तुमच्या सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात सक्षम आहेत का?

होय, तुम्ही अगदी योग्य प्रश्न वाचलेला आहे. तुमच्या सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचवण्यात सक्षम आहेत का? मित्रहो, या प्रश्नाचं उत्तर द्यायची अजिबात घाई करू नका. का? तर विचार करून उत्तर दिल्यास, ‘नाही’ हेच असण्याची शक्यता जास्त आहे, हे मी अनुभवावरून सांगू शकतो.

फारच क्वचित वेळा ‘अंशत: होय’ असंही उत्तर असण्याची शक्यता असते आणि जर वरील प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असं असेल तर तुम्हाला या प्रकरणाची गरज नाही, असं समजा.

आयुष्यात ज्या काही मोजक्या गोष्टी तुमच्या आयुष्यात, तुम्हाला घडवण्यात महत्त्वाच्या भूमिका बजावतात, त्यात सवयींची व्याप्ती ही मोठी आणि महत्त्वाची आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की, तुमच्या आजच्या सवयी, तुमचं उद्याचं भविष्य घडवतात.

तुमची आजची सवयच, तुमचा उद्या कसा असेल, हे सांगतात. आपल्याला ते फक्त वाचता आलं पाहिजे. तुमच्या बँक अकाऊंटचा बॅलन्स आणि तुमच्या सवयींचा जवळचा संबंध आहे, असं म्हणतात. तुमचे मित्र आणि तुमच्या सवयी यांचा जवळचा संबंध आहे, असं एक रीसर्च सांगतो आणि तुमच्या सवयी आणि तुमचं नशीब यांचा फारच जवळचा संबंध आहे.

मित्रहो, तुम्ही आज जे-जे करताय, ते-ते तुमच्यासमोर उद्या तुमचं वतर्मान बनून तुमच्या आयुष्यात अवतरणार आहे. तुमच्या कालच्या सवयींवरच तुम्ही आज इथपर्यंत आलेले आहात. हवं तर तपासून पहा. त्या चांगल्या होत्या का वाईट होत्या याची शहानिशा आपण इथे आज नाही करणार, तर फक्त त्या तपासून बघणार आहोत आणि मला वाटतं, ते तुम्ही स्वतःच नि:पक्षपातीपणे करायला हवं.

आता आपण दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा बघणार आहोत आणि तो म्हणजे, तुमच्या सवयी. त्या तुमचे ध्येय गाठायला मदत करणार्‍या आहेत का? तुमच्या सवयी ह्या तुमच्या ध्येयाला पूरक आहेत का?

त्या तुमच्या ध्येयाशी हातमिळवणी करणार्‍यांपैकी आहेत का? तसेच त्या तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात सक्षम आहेत का? जर या प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ असं असतील तर लगेच कामाला लागा.

• सर्वप्रथम तुमची ध्येये तपासा.
• ती योग्य असतील, तर तुमच्या सध्याच्या सवयींची यादी करा.
• तुमच्या ध्येयाला पूरक अशा, परंतु तुम्हाला सध्या नसलेल्या सवयींची यादी करा.
• त्या जाणीवपूर्वक कशा लावून घेता येतील किंवा त्यासाठी तुम्हाला कोणकोण मदत करू शकेल ते लिहा.
• त्यावर केव्हापासून काम सुरू करता येईल ते लिहा व त्यानुसार कामाला लागा.

अर्थात कमजोर सवयी तुम्हाला तुमच्या मजबूत भव्य ध्येयांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. त्यासाठी तुमच्या सवयींवर तुम्हाला प्रयत्नपूर्वक काम करावं लागेल. तुमच्या बदललेल्या सवयी तुम्हाला आतून-बाहेरून बदलल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?