Advertisement
प्रासंगिक

कोरोनाकाळात झालेले नुकसान कसे भरून काढावे? हे सांगणारे मोफत प्लेबुक गुगल करणार प्रकाशित!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एखाद्या सामान्य स्टार्टअप सारखीच ‘गुगल’ची स्थापना झाली होती. व त्यामुळे एखाद्या आपत्तीमुळे स्टार्टअप्सना किती भयंकर परिणाम भोगावे लागतात हे गुगलला ठाऊक आहे.

आता ओढवलेल्या कोविड-१९ मुळे भारतीय स्टार्टअप्सना अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. व्यवसाय बंद असण्यापासून ग्राहकांच्या खरेदीत बदलांपर्यंत अनेक कारणांमुळे भारतीय स्टार्टअप्स समोर व्यवसाय सुरू ठेवावा का बंद करून टाकावा इथपर्यंत विचार करण्याची वेळ आली आहे.

स्टार्टअप्सना या संकटावर मात करता यावी यासाठी गुगल एक प्लेबुक प्रकाशित करत आहे. प्लेबुक म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीस, युक्त्या, विविध सिद्धांत ज्यात दिले असतात असे पुस्तक. गुगल मार्फत प्रकाशित होणारे हे प्लेबुक सर्वांसाठी मोफत असणार आहे.

गुगल सोबत ब्लूम व्हेंचर्स, प्राईम व्हेंचर पार्टनर्स, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया, व्यासा ऍप आणि डंझो या कंपन्यांच्या भागीदारीत हे प्लेबुक प्रकाशित होत आहे.

आलेल्या संकटाचे विवेचन करण्यापासून उद्योजक नुकसान भरून काढण्यासाठी व व्यवसायाला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणत्या गोष्टी करू शकतात हे या प्लेबुकमध्ये दिले आहे. विशेष म्हणजे व्यासा ऍप आणि डंझो या व्यवसायांनी कोरोना काळात सुद्धा व्यवसायाचे कसे नुकसान होऊ दिले नाही व त्यांनी कशाप्रकारे व्यवसाय चालविला याचे सविस्तर उदाहरण सुद्धा या प्लेबुक मध्ये दिले आहे.

या प्लेबुकचा भारतीय उद्योजकांना नक्कीच फायदा होईल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

– शैवाली बर्वे 
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!