उद्योजक Profiles

गरीब घरातील हे दोघे भाऊ बिल्डर होऊन आज बांधतायत सर्वसामान्यांना परवडणारी घरं

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


संतोष धुमाळ आणि हिम्मत धुमाळ असे दोघे भाऊ. एका साधारण गरीब ग्रामीण कुटुंबामध्ये लहानाचे मोठे झाले. वडील शेती करत होते. संतोष धुमाळ मोठा भाऊ त्यांचे शालेय शिक्षण सेकंड एअरपर्यंत झाल्यानंतर घरच्या गरिबीमुळे साखर कारखान्यामध्ये नोकरी करावी लागली.

संतोष धुमाळ यांना नेहमी वाटायचे की, ज्याप्रमाणे आपल्याला आपले शिक्षण सोडावे लागले त्याप्रमाणे आपला भाऊ हिम्मत धुमाळ याला लागू नये म्हणून आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील संतोष यांनी जिद्दीने हिम्मत यांना इंजिनिरिंगपर्यंत शिकवले. पुढे हिम्मत यांना चांगल्या कंपनीमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

पहिल्यापासून सतत काहीतरी धडपड करत राहणे या संतोष यांच्या स्वभावामुळे संतोष यांनी अनेक छोटे छोटे व्यवसाय केले. हे करत असताना संतोष यांच्या असे लक्षात आले कि आपल्या परिसरात सर्वसामान्य लोकांना राहण्यासाठी फ्लॅट घेणे किंवा एकरमध्ये जागा घेणे परवडत नाही. तेव्हा त्यांना नेहमी वाटायचे कि सर्वसामान्यांसाठी काहीतरी केले पाहिजे.

संतोष यांनी आपला भाऊ हिम्मत यांना मनातील सल बोलून दाखवली तेव्हा दोघांच्या संकल्पनेतून एक छानशी कल्पना सुचली की, आपण मोठी जागा विकसित करून छोटे छोटे प्लॉट करून विकायचे जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या स्वप्नातील घर सर्वाना स्वस्तात मिळेल आणि ‘हिंदपार्थ डेव्हलपर्स’ या फर्मचा उदय झाला.

सर्वसामान्यानचे स्वप्न साकार करण्यासाठी संतोष आणि हिम्मत यांनी ठरवले खरे पण आजच्या काळात जागांचे दर गगनाला भिडले होते त्यामुळे सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे भांडवल.

आम्ही जागा मालकाशी एक करार करून घेतला ज्यामध्ये जागा मालकाला बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळाली आणि आमच्या स्वप्नांना पंख मिळाले. अशाप्रकारे हिंदपार्थ डेव्हलपर्स चा प्रवास सुरु झाला.

घेतलेली जागा पूर्णपणे रस्ते, वीज, रस्त्याच्या बाजूने छान छान फळझाडे, कंपाऊंड करून विकसित केली. या छोट्या छोट्या जागा सर्वसामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत विकायला चालू केल्या. आज हिंदपार्थ डेव्हलपर्सने जवळ जवळ हजारो लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरासाठी अगदी किफायतशीर किंमतीत जागा उपलब्ध करून दिली आहे.

हिंदपार्थ डेव्हलपर्सचा प्रत्येक ग्राहक हा संतुष्ट आणि समाधानी आहे. हिंदपार्थ डेव्हलपर्सने हळुहळू प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाला त्यांच्या मनासारख्या किमतीत आणि अतिशय उत्कृष्ट ठिकाणी जागा दिल्या आहेत. हि सेवा आजही अविरत सचोटीने चालू आहे.

आपला व्यवसाय कोणताही असू द्या आपण व्यवसायात चिकाटी, जिद्द ,संयम या बरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे प्रामाणिक असायला पाहिजे. प्रामाणिकपणा हा ‘हिंदपार्थ डेव्हलपर्स’चा श्वास आहे.

हिम्मत सुदाम धुमाळ, संतोष सुदाम धुमाळ

कंपनीचे नाव : HINDPARTH DEVELOPERS
आपला हुद्दा : मालक
व्यवसायातील अनुभव : 9 वर्षे
विद्यमान जिल्हा : पुणे

व्यवसायाचा पत्ता : HINDPARTH DEVELOPERS, A/p-Kunjirwadi,theurpahata, Tal-Haveli. Dist – Pune 412201.
ई-मेल : hindparthdevelopers@gmail.com
मोबाइल : 9075076868 । 9075076969
तुमची उत्पादने व सेवा : Selling of Developed Open bungalow plots.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!