय जर SMART असेल तर ते गाठणे अधिक सोपे जाते.

S – स्पेसिफिक (Specific)
M – मेजरेबल (Measurable)
A – अटेनेबल (Attainable)
R – रीलेवंट (Relevant)
T – टाइम बाउंड (Time-bound)

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त रु. १२५ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imjo.in/pQERqq


S – स्पेसिफिक (Specific)

आपण ठरवत असलेले ध्येय हे सरळ आणि स्पष्ट असायला हवे. जर त्यातच गुंतागुंत असेल तर आपल्याबरोबर आपले कर्मचारी सुद्धा गोंधळतील आणि काम योग्य रीतीने होण्या ऐवजी आणखी वाढेल. उदा. समजा आपला खाद्यपदार्थ बनविण्याचा व्यवसाय आहे तर आपल्या पदार्थांची गुणवत्ता वाढवायची असे ठरविण्या ऐवजी आणखी कशाप्रकारे त्यांना उत्तम चव येईल, कमीत कमी केमिकल्स कशी वापरावी लागतील अशी स्पष्ट ध्येये ठरवली तर त्यांचा जास्त फायदा होईल.

M – मेजरेबल (Measurable)

आपण जे ध्येय ठरवत आहोत टे ढोबळ पाने ण ठरवता मोजता येण्यासारखे ठरवावे. त्यामुळे आपल्याला ते गाठणे अधिक सोपे जाते. उदा. यावर्षी नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढवायचा असे न ठरविता गेल्यावर्षी १ लाख रुपये नफा झाला होता तर यावर्षी त्याच्या वीस टक्के अधिक म्हणजेच १.२० लाख रुपयांचा नफा कमवायचा. याप्रमाणे दर महिन्याला कमीत कमी १० हजार रुपये नफा कमवायचे ध्येय आपण ठेऊ शकतो. (इतर गोष्टी जसे मागणी, पुरवठा, इ. येथे नियमित असेल असे मानले आहे)

A – अटेनेबल (Attainable)

आपले ध्येय हे नेहमी आपल्या उद्योगाच्या कुवतीनुसार ठरवायला हवे. वास्तव्याशी टे कायम जोडलेले हवे. नाहीतर आपण सध्या गाठूच शकत नाही अशा ध्येयासाठी अती वेळ आणि पैसा खर्च करून बसतो आणि शेवटी अपयश येते. उदा. आतापर्यंत आपण फक्त मुंबई मध्ये आपले उत्पादन विकत आहोत आणि पुढच्या वर्षीचे ध्येय ठरविताना ‘संपूर्ण देशात आपले उत्पादन पोचविणे’ असे ध्येय ठरविले तर आता चालू आहे ते काम सुद्धा नीट होणार नाही आणि सर्वच गोंधळ उडेल.

‘RozDhan’ द्वारे पैसे कमवा रोज रोज!

R – रीलेवंट (Relevant)

काही वेळा आपण ध्येय ठरविताना केवळ एकाच गोष्टीचा विचार करतो किवा काही महत्वाच्या बाबी विसरून जातो. त्यावेळी ते ध्येय प्रत्यक्षात येत नाही आणि आपले पैसे तर जातातच शिवाय वेळ आणि कष्ट सुद्धा निष्फळ ठरतात. उदा. आपल्या जाहिरातीचे टार्गेट ठरविताना जर आपण फक्त ही जाहिरात किती स्वस्तात होईल हा विचार करून फेसबुक वरून पेड जाहिरात केली, फक्त १००० रुपयांत २०००० लोकांपर्यंत आपण पोहोचू! परंतु आपले उत्पादन ग्रामीण भागासाठी अनुरूप आहे आणि तिथे फेसबुक काय साधी वीज सुद्धा पुरात नाही, तर या ध्येयाचा काहीच उपयोग नाही.

T – टाइम बाउंड (Time-bound)

आपले ध्येय ठरविताना वरील सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. परंतु जर आपण ध्येय वेळेच्या बंधनात नाही बांधले तर ते अयशस्वी ठरण्याची प्रचंड शक्यता असते. त्यामुळे ठराविक काळातच आपले ध्येय कसे पूर्ण होईल यावर लक्ष ठेवणे महत्वाचे असते. उदा. आपल्याला आता जो नफा मिळत आहे तो दुप्पट करायचा असे आपण ठरविले. परंतु हा नफा याच वर्षात दुप्पट करायचा, २ वर्षात की ४ वर्षांत दुप्पट करायचा हेच जर ठरले नसेल तर त्या ध्येयाला काहीच अर्थ उरणार नाही. आपले प्रत्येक ध्येय जर SMART केले आणि मोठ्या ध्येयांचे छोटे छोटे विभाजन करत गेलो तर नक्कीच आपल्याला जी उंची गाठायची आहे ती गाठणे सोपे होईल.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojaknewsletter