Advertisement
उद्योगोपयोगी

विक्री वाढवून व्यवसाय वाढवण्यासाठी नक्की वाचा

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd
 • मी यशस्वी विक्रेता होणारच हा निश्चय करूनच व्यवसायात उतरा. सेल्सपर्सन किंवा मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह या दोन्ही करिअरमध्ये आता इतर कुठल्याही व्यवसाया इतकीच संधी, प्रतिष्ठा आणि पैसा आहे.
 • नाईलाज म्हणून दुसरी नोकरी मिळत नाही म्हणून किंवा दुसरी नोकरी मिळेपर्यंत जरी तुम्ही विक्रेते म्हणून काम करणार असाल तरीदेखील जेवढा काळ विक्रेते म्हणून काम कराल ते प्रामाणिकपणे, मेहनतीने, निष्ठेने आणि कल्पकतेने केलेत तर पुढील आयुष्यात तुम्ही आपल्या कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल कारण विक्री कला ही कुठल्याही व्यवहाराचा मुलभूत पाया आहे.

 यशस्वी विक्रेता होण्यासाठी तुम्ही तुमचे मन आणि तन दोन्हींची सिद्धता करणे, राखणे आवश्यक असते.

 • विक्री व्यवहार हा वैयक्तिक तसाच सामुहिक प्रयोग-प्रकल्प असतो, म्हणजेच इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि टीमवर्क यातूनच सेल आणि मार्केटिंग या गोष्टी यशस्वी होतात.
 • आधी तुमचे स्वप्न काय आहे ते निश्चित करा, ध्येय, साध्य, उद्दीष्ट ठरवा आणि मग त्यासाठी कोणती साधने तुमच्याकडे उपलब्ध आहेत आणि किती वेळात काय मिळवायचे आहे, करायचे आहे याचे टाईमटेबलदेखील आखा.

WhatsApp द्वारे ‘स्मार्ट उद्योजक’ वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd


पॉझिटिव्ह ॲटीट्युड, सकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्तीच यशस्वी विक्रेता होऊ शकते.

 • प्रश्न विचारण्यापेक्षा मनात आलेल्या प्रश्नांना आपणच उत्तरे शोधणे हे अधिक श्रेयस्कर असते.
 • कारणे सांगणे, बहाणे करणे, अमुक एक मला शक्य नाही, अमुक एक आवश्यक नाही, ते माझे काम नाही, ते मला जमणार नाही, हे कठीण आहे अशी कोणतीही सबब सांगणारा चांगला विक्रेता, यशस्वी विक्रेता होऊच शकत नाही, हे लक्षात घेऊन वागा.
 • समस्यांचा बाऊ न करता समस्यांतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.
 •  स्वत:च्या चुका, दोष, उणीवा प्रामाणिकपणे कबुल करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. आपल्या अपयशासाठी दुसऱ्याला जबाबदार धरून मोकळे होऊ नका.
 • स्वप्ने पाहून ती सत्यात उतरत नाहीत तर जागे होऊन ती स्वप्ने पूर्ण करावी लागतात. त्यामुळे दिवास्वप्ने पाहणे सोडून द्या आणि निश्चय करून कामाला लागा.

कुणालाही कसलीही आश्वासने देऊ नका, तर वचन द्या आणि ती कटाक्षाने पुरी करा. न पाळता येणारी आश्वासने कधीही देऊ नका.

 • सेल्सपर्सन म्हणून तुम्ही वैयक्तिक कामगिरी बजावण्याबाबत उत्साही असलात तरी शेवटी तुम्ही एका यंत्रणेचे, टीमचे भाग आहात भान कधीही सोडू नका.
 • कुणीतरी, काहीतरी, केव्हातरी माझ्यासाठी करील असे न मानता ती माझ्यासाठी आणि माझ्या व्यवस्थापनासाठी काय करू शकतो याचाच विचार करून त्याप्रमाणे दैनंदिन स्वरुपात ते करून दाखवा.
 • तुमच्या दुकान, शोरूम, मॉल, रिटेल स्टोअर्स याच्या व्यवस्थापनाच्या नफ्यात, फायद्यात तुमचा फायदा आहे हे लक्षात घेऊन संपूर्ण व्यवस्थापनाला फायद्यात राहण्यासाठी मदत करणारे आपण एक घटक आहोत याची जाणीव ठेऊनच तुमच्या स्वत:च्या फायद्याचा विचार करा.
 • मन प्रसन्न राहील आणि ग्राहकांचे, सहकार्‍यांचे, व्यवस्थापनाचे प्रेम, आदर, मान्यता, प्रशंसा, कौतुक, पारितोषिक मिळेल यासाठी सदैव जागृत राहा.

इच्छा असेल असेल तिथे मार्ग सापडतो त्याचप्रमाणे इच्छा हीच यशाची गंगोत्री असते, त्यामुळे तुमची इच्छाशक्ती प्रबळ ठेवा.

