Advertisement
उद्योगोपयोगी

इन्टाग्रामवर फॉलोवर्स कसे वाढवाल?

२००० सालापासून सोशल स्टेटसची व्याख्या कमालीची बदलली आहे महाग कपडे, महागडी घड्याळे यातून ठरणारी प्रतिष्ठा मागे पडत जाऊन आता फेसबुक-ट्विटरवरील फॉलोवर्ससारख्या गोष्टींवरून आता प्रतिष्ठा ठरू लागली आहे आणि त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्राम फॉलोवर्स.

हल्लीची तरुण पिढी फॉलोवर्स वाढवण्यासाठी अगदी काहीही करू शकते. काही उदाहरणे म्हणजे फेक अकाउंट बनवून स्वतःलाच फॉलो करणे; परंतु अशा पळवाटा फार फार तर चारशे ते पाचशे फॉलोवर्स गाठू शकते आणि त्यातूनही हे फॉलोवर्स खरे की खोटे हे समोरच्याला लगेच समजते. इंस्टाग्रामचे वाढते वर्चस्व पाहून अनेक उद्योजक प्रमोशन साठी त्याकडे आकर्षित होत आहेत.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

इन्स्टाग्रामवर प्रमोशन करायचे ठरवले तर तिथे आपले जास्तीत जास्त फॉलोवर्स असणे गरजेचे आहे. तर हे फॉलोवर्स कसे वाढवायचे ते आपण पाहू.

नवीन पेज उघडता क्षणी पैसे देऊन पेड जाहिरात करणे व्यर्थ ठरेल. कारण येणारा ट्रॅफिक (नवीन लोक) तुम्हाला तुमचे सद्य फॉलोवर्स पाहूनच पारखत असतो. त्यामुळे साधारण १००-२०० फॉलोवर्सचा टप्पा पार केल्यानंतरच पेड जाहिरात उत्तम ठरते.

आपल्या कोणत्या पोस्टला लोक कसा प्रतिसाद देतात यावरून कशाप्रकारच्या पोस्ट्स जास्त करायला हव्यात आणि कोणत्या पोस्ट टाळायला हव्यात याचा अभ्यास करून लोकांच्या पसंतीप्रमाणे पोस्ट्स करणे गरजेचे आहे. केवळ सेल पोस्ट करणेही उपयोगाचे नाही आणि फक्त माहितीपर पोस्ट्स करत बसणेसुद्धा व्यर्थ ठरेल.

तुमच्या अकाउंटचा रीच वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे पर्याय लक्षात म्हणजे हॅशटॅग (#), स्टोरीज, लोकेशन आणि इंस्टाग्राम साजेशन्स. या सर्वाचा कुठे, किती आणि केवढा वापर करायचा हे समजणे महत्त्वाचे आहे.

नवे पेज उघडल्यावर त्यात कमीत कमी चार व जास्तीत जास्त दहा पोस्ट्स टाकणे उत्तम ठरते व त्याचप्रमाणे रोज साधारण दोन-तीन स्टोरीज पोस्ट केल्यात तर तुमचे अकाऊंट ऍक्टिव्ह असल्याची खात्री समोरच्याला होते.

आपल्या फॉलोवर्समध्ये अशा लोकांचा जास्तीतजास्त समावेश असायला हवा ज्यांना आपल्या उत्पादनांची आवड/ गरज आहे.

फॉलोवर्सची हजारी गाठेपर्यंत इतरांना फॉलो करण्यात कंजुषी करणे व्यर्थ ठरेल, परंतु जे फॉलो बॅक करत नाहीत त्यांची साथ सोडणेच हितावह ठरेल, कारण त्यांना आपल्या उत्पादनात रस नाही हे यातून दिसते.

तुमच्या पोस्टमधील हॅश टॅग हे त्या पोस्टशी निगडीत असावेत. हॅश टॅगचा वापर करताना नैतिक व अनैतिक भाषा यात अगदी बारीक लक्ष्मणरेशा असते ती न ओलांडणेच चांगले.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

तुमच्या उद्योगाशी निगडीत हॅश टॅग सर्च करून तुम्हाला तुमच्या स्पर्धकांना ओळखता येईल व तुमच्या टारगेट सेगमेंटची माहिती होईल. हे हॅशटॅग फॉलो करणाऱ्या लोकांना प्रथम फॉलो करावे. ज्यांना तुमचे उत्पादन, तुमच्या पोस्ट्स आवडतील ते अवश्य फॉलो-बॅक करतील. हे करताना एक मात्र लक्षात ठेवायला हवे की आपल्याला माहीत नसलेल्या लोकांच्या तीन किंवा त्याहून अधिक पोस्ट्स जर तुम्ही लाईक केल्यात तर तुम्हाला स्पॅमर ठरवले जाते.

एकदा २०० फॉलोवर्स गाठलेत, की वेळ येते पेड जाहिरातीची. इन्स्टाग्रामवर एखादी जाहिरात करण्याचा खर्च साधारण दीड हजार रुपयांच्या आसपास जातो, परंतु ही एक महत्त्वाची गुंतवणूक ठरते. इंस्टाग्राम स्वतःहून एक टारगेट सेगमेंट ठरवते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःचे सेगमेंट ठरवूनही प्रमोशन करू शकता. जितका जास्त ऑडिअन्स ठरवाल तेवढे जास्त पैसे हे लक्षात असावे.

सध्या बाजारात अनेक अनैतिक मार्गांनी पेड अथवा फुकटात देखील फॉलोवर्स मिळतात, परंतु उद्योजकांनी अशा मार्गांचा अवलंब न करणेच हिताचे. कारण हे फॉलोवर्स ॲक्टिव नसल्याने फक्त फॉलोवर्स वाढतात, परंतु फॉलोवर्स ची संख्या हजार आणि लाईक्स फक्त दहा हे पाहिल्यावर तुम्ही लगेच पकडले जाल आणि इन्स्टाग्राम तुमचे अकाउंट बंद करेल. याने आपली विक्री तर अजिबात होणार नाहीच उलट लोकांच्या मनात तुम्ही स्पॅमर ठराल.

त्यामुळे नैतिकतेने काहीसा वेळ आणि पैसा गुंतवून इन्स्टाग्राम प्रमोशन करणे हेच योग्य ठरते व इंस्टाग्रामच्या युगात तुमच्या पोस्टची सर्जनशीलता व बोलकेपणा यांमार्फत अनेक नवीन लोकांपर्यंत पोचून विक्री वाढवणे शक्य होते.

– चैतन्य जाधव
jchaitanya72@yahoo.com

Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: