डीटीपी : घरून करता येण्यासारखा व्यवसाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


घरून करता येण्यासारखा व्यवसाय म्हणून डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) हा एक चांगला पर्याय आहे. स्त्री-पुरुष दोघांसाठीही हा सोयीचा व्यवसाय आहे. घरातील वैयक्तिक संगणकापासून याची सुरुवात करता येऊ शकते. सोबत थोडे मुद्रणाचे ज्ञानही असल्यास तुम्हाला छपाईची कामेही घेता येतात व चांगले अर्थार्जन होते.

डीटीपीमध्ये कॉम्प्युटराइज टायपिंग, फोटो एडिटिंग, ले-आउट डिझायनिंग, प्रोसेसिंग या गोष्टी अंतर्भूत आहेत. यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. मात्र हल्ली डीटीपी कोर्सच्या नावे काहीही खपवले जाते, त्यामुळे कोर्स निवडताना काय काय शिकवले जाणार आहे, याची व्यवस्थित चौकशी करावी.

इन्स्टिट्यूटमधून शिकण्यापेक्षा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून व्यक्तिगत शिकणे अधिक चांगले. डीटीपीच्या कामांसाठी लॅपटॉपपेक्षा डेस्कटॉप कॉम्प्युटरच चांगला. सोबत मराठी, हिंदी, गुजराती अशा प्रादेशिक भाषांमध्ये सेवा देता याव्यात यासाठी भाषेची सॉफ्टवेअर्स घेणे गरजेचे आहे.

इंग्रजीमध्ये टाइपिंग करणे कोणत्याही संगणकावरून शक्य आहे मात्र प्रादेशिक भाषांमध्ये भाषेच्या सॉफ्टवेअरशिवाय डीटीपी करणे शक्य नसते, त्यामुळे तुमच्याकडे प्रादेशिक भाषांमध्ये डीटीपी करून मिळत असेल तर खूप काम मिळू शकते.

डीटीपी करण्यासाठी मुख्यत: मायक्रोसॉफ्टचे एम.एस.वर्ड, एडॉबचे पेजमेकर अथवा इन-डिझाइन, फोटोशॉप व इल्युस्ट्रेटर ही सॉफ्टवेअर्स लागतात. दुसरे एक कोरेल हे सॉफ्टवेअरही वापरले जाते. एडॉबचे इल्युस्ट्रेटर हे कोरेल-ड्रॉप्रमाणेच आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांची सॉफ्टवेअर्स वापरायलाच हवीत असे नाहीय. सॉफ्टवेअर्स शक्यतो विकत घेतलेली असावीत.

प्रकाशन क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, विधिविषयक कामे करणारे असे तुमचे संभाव्य ग्राहक होऊ शकतील. काम मिळवण्यासाठी वैयक्तिक ओळखींचा उपयोग होऊ शकतो. तसेच तुमची स्वत:ची वेबसाइट असल्यास गुगलद्वारे अनेक लोक तुमच्यापर्यंत काम करून घेण्यासाठी पोहोचू शकतील.

जस्ट डायल, सुलेखा, यल्‍लो पेजेस अशा बिझनेस वेबसाइटवर नोंदणी केल्यास त्यावरूनही ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. मात्र त्यांची पेड पॅकेजेस घेण्यापूर्वी सारासार विचार करूनच मग निर्णय घ्यावा. अन्यथा चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशातली गत होऊ शकेल. ‘प्रकाशन विश्‍व’ या प्रकाशनविषयक डायरीमध्ये तुमची नोंद जरूर करा.

व्यवसायाची नोंदणी सोल प्रोप्रायटरशिप अथवा भागीदारी स्वरूपाची घेता येऊ शकेल. नव्याने आलेली ‘वन पर्सन कंपनी’ हाही नोंदणीसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. व्यावसायिक तसेच आयकर भरणे सयुक्तिक होते. करविषयक कर सल्लागार अथवा चार्टर्ड अकाऊंटंटचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?