स्टार्टअप

गुलाबजाम; प्रत्येक स्टार्टअपने पाहावा असा सिनेमा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


लेखाचे शीर्षक बघून असे वाटणे साहजिक आहे की, हे एखादे स्टार्टअप आहे की काय? तर तसे काही नाही. वॉर फिल्म म्हटले की, ‘गन्स ऑफ नॅव्हरान’, खेळावरचा सिनेमा म्हटले की, ‘चक दे इंडिया’ किंवा बरेच कन्सल्टंट मॅनेजमेंट फिल्म म्हणून ‘एक रूका हुआ फैसला’ हा सिनेमा दाखवतात किंवा पहाण्याचा सल्ला देतात.

‘गुलाबजाम’ सिनेमा पाहाताना मला त्याची कथा एखाद्या बिझनेस स्टार्टअप व्हेंचरसारखी वाटली म्हणून लेखाला हेच शीर्षक समर्पक वाटले. सचिन कुंडलकर यांचा ‘गुलाबजाम’ हा सिनेमा परवा पाहिला. थोडा उशिराच पाहिला. एक अतिशय सुंदर, उत्तम मराठी सिनेमा, असेच मी म्हणेन.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत या सगळ्या अंगांनी तो चांगला आहेच, पण मी इंडस्ट्री मॅनेजमेंट ह्या क्षेत्रात कार्यरत असल्याने मला हा सिनेमा स्टार्टअप सुरू करणार्‍यांसाठी एक उत्तम उद्बोधक सिनेमा आहे असे वाटले म्हणून मी हे शेअर करत आहे.

तुम्ही सिनेमा पाहिला असेल असं मी गृहीत धरतो. पाहिला नसेल तर आवर्जून पहा. थोडक्यात कथा अशी आहे. आदित्यला (सिद्धार्थ चांदेकर) लंडनमध्ये मराठी खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट उघडायचे आहे. त्यामुळे तो मोठ्या पगाराची नोकरी सोडून घरी न सांगता पुण्यात मराठी पदार्थ शिकण्यासाठी येतो. बरेच लोक त्याला वेड्यात काढतात. अशात तो खानावळीचा डबा खात असताना त्या पदार्थाची चव पाहून डबा बनविणार्‍या व्यक्तीचा शोध घेतो.

मिस आगरकर (सोनाली कुलकर्णी) ही ती व्यक्ती. ती आयुष्यात एकाकी असते. अपघात झाल्याने काही वर्षे कोमात राहिल्याने तिची काही अंशी स्मृती आणि आत्मविश्वास गेलेला आहे. आयुष्यात कटू अनुभव आल्याने तीला माणसांशीदेखील तुसडेपणाने वागत असते; पण निसर्गाचा चमत्कार म्हणावा, स्वयंपाक आणि तिच्या हाताची चव ही स्मृती शाबूत असते, त्यामुळे डबे पुरवून ती आपली उपजीविका करत असते.

…आणि आदित्यला मिस आगरकरमध्ये आपला गुरू (Trainer) भेटतो. अनेक दिव्यातून गेल्यावर त्याचे ट्रेनिंग सुरू होते. ह्याच काळात त्याला लक्षात येते की, आपल्या मराठी संस्कृतीतील अतिशय चांगले आणि चविष्ट खाद्यपदार्थ सामाजिक औदासीन्यामुळे विस्मृतीत गेले आहेत.

पाश्चात्त्य/परप्रांतीय लोकांनी आपल्या खाद्यपदार्थांचे ब्रॅडिंग करून चांगली उपलब्धता केली असल्याने लोकांच्या ते अंगवळणी पडले आहेत आणि मग आपल्या स्टार्टअप व्हेंचरसोबत तो मिस आगरकर (सोनाली कुलकर्णी) साठी स्टॅण्डअप व्हेंचर करतो. शेवटी दोघेही यशस्वी होतात.

चित्रपटात सामाजिक, भावनिक आणि मानसशास्त्रीय बाजूही आहेत, परंतु तो आपल्या लेखाचा भाग नाही. त्यामुळे आपण त्या विषयात न जाता आता हा सिनेमा स्टार्टअप सुरू करणार्‍यांना उपयोगी कसा ते पाहू.

  • तरुणांनी आयुष्यात काय करायचे हे ठरवायला पाहिजे. स्वतः निर्णय घेतला पाहिजे.
  • नोकरी-पद, गलेलठ्ठ पगार वगैरे प्रलोभने असतात. त्यामुळे ठाम निर्णय महत्त्वाचा.
  • मिळेल ते क्षेत्र किंवा लादलेले काम करण्यापेक्षा आवडीचे क्षेत्र, आवडीचे काम निवडले पाहिजे.
  • आपल्या आजूबाजूला प्रोत्साहन देणारे लोक कमी असतात. भीती घालणारे जास्त असतात; त्यामुळे नाउमेद होऊ नका. आपल्या निर्णयावर ठाम रहा.
  • जे काम, उद्योग करायचा आहे त्याबद्दल पूर्ण माहिती घ्या. प्रॅक्टिकल स्किल्स मिळविल्यास अतिशय उत्तम. बरीच मंडळी म्हणतात, पाण्यात पडल्यावर माणूस आपोआप पोहायला शिकतो. काही वेळा हे खरे असले तरी पोहणे शिकून पाण्यात उतरणे केव्हाही बेस्ट.
  • कौशल्य विकसित करताना खूप कष्ट करावे लागतात, ही खूणगाठ बांधून घ्या. तबला शिकताना झाकीर हुसैन यांची बोटं फुटली तरी त्यांच्या वडिलांनी एक ही दिवस रियाज चुकवू दिला नाही.

थोडक्यात,

Will – Determination – Knowledge – Skill ह्या चार गोष्टी तुम्हाला यशस्वी करणार हे शंभर टक्के खरे !!

– एस.पी. नागठाणे
७०२८९६३२५५
(लेखकाला Automotive Manufacturing क्षेत्राचा चाळीस वर्षे
अनुभव असून सध्या ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!