श्रीमंतीचा मंत्र


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


पैसा कमावण्याबरोबरच तुम्ही तो कसा गुंतवता आणि कसा खर्च करता हेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. विज्ञानानेसुद्धा असे सिद्ध केले आहे की, आपली वागणूक, आपले विचार बर्‍याच अंशी आपल्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून असतात.

‘श्रीमंती’ म्हणजे केवळ भरमसाठ पैसा नव्हे. श्रीमंती ही आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे. श्रीमंत लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचा जात्याच श्रीमंती टिकवून ठेवण्याकडे कल असतो. आयुष्य सोपे करण्याचा ते प्रयत्न करतात आणि जी गोष्ट त्यांना हवी असेल त्या गोष्टीसाठी आपण लायक आहोत अशी त्यांची विचारसरणी असते.

सामान्य लोक एखादी गोष्ट आपल्या लायकीच्या बाहेरची आहे असा विचार करून बर्‍याचदा आपल्या इच्छा पूर्ण करण्यापासून थांबतात. पण श्रीमंत लोक असा विचार कधीच करत नाहीत. ते कायम सकारात्मक विचार करतात. एखाद्या गोष्टीसाठी आपण लायक नाही असा विचार त्यांच्या मनात येत नाही.

श्रीमंत लोक असाच विचार करतात की, त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळावं. त्यांना जे हवं असेल ते मिळवण्याचा ते स्वत: प्रयत्न करतात. दुसर्‍याच्या परवानगीची वाट बघत बसत नाहीत. स्वत:ला त्यासाठी लायक समजून ती गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वत:च्या मनाला हिरवा कंदील देतात.

  • श्रीमंत होणं ही एक कला आहे.
  • श्रीमंत होणं ही एक सवय आहे.
  • श्रीमंत होणं हे एक चांगले व्यसन ही आहे.
  • श्रीमंत होण्यासाठी तशी मानसिकता तयार करावी लागते.

उद्योजकांना उपयुक्त टिप्स…

१. उद्योगावर प्रचंड प्रेम करा. तरच तुमचा उद्योग वाढेल, त्याचे तुम्हाला रिटर्न्स मिळतील.
२. आपला व्यवसाय आपल्या सभोवतालच्या 200 किमी परिसराच्या परिघात कसा वाढेल यावर लक्ष केंद्रीत करा.
३. उद्योग सुरू कराल त्या दिवसापासून बिझनेस नेटवर्किंग करायला सुरुवात करा. माणसं जोडा, उद्योग १०० टक्के वाढतो.

४. तुम्हाला गरज असेल तेव्हा कदाचित तुमच्या मदतीला कोणी माणूस उभा राहणार नाही, परंतु म्हणून इतरांना मदत करायचं बंद करू नका. तुम्हाला त्याची परतफेड मिळतेच हा निसर्गनियम आहे.
५. जे काही कराल ते आपल्या देशाला, समाजाला नजरेसमोर ठेवून करा.
६. व्यवसायवाढीसाठी कर्ज घ्यायला घाबरू नका. कर्ज अवश्य घ्या, पण वेळेवर परतफेड करा.
७. एखाद्याचं देणं लागत असाल आणि त्याचा फोन आला तर टाळू नका. फोन उचला. तुमच्यावरचा विश्वास कायम राहतो. व्यवसायात विश्वास खूप महत्त्वाचा.
८. कारखाना सुरू करताना तिथे तुम्ही वा तुमच्या घरातला एकतरी माणूस राहणारा असावा. तरच उद्योग वाढतो, सुरक्षित राहतो.
९. तुमचा उद्योगच तुमची ओळख असते. त्यामुळेच तुमची समाजात प्रतिष्ठा असते. तेव्हा उद्योग करा. पैसा कमवा.
१०. व्यवसायावर सुरुवातीला शंभर टक्के फोकस करा.

संपत्ती निर्माण करणं हे, झाड लावण्यासारखं आहे. सुरुवातीला तुम्ही त्याला दररोज पाणी देता. पुढे ते झाड एवढं मोठं होत की त्याला तुम्ही पाणी देण्याची गरज राहत नाही. याउलट तेच तुम्हाला सावली आणि फळ देतं.

श्रीमंत लोक संपत्ती जमा करतात. गरीब आणि मध्यमवर्गीय दायित्व. पैसे नसण्याच खरं कारण आहे की लोकांना संपत्ती आणि दायित्व यामधला फरक कळत नाही. श्रीमंत बनायचं असेल, तर संपत्ती घेत राहा. गरीब बनायचं असेल तर दायित्व घेत राहा. कळपासोबत चालणे आणि शेजार्‍यांच्या ऐशोआरामाची नक्कल करणे, अनेक समस्यांचं मूळ आहे.

शाळा वास्तविक जीवनासाठी मुलांना तयार करते का?

शाळांना यासाठी बनवलं आहे की तिथे चांगले कर्मचारी तयार होतील, मालक नाही. संपत्तीचा विषय शाळेत नव्हे तर घरी व बाजारात शिकवला जातो. कदाचित म्हणूनच श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात, तर गरीब अधिक गरीब. आणि मध्यमवर्गीय कर्जात डुबून राहतात. श्रीमंत लोक संपत्ती विकत घेतात.

श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. तर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात. जीवन तुमच्याशी बोलत नाही, ते तुम्हाला धक्का देतं. प्रत्येक धक्का ही सूचना असते की यातून काही शिका, धडा घ्या. तुमची समस्या तुम्ही स्वत: आहात. तुम्ही स्वत:ला बदलू शकता, शिकू शकता, जास्त समजदार बनू शकता.

अनेक लोकांना जग बदलायचं असत, पण स्वत:ला बदलायचं नसतं. स्वत:ला बदलणे हे जग बद्दलण्यापेक्षा सोपं आहे. अनेक लोकांचं नोकरी करण्यामागचं कारण भीती हेच असतं. पैशांपासून दूर पळणे हा तेवढाच मोठा मूर्खपणा आहे जेवढा की पैशांमागे पळणे.

आपली खरी आर्थिक समस्या पैसा कमवणे नसून खर्च करणे आहे, कारण पैसा येतो एकाच वाटेने, पण जातो किमान दहा वाटांनी, त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा तो टिकवणे आणि त्याचा उपभोग घेणे हे जास्त कठीण काम आहे. पैशाचे एक मजेशीर गणित आहे जेव्हा तुम्ही काही पैसे खर्च करता, तेव्हाच तुम्ही काही पैसे कमवू शकता, मात्र किती खर्च करायचे? हे शिकायला हवं.

– संतोष कामेरकर
(लेखक उद्योजक तसेच व्यवसाय प्रशिक्षक आहेत.)
7303445454

Author

  • डॉ. संतोष कामेरकर

    डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?