यशस्वी उद्योजकांच्या थक्क करणार्‍या सवयी

छंद बाळगतात : नवीन भाषा शिकणे, ऑनलाईन कोर्स करणे, ऑनलाईन उद्योग सुरू करणे किंवा ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी उपक्रम राबवणे. उद्योजक आपले छंद बाळगतात आणि जोपास्तातसुद्धा. अशा छंदांची आवड उद्योजकांना वृद्धिंगत व्हायला मदत करतात आणि आनंदी ठेवतात.

बर्‍याच उद्योजकांच्या बाबतीत छंदाचेच रूपांतर उद्योगात झाले आहे. तसेच नेटवर्किंगमध्ये समान आवडनिवड शोधण्यासाठी छंद हे एक खूप चांगले माध्यम ठरते.

उद्योजक आपला तिरस्कार करणार्‍या व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात : सर्व यशस्वी उद्योजकांनी तिरस्कार करणार्‍या लोकांचा अनुभव घेतलेला आहे. बरेचदा स्वकीयांकडून अपयशाचीच हमी मिळाली होती. पण उद्योगात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवायची सवय असणे गरजेचं आहे.

आपला तिरस्कार करणार्‍यांकडे दुर्लक्ष करायचे असल्यास एकच लक्षात ठेवावी की, तुमच्या स्वतःपेक्षा जास्त तुमचा तिरस्कार इतर कोणीही करू शकत नाही. त्यामुळे पहिले स्वतःचे चाहते बना.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

स्वयंप्रेरित कसं राहायचं हे माहीत असतं : व्यवसायात अडचणी आणि अपयशाचे बरेच क्षण येतात. पण यशस्वी उद्योजक स्वयंप्रेरित करायचं हे जाणून असतात. यासाठी प्रेरक भाषणं ऐकत रहा. व्यवसाय सुरू करण्यामागची तुमची स्वतःची २० कारणे लिहून काढा व निराशा आल्यास प्रत्येक वेळी ती वाचत रहा. ज्यांनी अडचणींवर मात केली, अशा लोकांचे आत्मचरित्र वाचा.

वेळेचं उत्तम व्यवस्थापन करतात : यशस्वी उद्योजकांच्या दिवसाची ५ मिनिटांचा प्रत्येक स्लॉट पूर्वनियोजित असतो. वेळेचा उत्तमोत्तम वापर करण्यासाठी कामाच्या वेळी सोशल मीडिया आणि काम सोडून इतर वेबसाईट्सचा वापर टाळा. ८०-२० चा नियम पाळा.

ज्यामध्ये तुम्ही इतरांपेक्षा कुशल आहात, ती सोडून इतर कामांवर किमान आणि आवश्यक तितकाच वेळ द्या. ती कामे इतरांकडे सोपवा.

दिवसभरात बर्‍याच कल्पना डोक्यात येतात. त्यांपैकी फक्त सर्वात जास्त परिणाम देणार्‍या कल्पनांना चिकटून रहा. गरज पडल्यास परिवार, मित्र आणि कधीतरी टीममेट्सनासुद्धा नाही म्हणायला शिका.

व्यायाम करतात : यशस्वी उद्योजक निरोगी आणि संतुलित जीवनाशैलीसाठी योगा, शारीरिक खेळ किंवा शारीरिक व्यायाम यांपैकी काही ना काही दैनंदिन जीवनात करत राहतात. त्यामुळे आजच आपल्यासुद्धा रोजच्या नियोजनात यांपैकी एकाचा समावेश करा. शिवाय व्यायाम करताना तुम्ही तुमचे आवडीचं संगीत ऐकू शकता. त्यामुळे तुमची गाणी ऐकायची इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि व्यायाम करण्याचा उत्साहदेखील वाढेल.

उत्तम सांघिक वृत्ती : उद्योजकांकडे नेतृत्वशैलीसोबत उत्तम सांघिक वृत्तीसुद्धा असते. आपल्या टीमकडून एकाविशिष्ट ध्येयासाठी काम कसं करून घ्यायचं हे उद्योजकांना माहित असतं. त्यामुळे जबाबदारी वाटून घेण्यास ते कधीच लाजत नाहीत आणि कधीच सर्व कामे स्वतःकडे घेत नाहीत.

याऊलट कामाचं विभाजन आणि व्यवस्थापन ते करतात. आपल्या सर्व टीममेट्सना ते कामात सहभागी करतात. कामातील यशाचे श्रेयसुद्धा सर्वांसोबत वाटून घेतात. यामुळे टीमचा उत्साह आणि कार्यक्षमता वाढते. मोठ्यातल्या मोठं ध्येय साध्य करणं सोपे जाते.

स्वतःसाठी वेळ काढतात : या वेळेत उद्योजक आपल्या कृती, मुल्ये यांवर खोल व काळजीपूर्वक विचार करतात, तार्किक विचार बंद करतात किंवा आवडीची गोष्ट करण्यात वेळ घालवतात. त्यामुळे या वेळेतच शॉवर घेताना एखादी कल्पना डोक्यात येऊ शकते.