 • जगात कष्टाला, मेहनतीला, परिश्रमांना कधीही पर्याय नसतो. तुमचे कष्ट तुम्हाला आयुष्यात आणि करिअरमध्ये असे यश देतील की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्यामुळे आळशीपणा सोडणे आणि कष्टाची सवय लावून घेणे आवश्यक आहे, हे लक्षात आहे.
 • जबाबदारी स्वीकारणार्‍या व्यक्तीवरच अधिक जबाबदार्‍या, पदे दिली जातात, तिचा उत्कर्ष आणि पदोन्नती अधिक वेगाने होते, म्हणून जबाबदार्‍या स्वीकारण्यास कधीही टाळाटाळ करू नका, किंबहुना तुमच्या कामाचा भाग म्हणून सोपवलेल्या जबाबदार्‍या व्यवस्थापनाकडून मागून घेऊन त्या पुर्ण करून व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करा.
 • जबाबदारी स्वीकारणार्‍या व्यक्तीवरच अधिक जबाबदार्‍या, पदे दिली जातात, तिचा उत्कर्ष आणि पदोन्नती अधिक वेगाने होते, म्हणून जबाबदार्‍या स्वीकारण्यास कधीही टाळाटाळ करू नका, किंबहुना तुमच्या कामाचा भाग म्हणून सोपवलेल्या जबाबदार्‍या व्यवस्थापनाकडून मागून घेऊन त्या पुर्ण करून व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करा.
 • एक विक्रेता म्हणून नोकरी करीत असताना माझ्या वैयक्तिक जीवनातील गुणदोषांचा किंवा बऱ्या-वाईट गोष्टींचा माझ्या कामाशी काय संबंध अशी भूमिका कधीही घेऊ नका. कारण तुमचे चारित्र्य हे केवळ वैयक्तिक बाब नसते तर सार्वजनिक जीवनातही तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन तुमच्या चारित्र्यांच्या आधारेच ठरत असतो. चारित्र्यवान व्यक्तीच आदरास पात्र ठरते. चारित्र्यहीन व्यक्ती आर्थिक उलाढालीत कितीही यशस्वी झाली तरी तिला लोकांची मान्यता, आदर, प्रतिष्ठा लाभत नाही.तुम्ही जे ‘देता’ ते तुम्हाला अनेक पटीने परत मिळत असते, त्यामुळे तुमची शक्ती, बुद्धी, क्षमता, योग्यता, पात्रता, कल्पकता यांच्या साहाय्याने जेवढे योगदान देता येईल तेवढे द्या. म्हणजे तुम्हालाही अनेक पटीने तुमच्या व्यवस्थापनापासून समाजापर्यंत सर्व बाजूने त्याची परतफेड झालेली दिसेल.

‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd


 • माणसाने जन्मभर शिकत रहायचे असते. एकदा नोकरी मिळाली तर आता मला शिकायची काय गरज आहे? असे न मानता उलट नोकरी ही देखील माझ्या शिक्षणाचाच एक भाग आहे आणि यातून मी जे शिकेन त्यातून मी अधिक मोठा आणि शहाणा होईन, अधिक यशस्वी विक्रेता होईन ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवा.

प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. व्यवस्थापनाची किंवा सहकाऱ्यांची फसवणूक कधी ना कधी त्यांच्या लक्षात येतेच. मग तुमची विश्‌वसनीयता संपल्यावर तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि संशयाने बघतो. परिणामी तुमची करिअर आणि कारकीर्द बदनाम आणि खराब होते.

 • तुमच्या चुका सुधारत असतानाचा इतरांच्या चुका लक्षात आणून द्या. तुम्ही त्यांच्या चुकांपासून सुधारून या चुका तुमच्या हातून होणार नाहीत याची खबरदारी घ्या आणि दुसऱ्यांच्या चुकांबाबत नेहमीच क्षमाशीलतेने वागा.
 • तुमच्या आस्थापनातील अन्य कर्मचारी गप्पाटप्पा, टंगळमंगळ, किंवा चकाट्या पिटण्यात, एकमेकांची निंदानालस्ती करण्यात, गॉसिपिंग करण्यात अफवा पसरवण्यात किंवा व्यवस्थापनाची खिल्ली उडवण्यात किंवा एखाद्या व्यक्तीची चेष्टा करण्यात आनंद घेत असतील तर त्यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहा आणि त्यांनाही असे करणे सर्वांच्या सामुहिक हिताचे नाही यातून मने दुरावतात आणि हितसंबंध दुखावतात याची जाणीव द्या.
 • तुमच्यात कोणते विशेष गुण विक्रीकौशल्याच्यादृष्टीने आहेत हे तुम्हीच शोधून काढा आणि हिरा ज्याप्रमाणे पैलू पाडल्यावर अधिक तेजाने झळकतो त्याप्रमाणे तुमच्यातील गुणांना पैलू पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. प्रयोग करा. अभ्यास करा आणि आपल्या यशस्वी सेल्सपर्सन होण्याचा उद्देश सफल होण्यासाठी सातत्याने वाटचाल करा.
 • गोष्टी वेळच्या वेळी करणे, कोणती गोष्ट करण्याची वेळ कोणती हे ओळखणे तुमच्या आयुष्यात यश वेळेवर मिळण्यासाठी आवश्यक असते हे ध्यानात ठेवा.

