युट्युब चॅनेल चालवून पैसे कमवायला शिका


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


‘यूट्यूब’ हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन तर आहेच, यासोबतच ‘गुगल’ आणि ‘फेसबुक’नंतर सर्वात जास्त भेट दिले जाणारे तिसर्‍या क्रमांकाचे संकेतस्थळसुद्धा आहे. ‘यूट्यूब’वर दर मिनिटाला पाचशेहून अधिक तासांचे व्हिडीओ अपलोड होत असतात, तसेच दिवसाला दहा लाखांहून अधिक तास व्हिडीओ पाहिले जातात.

ही संख्या ‘फेसबुक’ आणि ‘नेटफ्लिक्स’ यावर पाहिल्या जाणार्‍या व्हिडीओच्या एकत्रित बेरजेहून अधिक आहे. ‘यूट्यूब’ हे मनोरंजनात्मक, माहितीपूर्ण आणि आकर्षक व्हिडीओ बनवून चांगले पैसे कमावण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे आणि म्हणूनच आपण फार विलंब न करता सरळ ‘यूट्यूब’च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे याकडे वळूयात.

‘यूट्यूब’ चॅनेल तयार करणे

सर्वप्रथम आपले स्वतःचे ‘यूट्यूब’ चॅनेल असणे आवश्यक आहे. असे चॅनेल बनवण्यासाठी पुढील पायर्‍यांचे अनुकरण करा :

  • आपल्या जीमेल अकाऊंटमध्ये लॉगिन करा (जर जीमेलवर आपले खाते नसेल, तर ते उघडावे लागेल.) आणि यूट्यूब डॉट कॉमवर या.
  • यानंतर स्क्रीनच्या वरील बाजूस उजव्या कोपर्‍यातील यूजर आयकॉनवर क्लिक करा. यानंतर खालील ड्रॉप डाऊन मेन्यूमधून सेटिंगवर क्लिक करा.
  • या सेटिंगमध्ये अकाऊंट विभागात ’Create an account’ असा पर्याय असतो त्यावर क्लिक करा.

आता, तुम्हाला तुमच्या चॅनेलसाठी नाव विचारले जाईल, यालाच ब्रॅण्ड नेम म्हणतात. येथे तुम्हाला तुमच्या चॅनेलसाठी साजेसे नाव द्यायचं आहे. यानंतर पुढील भागात तुम्हाला तुमच्या चॅनेलबद्दल माहिती भरायची आहे.

चॅनेलवरील व्हिडीओंचे धोरण ठरवणे :

एकदा का चॅनेल तयार झाले की, त्यापुढे आवश्यक असते, ते म्हणजे चॅनेलवरील व्हिडीओंचे धोरण ठरवणे. हे ठरवत असताना चॅनलवर कशा प्रकारचे व्हिडीओ असतील, त्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा प्रेक्षक आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचा आहे, सदर व्हिडीओ कशाबद्दल असतील, या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.

यासाठी सोपा मंत्र असा आहे की, असा व्हिडीओ कन्टेन्ट तयार करणे, जो मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना खिळवून ठेवील आणि सहजतेने लोकांमध्ये पॉप्युलर होईल. तुमचे व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल होणे गरजेचे आहे. शिवाय तुमच्या व्हिडीओची गुणवत्ताही चांगली असणे गरजेचे आहे.

सामान्यपणे माहितीपूर्ण किंवा मनोरंजनात्मक असे ‘यूट्यूब’ व्हिडीओंचे दोन प्रकार मोडतात. माहितीपूर्ण व्हिडीओंपेक्षा मनोरंजनात्मक व्हिडीओ हे कमीत कमी वेळात व्हायरल होतात. मात्र त्यांच्या प्रसिद्धीचा काळ हा खूप कमी असतो.

असे व्हिडीओ कधी प्रसिद्ध होतात आणि कधी काळाच्या ओघात गायब होतात हे कोणाला कळतही नाही; परंतु कमीत कमी वेळात ते तुम्हाला भरपूर प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवून देऊ शकतात. माहितीपूर्ण व्हिडीओ लवकर पॉप्युलर होत नाहीत, परंतु यांचा लाइफ स्पॅन मोठा असतो.

विविध प्रकारची माहिती शोधताना कोणीही, कधीही या व्हिडीओवर येऊ शकतो. तुम्ही असे व्हिडीओ तयार करत असाल तर हळूहळू पण स्थिर उत्पन्न तुम्हाला या व्हिडीओतून मिळू शकते.

एक प्रकारे तुमच्या चॅनेलचे धोरण आणि व्हिडीओ कन्टेन्ट या दोन गोष्टीच तुमच्या चॅनेलचे मार्केटर्स आहेत. एकदा चॅनेलसाठी योग्य धोरण ठरलं आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले की लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करू लागतील.

तुमच्या चॅनेलचे पहिले १,००० सबस्क्राइबर करणे आणि ३६५ दिवसांत ४,००० तास व्हिडीओ पहिला जाणे किंवा YouTube शॉर्ट्सना १ कोटी views मिल्ने या दोन अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. तरच तुमचे ‘गुगल अ‍ॅडसेन्स’ खाते सुरू होऊ शकते.

या खात्यात तुम्हाला तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही जाहिरातींद्वारे किती उत्पन्न मिळवले आहे हे कळते. महिन्याला किमान शंभर अमेरिकन डॉलर इतके उत्पन्न झाले की, तुमच्या बँक खात्यात ते जमा केले जाते.

एकदा वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की, तुम्हाला फक्त ठरवलेल्या धोरणानुसार व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करायच्या आहेत. पुढे गुगल व्हिडीओच्या विषयानुसार आणि तो पहाणार्‍या प्रेक्षकानुसार त्यामध्ये जाहिराती टाकत जाईल व ठरावीक रक्कम तुमच्या ‘गुगल अ‍ॅडसेन्स’ खात्यात जमा होऊन दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात जमा करील.

चला तर मग, आजच कामाला लागा, वेळ दवडू नका! कारण आजपर्यंत तुम्ही इतरांना पैसे कमवून दिले, आता तुमची पाळी आहे पैसे कमावण्याची!

– टीम स्मार्ट उद्योजक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?