तुमच्यावर लोकांचा विश्वास कायम राहावा, असं वाटत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


विश्वास ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी नात्यांना बांधून ठेवते, जोडीदारांना एकत्र ठेवते, उद्योगांत अखंडता आणते आणि व्यवस्थांमध्ये स्थैर्य निर्माण करते. विश्वास नसेल तर लग्नं अपयशी होतात, मोठमोठ्या कंपन्या गडगडतात, सरकारे कोसळतात, संस्था बंद पडतात. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था विश्वास नसेल तर सर्वोच्च बनण्याचं स्वप्न पाहू शकत नाही.

विश्वास ही अशी गोष्ट आहे, जी निर्माण करणे, सांभाळणे आणि सातत्याने वाढवत नेणे आवश्यक असते. कारण बऱ्याच मेहनतीने मिळवलेला विश्वास मोडायला एक छोटीशी कृतीसुद्धा पुरेशी ठरू शकते. शिवाय गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण प्रचंड कठीण असतो.

लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी करा : तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यापूर्वी लोक तुमची छोट्या-छोट्या गोष्टींतून पारख करतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी करताना काटेकोर राहा.

  • नेहमी खरं बोलण्याची सवय लावा.
  • गोष्टी ऐकून आणि समजून घ्यायला शिका.
  • एखाद्याबद्दल नकारात्मक गोष्टी सांगायला घाबरू नका. अशा गोष्टी लपवणे जास्त घातक ठरू शकते.
  • अडचणीच्या काळात शांत, प्रसन्न आणि अविचल राहा.
  • समस्येच्या दोन्ही बाजू मांडायला शिका. लोकांना त्याबद्दल त्यांना हवं तसं मत बनवू द्या.
  • तुमच्या virtual जगातील वागणुकीचा, संवादाचाही तुमच्या विश्वासार्हतेवर परिणाम करू शकते.
  • परस्परांत समान हित असलेल्या गोष्टींबद्दल स्पष्टता ठेवा.
  • थोडीशी अतिशयोक्तीदेखील तुमच्याबद्दलच्या विश्वासार्हतेला तडा लावू शकते.
  • वाईटपणा न घेता मतभेद मांडायला शिका.
  • कधीच कोणती चुकीची माहिती, अफवा पसरवू नका.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?