कंपनी बजेट तयार कसे होते आणि कार्यान्वित कसे होते?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


या लेखात आपण बजेट आणि बजेटरी कंट्रोल या अत्यंत महत्त्वाच्या नियंत्रणांबद्दल माहिती घेणार आहोत. अमेरिकेतील मनी आणि मॅनेजमेंटवरील प्रसिद्ध लेखक डेव्ह रॅमसे यांचं मत आहे की, “A budget is telling your money where to go instead of wondering where it went .”

बजेट म्हणजे काय?

बजेट म्हणजे अंदाजपत्रक. उद्योजकाला जे काही करायचे आहे, त्याची संख्यात्मक मांडणी. जी काही आर्थिक आणि कार्यरत साधनं लागणारी असतील, ती एका विशिष्ट काळात वापरून आपली उद्दिष्टे कशी गाठायची, म्हणजे बजेट.

बजेट हे operational असू शकते, म्हणजे काही प्रमाणात किंवा financial असू शकते, म्हणजे मूल्यात किंवा operational आणि financial दोन्ही असू शकते.

बजेट केव्हा बनवावे?

भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिल ते पुढच्या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत असते. बहुतकरून बजेट हे या एका वर्षांसाठी बनवलं जाते. जानेवारी महिन्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे बजेट बनवले जाते आणि मार्चपर्यंत मॅनेजमेंटची मान्यता मिळवून ते सगळ्या डिपार्टमेंटना आगामी वर्षासाठी अंमलबजावणी करायला सांगितले जाते. कधी कधी मॅनेजमेंटच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त कालावधीसाठीसुद्धा बनवले जाते.

बजेट कोणी बनवावे?

यात दोन पर्याय असतात :

१) Top-down approach: यात वरिष्ठ मॅनेजमेंट बजेट ठरवते आणि कंपनी त्याची अंमलबजावणी करते.

२) Bottom-up approach: यात कनिष्ठ पातळीवर बजेट्स ठरवली जातात आणि मग मॅनेजमेंटकडून मान्यता घेतली जाते.

कधी कधी दोन्ही पर्यायांचे हायब्रीड करून बजेट तयार करतात.

बजेटसाठी माहिती कशी मिळवावी?

१) मागील काही वर्षांचा डेटा- उत्पन्न , खर्च इत्यादी
२) प्रचलित बाजार परिस्थिती
३) हातात असलेले करार आणि ऑर्डर्स
४) आर्थिक अंदाज

५) मॅनेजमेंटचे व्हिजन
६) नवीन व्यवसायाच्या कल्पना, नवीन ग्राहक, नवीन मशीनरी इम्पलेमेंटेशन
७) कुठले तोट्यातले व्यवसाय बंद करायचे मॅनेजमेंटचे निर्णय

बजेटमध्ये काय असावे?

डिपार्टमेंट, division आणि संपूर्ण कंपनी या वेगवेगळ्या, पण संलग्न पातळ्यांवर बजेट्स बनवतात. वार्षिक बजेट हे तिमाही आणि मासिक यानुसार विभागले जाते. सामान्यत: कंपनी लेवल बजेटमध्ये खालील बजेट अंतर्भूत असतात :

१) विक्री बजेट (Sales Budget)
२) उत्पादन बजेट (Production Budget)
३) लागणाऱ्या मालाचे बजेट (Raw materials requirement Budget)
४) खरेदी बजेट (Procurement Budget)

५) कामगारांची संख्या आणि वेतन बजेट (Direct labor Costs Budget)
६) उत्पादन overheads बजेट (Manufacturing overheads Budget)
७ ) कर्मचारी संख्या आणि वेतन बजेट (Staff Costs Budget)
८) विक्री आणि प्रशासन खर्च बजेट (Budgeted Selling and administrative costs)

९) उपकरणे, यंत्रसामग्री, प्रॉपर्टी इत्यादींचे बजेट ( Capital acquisitions Budget)
१०) रोख प्रवाह बजेट (Budgeted Cash Flow)
११) अर्थसंकल्पात नफा आणि तोटा (Budgeted Profit & Loss)
१२) बजेट – ताळेबंद (Budgeted Balance Sheet )

बजेटरी कंट्रोल म्हणजे काय?

१) एकदा का बजेट मंजूर झालं, की त्याची अंमलबजावणी होते. सगळ्या डिपार्टमेंट्स यांना त्यांचे काम, विक्री, उत्पादन इत्यादींबद्दल कळवले जाते. त्यामुळे त्यांना महिन्याची अपेक्षित कामगिरी समजते.

२) महिना संपला की मग वास्तविक कामगिरीचे मापन (measurement of actual performance) केले जाते.

३) अपेक्षित कामगिरी आणि actual परफॉर्मन्स – यांची तुलना करून तफावत मोजली जाते.
४) अपवादात्मक आणि लक्षणीय तफावत यावर वैयक्तिक Department किंवा division चे प्रमुख हे शोध घेतात. अपवादात्मक आणि लक्षणीय तफावत, त्याची कारणे आणि नियोजित उपाय यावर मॅनेजमेंटला अहवाल दिला जातो.
५) मॅनेजमेंट या अहवालावर आढावा घेते आणि योग्य ती देखरेख ठेवते.

– सीए. जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?