२०२२ मध्ये म्युच्युअल फंडामध्ये किती संधी आणि किती जोखीम?

सध्या शेयर बाजार खूप वरच्या पातळीवर आहे. बाजाराचे सर्व सूचक बाजार गुंतवणुकीसाठी जास्त महाग आहे हे दर्शवतात. म्हणजेच एकरकमी गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडमध्ये जोखीम खूप जास्त आहे. त्याचबरोबर डेट फंड जे स्थिर परतावा देतात, व्याजदर अतिशय कमी असल्याने आता कालचक्र बदलेल.

२०१८ पासून आतापर्यंत व्याजदर खाली येत राहिले, मात्र यापुढे व्याजदर वाढण्याचे अथवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी डेट फंडमधून कमी परतावा मिळेल. अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे.

१) ज्यांना एसआइपीमार्फत गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपल्या आर्थिक उद्दिष्टासाठी पूरक योजना निवडून एसआइपी चालू करावी. जर शेयर बाजार खाली आला तर अशावेळी पाच-सहा महिन्यांसाठी आपली एसआइपी वाढवावी जेणेकरून बाजाराच्या खालच्या पातळीवर जास्त युनिट्स जमा करता येतील.

२) ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपली मोठी रक्कम डेट फंडमध्ये (कर्जरोखे योजना) गुंतवून इक्विटी फंड (समभाग योजनांमध्ये) एसटीपीमार्फत (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन) प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला आपल्या एकूण रकमेच्या दोन ते चार टक्के रक्कम एसटीपीमार्फत इक्विटी फंडमध्ये वळती करावी जेणेकरून बाजाराच्या पतझडीची भीती राहणार नाही.

समजा बाजार जास्त खाली आले तर आपल्या डेट फंडमधील गुंतवणुकीतून २५ ते ४० टक्के मोठी रक्कम इक्विटी फंडमध्ये वळती करावी आणि बाजाराच्या पतझडीमध्ये जास्त युनिट्स मिळवण्याचा लाभ आपण घेऊ शकतो.

३) ज्यांना जास्त जोखीम घ्यायची नाही त्यांनी फक्त डेट फंडमध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार नाही. अशा गुंतवणुकदारांनी डेट हायब्रीड फंड किंवा इक्विटी सेविंग फंड या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करावी. ज्यात इक्विटीचे प्रमाण खूप कमी असते. काही कारणाने बाजार खाली आल्यास बाजाराच्या खालच्या पातळीवर आपण इक्विटी हायब्रीड फंड या कॅटेगरीमध्ये वळती करून लाभ घेऊ शकतो.

४) ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची आहे आणि थोडीफार जोखीमही घ्यायची आहे त्यांनी म्युच्युअल फंडची बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करावी. या कॅटेगरीमध्ये म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर बाजाराच्या चढउताराप्रमाणे आपल्या योजनेतील इक्विटीचे प्रमाण कमी जास्त करतात.

सध्या बाजार खूप वर असल्याने इक्विटीचे प्रमाण साधारण ३५ ते ४० टक्के आहे, तेच मार्च २०२० जेव्हा बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला होता, त्यानंतर बाजाराच्या खालच्या पातळीवर इक्विटीमधील गुंतवणूक ७५ ते ८० टक्के इतकी वाढवली होती.

म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि कर कार्यक्षम तसेच महागाईवर मात करणारा परतावा मिळवा.

– निलेश तावडे
संपर्क : 9324543832
(लेखक म्युच्युअल फंड सल्लागार आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?