घरातच सुरू करा छंद वर्ग

मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी आजचे पालक जास्त जागरूक असतात; परंतु पुस्तकात आकंठ बुडालेली मुलं पाहिली की त्यांना चिंता वाटत राहते. त्यामुळे मुलांना थोडा वेळ मिळाला, की त्यांना खूप आनंद होतो.

अशा वेळी ते मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे विविध मार्ग शोधत असतात. त्यामुळे आज छंद वर्ग हा एक चांगला पर्याय लोकांना वाटू लागलाय. त्यामुळेच आज छंद वर्गाची मागणीही वाढते आहे.

या व्यवसायाला आज सुगीचे दिवस आलेत. तुमच्याकडे हस्तकला, संगीत, अभिनय, चित्रकला इत्यादी प्रकारच्या कलागुणांची जाण असेल, तर घरच्या घरी या व्यवसायाची सुरुवात करता येते. मुलांच्या सुट्टीच्या कालावधीत व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. मुलांकडूनच त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी होऊन व्यवसायवृद्धी होऊ शकते.

बीजभांडवल : तुमच्याकडे जागा आहे असे गृहीत धरले तर सुरुवातीला तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपये बीजभांडवलाची आवश्यकता असेल. गृहउद्योग म्हणून या व्यवसायाची घरातून सुरुवात करता येऊ शकते.

गुंतवणुकीवर परतावा : व्यवसायात गुंतवलेली गुंतवणूक परत मिळण्यासाठी कमीत कमी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.

साधनसामग्री :  विशिष्ट अशा कोणत्याही ट्रेनिंगची आवश्यकता नाही. तुमचं स्वत:चं कसब हे महत्त्वाचं आहे.

ऑफिससाठी आवश्यक : १० x १० ची एक खोली. स्वत:चा इंटरनेटसह लॅपटॉप, फोन, प्रिंटर, फॅक्स, ऑफिसची स्टेशनरी, व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड इ., एक असिस्टंट आणि छंद वर्गानुसार आवश्यक सामग्री इ.

परवाना आणि परवानगी : तुम्ही घरातून व्यवसाय करणार असाल तर सोसायटीची परवानगी आवश्यक आहे. सोबत उद्योग आधारही काढून घ्या.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?