Advertisement
उद्योगोपयोगी

उद्योग वाढवण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास कसा कराल?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

एखादी बाजारपेठेचा अभ्यास करणारी, संशोधन करणारी कंपनी आपल्या व्यवसायातील समस्यांच्या कारणांना शोधू शकते. उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीची विक्री घटली तर त्याचे कारण काय असेल? एखादा नवीन प्रतिस्पर्धी, पर्यायी नवीन उत्पादन, ब्रँड जागरूकता कमी पडणे किंवा ब्रँडची नकारात्मक प्रतिमा तयार झालेली असणे. यापैकी कशामुळे आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागतंय हे बाजारपेठेचा अभ्यास, संशोधन करणारी कंपनीच आपल्याला योग्य पद्धतीने सांगू शकते.

जगभरातील यशस्वी उद्योजकांचा कल पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे वेळोवेळी बाजारपेठेचा अभ्यास करून त्यानुसार ते आपल्या उत्पादनांना बाजारात उतरवतात. तुमचा व्यवसाय हा नवीन असो अथवा प्रस्थापित उद्योगाचा विस्तार, विक्री, नफा, ओळख, प्रसिद्धी याच्या वाढीसाठी तुमच्या उत्पादनाच्या बाजारपेठेचा कल माहीत करून घ्यावा लागतो. यासाठी मार्केट रिसर्च बाजारपेठ सर्वेक्षण गरजेचे असते.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आपल्या व्यवसायावर सर्वात जास्त प्रभाव करणार्‍या गोष्टींची माहिती बाजारपेठेच्या सर्वेक्षणातून मिळाली तर त्याचा उद्योगाला जास्त फायदा होतो, असे आपण म्हणू शकतो.

बाजारपेठेची माहिती

यात बाजारपेठेचा आकार म्हणजेच आपले संभाव्य ग्राहक, विक्री, किंमत, बाजारपेठेचे विभाग आदी गोष्टींचा समावेश होतो. उत्पादनाच्या बाजारपेठेसाठी सध्या असलेल्या ग्राहकांचा कल अभ्यासावा लागेल.

  1. ग्राहक तुमचे अथवा तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या उत्पादनाची निवड का करतात?
  2. ते तुमच्या उत्पादनात काय चांगले पाहता?
  3. तुमचे उत्पादन निवडताना ग्राहक तुमच्या उत्पादनात काय पाहतात, तुमची सेवा, गुणवत्ता, उत्पादन, प्रतिष्ठा की प्रसिद्धी.
  4. ग्राहकाला तुमचे उत्पादन निवडताना कोणते घटक महत्त्वाचे वाटतात.
  5. ग्राहक कोणते वृत्तपत्र किंवा वेबसाइट हाताळतात.

संभाव्य ग्राहकांना ओळखणे आणि शोधणे

  1. तुमचे उत्पादन कोण कोण वापरू शकेल याचा अभ्यास
  2. त्यांचा वयोगट काय असेल?
  3. स्त्री अथवा पुरुष?
  4. विवाहित आहेत का? असल्यास मुले किती?
  5. कुठे राहतात?

ग्राहकांच्या गरजा शोधणे

संभाव्य ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करून त्या समजून घ्याव्यात आणि त्यानुसार आपले उत्पादन अथवा सेवा विकसित कराव्यात किंवा असलेल्या सेवा किंवा उत्पादन यासाठी काही आवश्यक बदलाची गरज असल्यास तसे बदल करावेत.

ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास

ग्राहकांची वर्तणूक अभ्यासावी. जसे की, काही ग्राहक एकाच ब्रँडशी जोडलेले असतात तर काही ग्राहक सतत नवनवीन ब्रँड शोधत असतात. नवीन उत्पादने शोधत असतात. काही संभाव्य ग्राहक विशिष्ट आकार, रंग, मूल्य, प्रकार अशा मापदंडाच्या आधारे नवीन काही सतत शोधत असतात.

प्रतिस्पर्ध्यांच्या व्यावसायिक रणनीतीचे सर्वेक्षण

सर्वेक्षणांनी प्रतिस्पर्धी, त्यांची व्यावसायिक रणनीती, संभाव्य ग्राहकांवर त्यांचा झालेला परिणाम आदी प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळू शकते.

व्यावसायिक संधी ओळखा

मार्केट रीसर्चमुळे नवीन व्यावसायिक संधी आणि अनिश्चित किंवा बदलते मार्केट समजायला मदत होते. त्याचसोबत जनसंख्येत झालेले बदल, वाढलेला शैक्षणिक स्तर अशा गोष्टींचीही माहिती मिळते.

व्यावसायिक समस्यांवर तोडगा

एखादी बाजारपेठेचा अभ्यास करणारी, संशोधन करणारी कंपनी आपल्या व्यवसायातील समस्यांच्या कारणांना शोधू शकते. उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीची विक्री घटली तर त्याचे कारण काय असेल? एखादा नवीन प्रतिस्पर्धी, पर्यायी नवीन उत्पादन, ब्रँड जागरूकता कमी पडणे किंवा ब्रँडची नकारात्मक प्रतिमा तयार झालेली असणे. यापैकी कशामुळे आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागतंय हे बाजारपेठेचा अभ्यास, संशोधन करणारी कंपनीच आपल्याला योग्य पद्धतीने सांगू शकते.

अचूक व्यावसायिक निर्णय

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा अचूक उपयोग आपल्या उद्योगात करता येतो. आशावाद, विक्रीसंदर्भात पूर्वानुमान, बाजार भागीदारी, विकास दर, अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकांविषयी योग्य अनुमान स्थापित करण्यासाठी उपयोग होतो.

व्यावसायिक धोरणे विकसित करा

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्पादन अथवा सेवा कर ठरवता येतो. प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठी धोरण तयार करण्यास मदत करते. नवीन उत्पादन किंवा सेवा सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यास साहाय्यक ठरते. तसेच बाजारात उतरण्यासाठी योग्य वेळही कळते.

व्यवसायातील सर्वेक्षणाचे महत्त्व

1. ग्राहकांच्या गरजांची अचूक माहिती घेऊन कंपनीच्या माध्यमाने ते प्रभावीरीत्या अमलात आणते. यामुळे ग्राहकांच्या समाधानात वाढ होते.
2. ग्राहकाची अचूक मागणी उत्पादन किंवा सेवादात्याकडे पोहोचवल्याने जोखीम कमी होते आणि त्रुटी कमी होतात.
3. संशोधनात मिळालेली माहिती आणि त्याचे योग्य विश्लेषण करून व्यावसायिक प्रगती, वृद्धी यांचे मूल्यांकन करता येते. उद्योगाची सफलता मोजता येते. तसेच व्यावसायिक संभाव्य नुकसान किंवा फायदा याचेही अनुमान लावता येते.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!