उद्योगसंधी

गट शेती : कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


पारंपारिक एकत्रित कुटुंब पद्धतीचा ह्रास होत आहे त्याचबरोबर एकत्रित शेतजमिनीचे तितकेच तुकडे पडता आहेत. भविष्यात भारतीय शेतीपुढील हे एक मोठे आव्हान असेल. एक लहानस उदाहरण घेता एका शेतकऱ्याला चारएकर जमीन असेल त्याची दोन मुले असतील त्याची विभागणी होऊन दोन दोन एकराचे दोन तुकडे पडतील. त्यापुढे विभागणी होऊन एक एक एकर पुढे अर्धा अर्धा आणि नंतर बांधच उरतील तर काही भूमिहीन झाले असतील.

उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा असेल तर ह्या तुकड्या-तुकड्याच्या शेतीत करू शकत नाही. उत्पादनात घट होत आहे अल्पभूधारक शेतकर्‍यांपुढे अडचणींचा डोंगर उभा आहे. ’ना आडात ना विहिरीत’ अशी अवस्था झाली आहे. पिकावरील उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव यांचा कुठे ताळमेळ बसत नाही.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

या विभाजनीकरणावर उपाय पाहता महाराष्ट्र आता गट शेतीकडे वळतोय. नाथाराव कराड अथवा ज्ञानेश्वर बोडके या तरुण शेतकरी मित्रांनी हे यशस्वीपणे राबवून सर्व महाराष्ट्राला गट शेतीचा आदर्श घालून दिला आहे. ही स्तूत्य बाब आहे सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येवून काही घडू शकते व कृषीकेंद्रित ग्रामविकास घडू शकतो.

थोडस इस्राएलकडे पाहू

इस्राएलमधील एथिहसिक किबुत्झमधील शेती गट शेतीच बोलक उदाहरण. यामध्ये उपलब्ध नैसर्गिक साधनांचा प्रभावीपणे वापर करून शेती केली जाते. मोठमोठ्या प्रक्षेत्रावर सलग पद्धतीने पिके घेतली जातात. येथील सर्व शेती उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून यांत्रिक पद्धतीने केली जाते. यात प्रामुख्याने भाजीपाला,फळे,विविध अन्नधान्याची पिके घेतली जातात. तसेच दुग्धउत्पादन व कुक्कुटपालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय केले जातत, यातून मिळणारे उत्पादन व होणार अर्थार्जन त्या किबुत्झच्या परिपूर्ण विकासासाठी अर्पण केले जाते.

इस्राएलमधील किबुत्झ शेतीच कार्य वाखण्यायोग्य आहे येथील शेतकरी आपल्या शेताबरोबर आपल्या किबुत्झच तर किबुत्झबरोबर देशाच वैभव वाढवता आहेत. किबुत्झ पाहिलं तर हिरवी शेत आणि छोटी छोटी घरे सुंदर बागकाम, छान रस्ते हे वैभव त्या किबुत्झमधील कष्ट करणाऱ्या त्या असंख्य हातच आहे.हे वैभव पाहून आपणही याकडे वळू शकतो आणि आपली खेडी समृद्ध करू शकतो.

– बिभीषण बागल
(लेखक कृषी तज्ज्ञ असून ‘इस्राएलमधील शेती’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!