कलेची आवड असलेल्यांसाठी ग्राफिक डिझाइनिंग


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा असा हा ग्राफिक डिझायनिंग व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरातून सुरू करता येऊ शकतो, तसेच याचे काम ऑनलाईनसुद्धा करता येते. आपल्याला कलेची आवड असेल. चित्र काढण्यात तुम्ही रमत असाल, रेखीव काम करणे ही तुमची खासियत असेल तर नक्कीच तुम्ही एक चांगले ग्राफिक डिझाईनर होऊ शकता. हा व्यवसाय तुमच्याचसाठी आहे समजा.

आजच्या काळात अनेक सोफ्टवेअर उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने लोगो, लेटरहेड्स, ब्रोशर, उत्पादन पॅकेजिंग, कॅटलॉग तयार करू शकता. हा उद्योग सुरू करताना एक कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, फॅक्स, इंटरनेट, मोबाइल आणि काही आवश्यक सॉफ्टवेअर यांची आवश्यकता असते. प्रत्येक व्यावसायिकाला जो व्यवसाय सुरू करू इच्छितो अथवा व्यवसाय करतोय तो प्रत्येकजण ग्राफीक डिझायनरचा संभाव्य ग्राहक आहे.

या प्रत्येकाला अशा विविध सेवांची गरज असते त्यांच्या या व्यावसायिक गरजा पूर्ण करणे हे ग्राफिक डिझाईनर व्यवसायाचे काम आहे. ग्राफिक डिझाइनर स्वतंत्ररित्या काम करतात, कॉर्पोरेट ग्राहक, जाहिरात संस्था, जनसंपर्क कंपन्या आणि प्रकाशकांसाठी साहित्य तयार करतात.

याशिवाय प्रत्येक व्यावसायिक ज्याला आपला ब्रँड प्रस्थापित करायचा आहे त्यांच्यासाठी सेवा दिली जाते. ग्राफिक डिझाईनरचे काम केवळ डिझाईन करणे एवढेच नसते तर कंपनीची ओळख तयार करणे आणि त्यांची प्रसिद्धी करणे यासाठी आवश्यक गोष्टींची निर्मिती करणे हे आहे. अनेक वेळा ओळख निर्माण करण्याबरोबरच ओळख बदलणे किंवा विज्युअल सॉल्युशनसुद्धा ग्राफीक डिझायनर देतात.

या व्यवसायात वेळेला खूप महत्त्व आहे. कमीत कमी वेळेत चांगले काम देणे आवश्यक आहे. यासाठी चांगली कलेची जाण, रेखांकन आणि आपल्याकडे ऐकण्याची चांगली कौशल्येदेखील आवश्यक आहेत जेणेकरून आपल्या ग्राहकांना काय हवे आहे हे समजून त्यांना जे हवे ते त्यांच्या उत्पादन विक्रीस मदत करेल अशी सेवा देणे. हे काम पूर्ण वेळ तसेच अर्ध वेळसुद्धा केले जाऊ शकते आणि मुख्य म्हणजे घरातूनसुद्धा केले जाऊ शकते.

उद्योग करू इच्छिणार्‍या किंवा कोणता व्यवसाय करू असे प्रश्‍न असलेल्या प्रत्येकासाठी अथवा एखाद्याला अर्ध वेळ काम करण्याची इच्छा असेल, पार्ट टाइम अथवा जोडधंद्याच्या शोधात असेल त्या प्रत्येकासाठी चांगला पर्याय आहे. कमीत कमी गुंतवणूकीत सुरुवातही नक्कीच करता येईल आणि आपला कलसुद्धा समजून घेता येईल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?