स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
तुमच्या आसपास राहणाऱ्या अनेक घरांमध्ये लागणाऱ्या अनेक वस्तू स्वतः घाऊक विकत आणून त्यांना किरकोळ विकणे, हा मोठा व्यवसाय आहेत. त्यामध्ये, महिन्यातून एकदाच प्रत्येक घरात लागणाऱ्या वस्तू पुरवणे हा कामाचा प्रकार आहे.
ह्यामध्ये फक्त महिन्याचे लागणाऱ्या वस्तूंची यादी करून, ती खरेदी करून, त्या त्या घरात ती पुरवणे, असे काम करावे लागते. घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून, तुम्हाला १०-३० टक्के कमी किमतीत माल मिळतो. तुमच्या खर्चाचा विचार करून, तुम्ही तुमच्या ग्रहाकलाही ४-५% सूट देऊ शकता.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
साधारण ४-५ दिवसाच्या कामात तुम्हाला ८-१०% नगद फायदा मिळतो. सुरुवातीला काही भांडवल तुम्हाला लावावे लागेल. नंतर ग्राहकाकडून पैसे आगाऊ घेणे आणि/किंवा व्यापाऱ्याकडून उधार घेणे ह्याचा वापर करून तुम्ही आर्थिक गणित बसवू शकता.
तुमच्या पासून १-२ किमी परिघात राहणाऱ्या ओळखीच्या लोकांची, मित्रांची आणि सोसायट्यांची यादी करा. तुमची योजना व्हॉटसअपवर कळवा, ग्रुपमध्ये कळवा. संबंधित लोकांशी बोला. कोणाशी भागीदारी करण्याची गरज असेल तर करा. अशा तऱ्हेने सुरुवात करा. मग खरेदीची किंमत काढून, वस्तू आणि त्यांची विक्री किँमत ह्याची यादी बनवा आणि ती तुमच्या ग्राहकांना पाठवा.
महिन्याला २५ तारखेपर्यंत ग्राहकांच्या याद्या मिळवणे, त्या २-३ दिवसात एकत्र करणे आणि प्रत्येक वस्तू एकूण किती खरेदी करायची आहे, त्याची यादी बनवावी. कुठे स्वस्त मिळेल आणि वाहतूक खर्च कमी होईल, त्या प्रमाणे, ३-४ व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी आणि घरोघरी स्वतः किंवा तात्पुरता माणूस ठेऊन पुरवठा करावा.
सर्वात आधी, खरेदी विक्रीची किंमत, वाहतूक खर्च, मजुरी ह्याचे पक्के अंदाज पत्रक करून आधी १०-२० घरांसाठी करून बघावे, त्या अनुभवाने शिकून १००-२०० घरेसुद्धा करू शकता. १०० घरे रु. २,००० ची खरेदी करतात असे धरले, तरी रुपये २ लाख खरेदीवर साधारण १०% म्हणजे रू २०,००० तुमचे उत्पन्न बनते, तेही ४-५ दिवसाच्या कामात!
तुम्हाला जशा जमतील, तशा खालीलपैकी वस्तू हळूहळू तुम्ही द्यायला सुरुवात करू शकता :
• किराणा
• भाजी, फळे
• मसाले
• वैयक्तिक, घर स्वच्छता उत्पादने
• आयुर्वेदिक औषधे, टॉनिक
• कोरोना संबंधी उत्पादने
• शैक्षणिक, कार्यालयीन साहित्य
मग, इतर गरजांचा अभ्यास करून, इतर अनेक वस्तू सुरू करा. उदा. आंबे, फटाके, गणपती साहित्य, मोदक, दिवाळी फराळ, तीळगूळ आणि बरेच काही… करा सुरुवात. माहिती काढा. अभ्यास करा. गणित करा. लक्षात ठेवा. तुम्ही पुढाकार घेऊन काम करा, व्यवसाय यशस्वी होईलच. कारण, पुढाकार घेऊन काम करणारे लोक फार कमी आहेत!
– सतीश रानडे
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.