‘उत्तम क्‍वाालिटी, ग्राहक संतुष्टी’ जपणारा आरवाडे यांचा तीन पिढ्यांचा वारसा

ऑटो इंजिनीअरिंगमध्ये काम करताना सगळ्यात महत्त्वाची असते ग्राहकांची गरज समजून अचूक काम पूर्ण करून देण्याची. कोल्हापूरचे आरवाडे कुटुंब मागील तीन पिढ्यांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.

१९८० पासून संजय आरवाडे यांनी स्थापन केलेल्या ‘गुरुप्रसाद ऑटो इंजिनीअरिंग वर्क्स’ पूर्वी त्यांच्या वडिलांनी १९५३ मध्ये एका लेथ मशीनवर मशीन शॉप कोल्हापूरमध्ये सुरू केले होते आणि आज मंदार आरवाडे हे ही धुरा संभाळत आहेत. कोल्हापूरमधील पहिल्या मशीन शॉपसोबत १९५३ पासून आरवाडे कुटुंबाचाही व्यावसायिक श्रीगणेशा झाला.

वडिलांच्या निधनानंतर बी.ए. आरवाडे कोल्हापूर शहरात आले. ते चौथीत शिकत असताना त्यांचे वडील वारले आणि त्यांची रवानगी कोल्हापूर शहरात चुलत्यांच्या कारखान्यात नोकरीसाठी झाली.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

शिकता शिकता अनुभवाने मग एका लेथ मशीनवर त्यांनी जॉब वर्क सुरू केले. त्या काळी इंटरनेट नव्हते. इंजिनियरिंग क्षेत्रातील कोणतीही प्रगत माहिती दहा वर्षांनी भारतात यायची. कोणतेही शिक्षण नसताना केवळ इंजिनीअरिंग क्षेत्राच्या आवडीमुळे मॅगझीन, पुस्तके मागवून त्याचा अभ्यास केला.

१९६० साली बी. ए. आरवाडे यांनी काळाची गरज ओळखून machine wise Radial Drill machine, Lathe machine आणि Special purpose machine ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन सुरू केले. कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगर या औद्योगिक वसाहतीत याची सुरुवात केली आणि देशभर ख्याती मिळवली.

त्या काळी कोल्हापूरमध्ये इंजिन, ऑटोमोबाइल यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. काळाची गरज बी.ए. आरवाडे यांनी ओळखली. पुढे ऑटोमोबाईल कॉम्पोनेन्ट ही १९८० साली शिरोली एमआयडीसीमध्ये सुरू झाली.

कंपनी आयएसओ 9001: 2015 प्रमाणपत्राद्वारे मान्यताप्राप्त आहे. कालांतराने कोल्हापुरातील कामही शिरोली एमआयडीसीमध्ये शिफ्ट केले आणि एकाच छताखाली हा प्रवास सुरू झाला.

इथे विविध ऑटोमोबाईल, फाउंड्री, अभियांत्रिकी, मुद्रण मशीनला लागणारे पार्ट्स बनवून दिले जातात. पारंपारिक मशीन वापरून ते नवीन तंत्रज्ञान असलेल्या सीएनसी, व्हीएमसी अशा मशीनवर त्यांची उत्पादने करून दिली जातात. यात आरवाडे यांचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.

‘आरवाडे मेक मशीन वाइस’ हे त्यांचे स्वतःचे उत्पादन आहे. त्याशिवाय अजून पाच मॉडेल आहेत. छोट्यातल्या छोट्या कारखानदार, फॅक्टरीपासून मोठयात मोठ्या कारखानदारापर्यंत प्रत्येकाला हे प्रॉडक्ट लागते. त्यांची डिझाइन ही पूर्वापार चालत आली आहेत. ती गरजेनुसार अद्ययावत करत असतो.

आरवाडे कुटुंबाच्या तिसर्‍या पिढीतील मंदार आरवाडे आज ही धुरा यशस्वीरीत्या पुढे नेत आहेत. मंदार आरवाडे हे इंजिनीअर असून प्रॉडक्शन मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले आहे. मंदार म्हणतात, उत्तम क्वालिटी, टिकाऊपणा, विश्वसनीयता, सुरक्षितता ही आरवाडे उत्पादनांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

मंदार आरवाडे

वर्षानुवर्षे आमच्यावर विश्वास ठेवून आमचे प्रॉडक्ट वापरणारा ग्राहक आम्ही कुठेही क्‍वालिटीत कॉम्प्रोमाईस करत नाही असा आम्हाला फीडबॅक देतो, तेव्हा आम्हाला आमचे हे वैशिष्ट्य अधोरेखित करावे असे वाटते. सतत बदल स्वीकारणे हे आमचे वैशिष्ट्य आहे. सतत अभ्यासू आणि चिकित्सकपणे काम करतो.

काळ बदलला त्यामुळे लोकांपर्यंत पोहचण्याची माध्यम बदलली. पूर्वी पॅम्फ्लेट, इंजिनीअरिंग मासिके यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचायचो. आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलल्या. आज सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम आहे. ज्याचा वापर आम्ही वाढवलाय.

याचसोबत आमच्या प्रॉडक्टची इत्यंभूत आणि अचूक माहिती एका क्लिकमध्ये ग्राहकाला मिळावी अशी वेबसाईट आम्ही तयार केली आहे. तसेच या प्रवासात आमच्या वडिलांचा अनुभव माझा भाऊ प्रफुल्ल आरवाडे आणि मी अशी आमची मुख्य टीम आहे.

प्रफुल्ल आरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ‘आरवाडे मेक मशीन वाइस’ची Hydraulic series बाजारात आणली आहे. त्याशिवाय १९८० पासून आमच्याकडे जुने कर्मचारी अजून कार्यरत आहेत. त्या सर्वांचाही या वाटचालीत मोठा वाटा आहे.

मंदार पुढे म्हणतात, १९६० च्या दशकात स्वतः शंतनुराव किर्लोस्कर आमच्या कारखान्यात येऊन गेले होते. ‘किर्लोस्कर कंपनी’सोबत ‘आरवाडे मशीन वाईस’साठी सप्लायर होतो. त्यावेळी त्यांच्या प्रॉडक्टसोबत आमचेही प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहचू लागले.

असेच अनेक नावाजलेले उद्योग HMT, ITI च्या सर्व महाराष्ट्रातील शाखा, आता किर्लोस्कर ब्रदर, टेल्को, Thysan Krupp, Cooper Corporation, Saroj Group अशा नावाजलेल्या कंपन्या आमच्या ग्राहकांच्या यादीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांना सप्लाय केले आहे. याशिवाय कर्नाटक, गोवा इथला ग्राहक सध्या आमच्याशी जोडलेला आहे.

आता आमचा अभ्यास आम्हाला सांगतो की या व्यवसायाला निर्यातीसाठी मोठ्या संधी आहेत. त्यामुळे आमचे भविष्यातील लक्ष्य हे निर्यात वाढवणे हेच आहे.

संपर्क : मंदार आरवडे – 9011629797

Author

  • यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?