भव्य विचार करा!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपल्या आयुष्यात मोठे यश प्राप्त केलेल्या व्यक्तीने हा विचार मुळीच केला नव्हता की, माझी सुरुवात कुठून झाली; परंतु मला माझ्या आयुष्यात मोठ्ठं काही तरी करायचं आहे, हे नक्की. कदाचित इतरांच्या नजरेत तेव्हा त्यांनी ठरवलेलं त्यांच ध्येय इतरांना अशक्यही वाटलं असेल, परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांच्या स्वतःच्या विचारांचं स्वरूप हे भव्यच होतं. मग ते तुम्ही मँकडोनाल्डच उदा. घ्या किंवा वॉल्ट डिस्नेचं घ्या.

तुमच्या बाबतीतही तुम्ही या आधी कधीही न केलेल्या गोष्टी करण्यासाठी, मोठ्ठ काही तरी करण्यासाठी स्वतःला तयार करा. त्याची सरुवात तुमच्या विचारांपासून होते. तेव्हा भव्य काही तरी करण्याचाच विचार करा. असं काही तरी की, जे इतरांनी ऐकल्यावर तुम्हाला वेड्यात काढलं पाहिजे, काही दिवसांकरिता तुमची झोप उडाली पाहिजे. असा भव्य विचार करा.

आपण इथे रिचर्ड ब्रॅनसन (Richard Branson) यांचं उदा. पाहू, ते ‘व्हर्जिन’ या उद्योगसमूहाचे संचालक आहेत. आज त्यांच्या ‘व्हर्जिन’ या उद्योगसमूहात चारशेपेक्षा जास्त कंपन्या आहेत. व्यवसायाची सुरुवात त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी विद्यार्थ्यांसाठीच्या काढलेल्या एका मासिकाने झाली. भव्य विचारसरणीच भव्य वाटचालीचे रस्ते दाखवत असते. तेव्हा भव्य विचारसरणीतच तुमचे बस्तान बसवा.

  • मोठा विचारच मोठ्या व्यक्तींना जन्म देत असतो. अशाने काय होऊ शकतं?
  • भव्य, मोठा विचार तुमची सध्याची लहान विचारांची मानसिक वर्तुळं तोडायला मदत करतो.
  • तुमची मोठे विचार करायची सवयच तुमचं मोठं भविष्य घडवत असतं.
  • अशाने मोठ्या समस्याही तुम्हाला लहान भासतील व त्यातून लवकर मार्ग निघू शकतो.

 

  • तुमच्या अवतीभवतीची लहान विचार करणारी माणसं एक तर तुम्हाला सोडून जातील किंवा तुम्हाला हसतील तरी.
  • अशा वेळी तुम्ही योग्य मार्गावर आहात असंच समजा. कधी-कधी तुम्ही केलेल्या भव्य विचाराला तुम्ही स्वतःच आव्हान द्याल.
  • तुमच्या आरामदायी आयुष्यात अनपेक्षित संकटाच्या वादळाची झळ लागू शकते.
  • कधी-कधी तुमची झोपही शेजार्‍याच्या भूमिकेत भासू शकते.

हे करून तर बघा – भव्य, मोठा विचार म्हणजे असामान्य विचार. हा विचार सामान्य माणसं करू शकतात आणि असा विचारच पुढे त्यांना असामान्य बनवतो. म्हणून भव्य विचार करा.

मोठा विचार करायला पैसे लागत नाही, नियत लागते.

  • मोठं काही तरी करायची विचारसरणी असणार्‍या माणसांच्या संपर्कात जास्तीत-जास्त राहण्याचा प्रयत्न करा.
  • कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात प्रथम तुमच्या डोक्यातून होते.
  • तुम्ही ठरवलेल्या मोठ्या कामाबद्दल तुमच्या मनात शंका ठेवू नका.

 

  • अशा वेळी तुमच्यात दडलेली असीमित, असामान्य शक्तीच तुम्हाला मदत करेल.
  • अशक्य, अवघड या गोष्टी फक्त लोकांच्या विचारसरणीतच असतात.
  • तुमच्या मोठं होण्याच्या विचारांवर शंका घेणं म्हणजे त्यांची हत्या करण्यासारखं आहे. तसं करू नका.

 

  • ती नक्कीच काम करतील याबद्दल आशावादी राहा.
  • तुमच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड अवश्य द्या. तीच तुम्हाला पुढे नेतील.
  • मोठा विचार करायलादेखील हिंमत लागते.
  • त्यासाठी स्वत:ला शाबासकी द्या किंवा एखादं बक्षीस जरूर द्या आणि अभिमान बाळगा की, माझ्यात मोठा विचार करायची हिंमत आहे.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?