जशी शरीराला व्यायामाची गरज असते, तशी आपल्या मेंदूलासुद्धा व्यायामाची गरज आहे. आपण जिममध्ये स्नायू बळकट करण्यासाठी जातो किंवा हायकिंगला जाऊन आपली क्षमता तपासतो; पण या सगळ्या गोष्टी शरीराशी निगडित आहेत.
यामुळे बर्याचदा मनसुद्धा प्रसन्न राहतं; पण महत्त्वाचा जशी शरीराला व्यायामाची गरज असते, तशी आपल्या मेंदूलासुद्धा व्यायामाची गरज आहे. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपण शिकणार आहोत की, कशा प्रकारे आपण आपल्या मेंदूला प्रशिक्षण देऊ शकतो.
हे प्रशिक्षण जर तुम्ही सतत देत राहिलात तर तुमच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता, लक्षात ठेवण्याची क्षमता आणि एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता वाढते. मग चला जाणून घेऊ कशा प्रकारे आपण आपल्या मेंदूला प्रशिक्षित करू शकतो.
तुमच्या स्मृतीवर कार्य करा
युनायटेड स्टेट्समधील ट्विला थारप नावाच्या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिकेने निरीक्षण केले आहे की, जेव्हा ती तिचे कोणतेही एक नृत्य पाहते, त्यात तिला बारा ते चौदा त्रुटी आढळून येता, ज्यावर तिला तिच्या कलाकारांसोबत चर्चा करायची असते.
तिच्या ‘अदि क्रिएटिव्ह हॅबिट्स’ या पुस्तकात ती लिहिते की, बर्याच लोकांच्या तीन त्रुटीसुद्धा लक्षात येत नाहीत. घडलेल्या घटना आणि गोष्टी आठवणे आणि नंतर त्यावर इतरांसोबत चर्चा करणे हा मेंदूच्या सुदृढतेचा एक अभ्यासच आहे. या क्रियेमध्ये लक्षात ठेवणे, विचार करणे अशा सर्वच गोष्टी येतात.
सतत काही तरी वेगळं करत राहा
सतत काही तरी नवीन करत राहिल्याने तुमच्या मेंदूला नवे मार्ग सापडतात आणि यामुळे नव्या गोष्टी जलद आणि उत्तम करण्यास मदत होते. विचार करा, जेव्हा तुम्ही तीन वर्षांचे होता तेव्हा तुम्ही सुरी किंवा काटा धरू शकत होता, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा मात्र गोंधळ उडायचा. हा क्षमतेचा विषय नाही.
जेव्हा तुम्ही मोठ्या माणसांना पाहून त्यांच्याप्रमाणे खाण्याचा प्रयत्न करायचात, तुम्ही तुमच्या मेंदूला जागा निर्माण करून द्यायचात आणि सतत प्रयत्नाने तुम्हाला शक्य झालं, तुम्ही मोठ्या माणसांप्रमाणे खाऊ लागलात. मग या घटनेचा अर्थ आता कसा घ्यायचा? तर आपले काम टाळू नका. सतत ते करत रहा आणि तुमच्या लक्षात येईल की, ते तुम्हाला जमले आहे.
लहान गोष्टीपासून सुरुवात करा. जर तुमचं एखादं पुस्तक कुठे तरी पडलेलं असेल, तर त्या पुस्तकाकडे पाहा आणि विचार करा की, त्या पुस्तकाची योग्य जागा कोणती आहे आणि ते पुस्तक तिथे ठेवा. लहानसहान गोष्टींतून तुम्ही खूप मोठा बदल घडवून आणू शकता.
काही तरी नवीन शिका
हे ऐकायला सहज वाटतं, पण हे खरं आहे की, मेंदूचा जितका वापर कराल, तितकी मेंदूची क्षमता वाढत असते. उदा. एखादे नवीन वाद्य शिका, त्यामुळे तुमचे कौशल्य वाढेल.
