कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाने सुचवलेले घरगुती उपाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आज मोदींनी आपल्या भाषणात सामान्य माणसाकडून सात अपेक्षा व्यक्त केल्या. या सात अपेक्षांमध्ये मोदींनी आपल्याला कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाने आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सुचवलेले घरगुती उपाय करायला सांगितले आहेत. हे घरगुती उपचार नेमके काय आहेत जे जाणून घेऊ :

आयुष मंत्रालयाने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सांगितलेले उपाय :

१. दिवसभर कोमट पाणी पित राहणे.

२. दररोज किमान ३० मिनिटे योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा या गोष्टींचा अभ्यास करणे.

३. आहारात हळद, जिरे, धने आणि लसूण यांसारख्या मसाल्यांचा समावेश फायदेशीर ठरेल.

आयुर्वेदिक उपाय :

▪️ रोज सकाळी १० ग्रॅम (१ छोटा चमचा) च्यवनप्राशचे सेवन करावे. मधुमेहींनी शुगर-फ्री च्यवनप्राशचे सेवन करावे.

▪️ तुळस, दालचिनी, काळीमिरी, सुंठ आणि मनुका यांचा वापर करून बनवलेला काढा किंवा गवती चहा दिवसातून एकदा किंवा दोनदा पिणे. चवीनुसार लिंबाचा रस किंवा गूळ समाविष्ट करता येईल.

▪️ हळदीचे दूध : दिवसातून एक किंवा दोन वेळा १५० मिली दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यावे.

काही सोप्या आयुर्वेदिक प्रक्रिया :

▪️ सकाळ-संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तूप, खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल सोडणे.

▪️ १ चमचा तिळाचे किंवा खोबरेल तेल घेऊन २ ते ३ मिनिटे चूळ भरावी, त्यानंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करावे. हे दिवसातून एक-दोनदा करणे फायदेशीर ठरेल.

सुका खोकला किंवा घसा दुखत असेल तर :

▪️ दिवसातून एकदा ताजा पुदिना किंवा ओवा याची वाफ घ्यावी.

▪️ खोकला किंवा घशात खवखव असल्यास दिवसातून २-३ वेळा गूळ किंवा मधासोबत लवंग पावडरच्या मिश्रणाचे सेवन करावे.

▪️ या उपायांचा उपयोग सौम्य स्वरूपाच्या खोकला किंवा घशातील दुखण्यावर करावा. तरीही लक्षणांमध्ये सातत्य असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?