रोजनिशीसुद्धा याच वेळेत लिहिली जाऊ शकते किंवा उद्योजकीय पुस्तक वाचली जाऊ शकते. यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून घ्या. या वेळेत तुम्हाला ऊर्जा देणार्‍या तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करा.

निरोगी राहतात : योग्य आणि संतुलित आहाराशिवाय चाणाक्ष मेंदूची कल्पना केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आहारात भाज्या, प्रथिने, आरोग्यासाठी लाभदायक फॅट्स आणि पाणी यांचा समावेश असावा. याचा अर्थ आरोग्यासाठी फक्त आहार पुरेसा नाही.

यासोबत शारीरिक व मानसिक व्यायाम आणि पुरेशी झोपसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे दिवस कार्यक्षमतेने घालवण्यासाठी दैनंदिन ८ तासाची झोप होत आहे, याची खात्री करून घ्या.

सकाळी लवकर उठतात : बर्‍याच उद्योजकांचा दिवस हा सकाळी ६ पूर्वी सुरू होतो. याचा परिणाम असा होतो की, त्यांची सकाळ उत्पादक कामांत कार्यक्षम पद्धतीने जाते. पण यासाठी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. खरंतर खूप लवकर म्हणजे रात्री ९ ते १० च्या दरम्यान.

यासाठी तुम्ही सकाळी का लवकर उठावं याचं तुमचं कारण ठरवा. हे कारण तार्किक नव्हे, तर अर्थपूर्ण असावं. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या व्यवसायातून कशाप्रकारे लोकांना मदत करणार आहात किंवा करता.

स्वतःच कुतूहल जागृत ठेवतात : ही सवय यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. अशा कुतुहलातूनच नाविन्य जन्माला येते, नवीन साहस आणि कल्पनांचा अनुभव मिळतो. कुतूहल जागृत ठेवण्यासाठी नवीन गोष्टी वापरून पहा. अशा नवीन अनुभवांतून बरेचदा कधीही न दिसलेल्या चौकटीबाहेरील गोष्टी समोर येतात. कधीतरी एखादी कल्पनादेखील सुचू शकते.

वाचन वाढवा. कारण ज्ञान हे कधीच वाया जात नाही. याऊलट ज्ञान हे वृद्धी आणि यशासाठी अनिवार्य असतं. यामध्ये माहित नसलेल्या विषयांबद्दल वाचणे जास्त लाभदायक ठरते.

त्यांना आपले ध्येय ठाऊक असते : एखादी गोष्ट करण्यामागील हेतू जितका जास्त सकारात्मक असेल, तितकीच जास्त मेहनत आपण तो साध्य करण्यासाठी घेतो. हा हेतूच आपल्याला रात्री लवकर झोपण्यासाठी आणि कितीही उशिरा झोपलो असलो तरी सकाळी लवकर उठायला प्रेरित करते, आपल्याला अडचणींवर मत करायला मदत करतो.

म्हणूनच दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक अशी काळानुसार ध्येये ठरवून घ्या, अन्यथा फक्त वार्षिक ध्येय ठरवले असेल, तर त्यापासून विचलित होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय या ध्येयंनुसार आपल्या प्रगतीचे मूल्यमापनही करता येते.

कृतज्ञता बाळगा : ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला इतरांचीसुद्ध मदत घ्यावी लागेल, यांमध्ये तुमच्या ग्राहकांपासून मित्रपरिवार आणि तुमच्या सहकार्‍यांपर्यंत या सर्वांचा समावेश असेल. त्यांच्या मदतीमुळेच तुमचे ध्येय साध्य होणार आहे. म्हणून त्यांचे आभार मानायला विसरू नका.

किमान निर्णय घेतात : निर्णय घेणे हे जाणवत नसले तरी बरेच त्रासदायक असते. त्यामुळे आपल्याभोवती स्मार्ट लोकांचा ग्रुप/टीम तयार करा. ही टीम तुमच्या वतीने योग्य निर्णय घेऊ शकते आणि तुम्ही त्याला योग्य दिशा देण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. आवश्यकता नसल्यास निर्णय घेणे टाळा. सामान्य माणूस एक बाजू घेतो, पण उद्योजक या सर्व नाटकापासून स्वतः मध्येच दूर नेतो.

कृती करतात : दिवास्वप्नांना निरोप द्या, वास्तव आयुष्याचे स्वागत करा. जर तुम्हाला आपली स्वप्ने सत्यात आणायची असतील, साध्य करायची असतील, तर तुम्हाला कृती करावीच लागेल.

खेळ जिंकण्यासाठी आधी तो खेळावा लागतो. नुसत्या कल्पनेने काही होत नाही. ती सुचल्यावर त्यावरील कार्यवाहीवर भविष्य अवलंबून असते. त्यामुळे कारणे देणे थांबवा आणि कृतीला सुरुवात करा.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?