एखादी नवीन भाषा शिकल्याने तुमच्या मेंदूला नव्या पद्धतीने विचार करण्याची दिशा मिळते. तुम्ही पुढे एक पाऊल टाकून नृत्यसुद्धा शिकू शकता. अभ्यासातून/सर्व्हेक्षणातून असेही समोर आले आहे की, नृत्यामुळे अल्झायमर होण्याची शक्यता कमी असते.
मेंदू प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घ्या
नुसते बसून राहिल्यामुळे आपण आळशी होतो. त्यापेक्षा या इंटरनेटयुगाच्या मदतीने BrainHQ सारख्या इंटरनेट कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. घरात बसल्या जागी या कार्यक्रमात सहभागी होता येतं. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढून एखादी गोष्ट जलदगतीने शिकण्यास मदत होते. हा एक उत्तम व्यायाम आहे.
शारीरिक व्यायाम करा
हे वाचून अचंबित झालात ना? पण व्यायामामुळे शरीर मजबूत होत असलं तरी यामुळे मेंदूलासुद्धा गती प्राप्त होते. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल, तरी मेंदूच्या व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका; पण शारीरिक व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण शारीरिक व्यायामामुळे आपल्यामध्ये उत्साह कायम राहतो.
तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा
जर तुम्हाला चांगली आकलन क्षमता हवी असेल, तर तुमच्या आयुष्यात अर्थपूर्ण नातं असलं पाहिजे. एक अशी जवळची व्यक्ती आयुष्यात हवीच. आपल्या जवळच्या प्रेमळ व्यक्तीसोबत बोलल्याने, आपले मन हलके केल्याने आपल्याला प्रसन्नता वाटते.
आपला मूड चांगला राहतो. त्यामुळे आयुष्य सुरळीत होते. मन प्रसन्न हवे, तरंच मेंदू तल्लख राहतो. नाही तर मेंदूत नको ते विचार येतात आणि मेंदू आजारी पडतो. म्हणून नेहमी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत उत्तम वेळ घालवा.
शब्दकोडे सोडवणे टाळा
बर्याच लोकांना वाटतं की, शब्दकोडे सोडवल्याने मेंदू सुदृढ राहतो. हे खरंय की, शब्दकोडे सोडवल्यामुळे मेंदू आपल्यातला अस्खलितपणा वाढवतो; पण जर ते कोडे तुम्ही गंमत म्हणून सोडवत असाल तर. शब्दकोड्यांमुळे मेंदू तल्लख होत नाही. गंमत म्हणून शब्दकोडे सोडवण्यास हरकत नाही. पण व्यायाम म्हणून करत असाल तर ते नक्कीच टाळायला हवे.
पौष्टिक आहार घ्या आणि डार्क चॉकलेट नक्की खा
मासे, फळे आणि भाज्या यांमुळे तुमचा मेंदू कार्यक्षम होण्यास मदत मिळते; पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे तुमच्या मेंदूच्या क्षमतेत वाढ होते. जेव्हा तुम्ही डार्क चॉकलेट खाता, तेव्हा तुमचा मेंदू डोपॅमिन निर्माण करतो आणि डोपॅमिनमुळे तुम्हाला जलदगतीने शिकण्यास आणि गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत होते.
चॉकलेट्समध्ये फ्लेव्हॉनोइल्स, अँटिऑक्सिडंटस् असते, ज्यामुळे आपल्या मेंदूच्या कार्यात सुधारणा होते. तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला एखादी अवघड गोष्ट करायची असेल तर दोन डार्क चॉकलेट चघळायला विसरू नका.
आता आपल्याला कळलं आहे की, मेंदूची क्षमता कशी वाढवायची. पुरुषांच्या मानाने स्त्रियांना तर प्रचंड कामे असतात. त्यामुळे एका स्त्रीला मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी असे व्यायाम करणे अपरिहार्य आहे. मग आजच सुरुवात करणार आहात ना? प्रयत्न करा आणि आम्हाला नक्की कळवा, तुमच्यात कशा प्रकारे बदल झाला आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.