दिवसभर घाम गाळत मिळेल त्या मजुरीवर लोकांच्या घरांचे इमल्यांवर इमले चढवणार्या कामगारास गवंडी कामगार असे म्हणतात. महाराष्ट्रात तीन लाखांवर गवंडी कामगार आहेत. बिल्डर किंवा ठेकेदारांमार्फत मोठमोठ्या वास्तूंची उभारणी होत असताना त्यात प्राण ओतणारा गवंडी कामगारच असतो.
सध्या गवंडी कामगार सरावातून किंवा दुसर्या कारागिराचे काम पाहून गवंडीकाम शिकले जाते. मात्र या कामगारांना शास्त्रोक्त शिक्षण दिल्यास बिल्डर व्यवसायास अधिक चालना मिळून गवंडी कारागीर तंत्रशुद्ध कार्यप्रणाली अंमलात आणतील. याचा मुख्य फायदा संपूर्ण बिल्डर क्षेत्रास होईल. याचाच विचार करून सध्या समग्र शिक्षणाच्या व्यवसाय शिक्षण योजनेतील मल्टी स्कील अंतर्गत गवंडीकामाचे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
यात प्रामुख्याने बिल्डींग मटेरीअलचा अभ्यास, वीट बांधकाम, मॉर्टर, कॉक्रिट तयार करणे, फेरो सिमेंटचे शिट तयार करणे, बांधकामाची कॉस्टिंग काढणे, वॉश बेसिन, सिमेंटची टाकी तयार करणे, कॉलम, बीम तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दहावीनंतर गवंडीकामाचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. यात गवंडीकामाचे सर्व प्रकारचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. मात्र यानंतर गवंडीकामाचा उच्च स्तरीय डिप्लोमा किंवा डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)सध्या बांधकामे ही अधिक पर्यावरणस्नेही व्हावीत यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहे. पर्यावरणस्नेही बांधकाम हे स्वच्छ भवितव्याची गुरुकिल्ली ठरणार आहेत, त्यामुळे हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. बांधकाम पर्यावरणस्नेही ठरवले जाते, तशी जाहिरात होते जोरात; पण ही बांधकामे पर्यावरणस्नेही असतात का?
देशात उत्पन्न होणार्या वीजेपैकी चाळीस टक्के वीज ही बांधकाम क्षेत्राच्या कामी येते. म्हणजेच बांधकामांचा वीजवापर कमी करण्यासाठीचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. पर्यावरणदृष्ट्या उत्सर्ग या प्रकारात मोडणारे घटक बांधकाम क्षेत्रात किती आहेत, ते कसे कमी करावेत, त्यासाठी बांधकाम साहित्यात कसे बदल करावेत यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
देशांतील बांधकामे पर्यावरणस्नेही किंवा ग्रीन असलीच पाहिजेत. बांधकाम क्षेत्रातील भरभराट हे स्थानिक पातळीवर पर्यावरणाच्या र्हासाचे तसेच जागतिक वातावरणीय बदलांचे मोठे कारण ठरत आहे. बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य, प्रकाशासाठी अथवा अन्य कारणांसाठी वापरली जाणारी ऊर्जा, वापरात येणारे पाणी आणि वापरून झालेल्या सांडपाण्याचा निचरा आदी पर्यावरणीय प्रश्न बांधकामक्षेत्रात महत्त्वाचे आहेत.
बाधकाम कारागीरांनी महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे आपली नोंदणी करावी. सलग नव्वद दिवसांचे काम केल्यावर त्याची अधिकृत नोंदणी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात पालिका मुख्याधिकार्यांकडे करून त्यांचेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यानंतरच कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळतो.
यात नोंदणीकृत गवंडी कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी वार्षिक ३५ हजार रुपये, शासकीय शिक्षणसंस्थेत वार्षिक १० हजार रुपयाचे अनुदान, ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्यास ५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान व अन्य शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते. कामावर असताना मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपये, वार्षिक १२ हजार रुपयांचे सहाय्य, गंभीर आजारात २५ हजार रुपयांची मदत, अपंगत्व आल्यास १ लाख रुपये, २ लाख रुपयांचा आरोग्य विमा अशा व अन्य एकूण १६ कल्याणकारी योजना आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गवंडीकाम हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महानगरपालिका, एल अँड टी, ऑडनस फॅक्टरी, विद्युत वितरण विभाग, बांधकाम विभागात बांधकाम पर्यवेक्षक म्हणून नोकरी मिळते. यात सुरुवातीला महिना वीस ते तीस हजार रुपये वेतन दिले जाते. स्किल पर्यवेक्षकांना तीस ते चाळीस हजार रुपये वेतन दिले जाते.
बांधकाम क्षेत्रात स्किल मिळवल्यास आणि स्वत:चा व्यवसाय केल्यास एक हजार ते बाराशे रुपये रोज कमवू शकता. सध्या फक्त जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच गवंडी हा अभ्यासक्रम उपलब्ध असून तो तालुका स्तरावरील आयटीआयमध्येदेखील सुरू केल्यास युवकांना निश्चितच फायदेशीर ठरेल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.