आत्मविश्वास ही तुमच्या यशाची गुरूकिल्ली आहे. हे लक्षात ठेवून जे काही कराल ते आत्मविश्वासाने करा.

 • तुमच्या मतांविषयी आग्रही रहा, पण दुराग्रही राहू नका. इतरांच्या मतांचा आदर करायला शिका, त्यांची मते ऐकून घेऊन त्यावर विचार करायला शिका आणि मतभेदामुळे मनभेद होणार नाहीत अशी खबरदारी मतैक्य करायचा प्रयत्न करा.
 • जीवनात संधी कुठे आहे आणि ती आपल्याला कशी साधता येईल याविषयी जागरूक राहिलात तर तुम्हाला पश्चात्ताप करण्याची किंवा अमुक एक गोष्ट करण्यास मी लायक असून मला मिळाली नाही अशी खंत करण्याची वेळ येणार नाही. व्यवस्थापनाचे विक्रेत्यांवर बारकाईने लक्ष असते त्यामुळे चांगल्या विक्रेत्याला चांगली संधी देण्यासाठी तेही उत्सुक असतात. अशा संधीचा शोध सतत घेत रहा.
 • रोज वर्तमानपत्राचे आणि आठवड्यातून एखाद्या पुस्तकाचे वाचन करून आपले जनरल नॉलेज असे अप-टू-डेट ठेवा की ग्राहक, सहकारी, व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधताना, संभाषण करताना तुम्हाला आपल्या हजरजबाबीपणाचे, प्रसंगावधानाचे आणि संभाषण चातुर्याचे यशोचित दर्शन घडवता येईल.
 • ग्राहकांशी बोलताना छोटी छोटी वाक्ये, सोपे सोपे शब्द वापरा, अवघड इंग्रजी, मराठी, संस्कृत किंवा हिंदी शब्द, कृत्रिम वाटणारे आणि ग्राहकाला बुचकळ्यात टाकणारे फिल्मी डायलॉग किंवा लांबलचक वाक्ये वापरू नका.

बोलण्याची स्वत:ची अशी एक शैली विकसित करा.

 • बोलताना अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने आणि हसऱ्या मुद्रेने ग्राहकाशी बोला.
 • समोरच्या ग्राहकाचे आधी मन जिंकायचे आहे, मग मत वळवायचे आहे, नंतर त्याला ग्राहक म्हणून उत्पादन खपवायचे आहे हे लक्षात घेऊन त्याचे मन जिंकण्यासाठी त्याला प्रभावित करणे हा विक्रीकौशल्याचा पहिला टप्पा आहे याची जाणीव ठेवून आपले संभाषण प्रभावी कसे होईल याची काळजी घ्या.
 • ज्याप्रमाणे प्रॅक्टीस केल्याने खेळाडू परफेक्ट होतो, त्याचप्रमाणे विक्रेताही प्रॅक्टीस करता करता परफेक्ट होत असतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाशी व्यवहार करताना आपली प्रॅक्टीस जाणीवपूर्वक करा आणि आधीच्या प्रॅक्टीसमधून जे शिकलात त्याचा वापर करा.
 • ग्राहकाच्या संदर्भात त्याच्या बोलण्या-वागण्या-कपड्यावरून कसलाही पूर्वग्रह मनात निर्माण होऊ देऊ नका किंवा हा काय खरेदी करणार, नुसता बघायला आला आहे अशा तऱ्हेची भूमिका मनात घेऊ नका, तर प्रत्येक ग्राहक मग तो गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत कसाही असो हा माझ्या दृष्टीने याक्षणी व्ही.आय.पी. आहे याच पद्धतीने त्याचे आगतस्वागत आणि व्यवहार करा.
 • ज्याप्रमाणे वाचन, लेखन करताना किंवा टीव्ही, चित्रपट पाहताना तुम्ही चित्त एकाग्र आणि डोळे खिळवून त्या गोष्टीकडे पाहता त्याचप्रमाणे एकदा ग्राहक तुमच्यासमोर आल्यानंतर तुमचे चित्त अर्जुनाला दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्याप्रमाणे त्या ग्राहकावर केंद्रीत करा.
 • ग्राहक बोलत असताना त्याला चुकीचे किंवा खोटे ठरवू नका किंवा ज्याच्यामुळे त्याचा उत्साह, आत्मविश्वास डळमळीत होईल अशा तऱ्हेने कटाक्ष किंवा शब्द वापरू नका.

– अनिल थत्ते


Smart Udyojak | e-Magazines | All Issues

 


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: