ई-कॉमर्स व्यवसायात प्रवेश कसा कराल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन वस्तू खरेदी आणि विक्री करणे. ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्ती वेगाने वाढत आहे. आज बाजारात जाऊन शॉपिंग करायचे दिवस इतिहासजमा होत आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाइल व इंटरनेट असल्याने ई-कॉमर्सच्या साहाय्याने फक्त एका क्लिकवर वस्तू आपल्या घरात येते. आज छोट्या छोट्या गावातूनही ऑनलाईन खरेदी होत आहे.

सुमारे पाच-सहा वर्षे आधी कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपण संपूर्ण मार्केट पालथे घालायचो, पण आज ई-कॉमर्सच्या साहाय्याने घरबसल्या खरेदी शक्य झाली आहे.

हल्लीच्या काळात इंटरनेट किंवा ऑनलाईन जगाचा गंध नसलेले किती युवक असतील? पारंपारिक उद्योग करणार्‍यासमोर हल्लीच्या स्मार्ट आणि वेगवान ई-कॉमर्स उद्योगाने मोठे आव्हान उभे केले आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अनेकांनी आपला उद्योग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा ‘स्मार्ट’ निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात टिकून राहायचे असल्यास ई-कॉमर्सशिवाय पर्याय नाही.

एकविसावं शतक हे इलेक्ट्रॉनिक युग आहे. सकाळी सहाला येणारे वर्तमानपत्र आता रात्रीच ई-पेपर स्वरुपात उपलब्ध होत आहे. ई-एज्युकेशन, ई-गव्हर्नस, ई-बुक, ई-जनरल्स, ई-आरोग्य, ई-इन्शुरन्स, ई-बँकिंग, ई-ट्रान्सपोर्ट, ई-सिनेमा, ई-बुकिंग, ई-साक्षरता, ई-अ‍ॅग्रीकल्चर आणि ई-कॉमर्स हे आज वर्तमानयुगात सत्ता गाजवत आहे. आज सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आपण पाहतो.

ई-कॉमर्स व्यवसायात दोन प्रकारे प्रवेश करता येतो. एक स्वत:चे संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करून आणि दुसरा मार्ग म्हणजे आधीपासूनच उपलब्ध असणार्‍या ई-कॉमर्स संकेतस्थळाची मदत घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो. एक उद्योजक एकापेक्षा अधिक संकेतस्थळावर आपल्या उत्पादनाची नोंदणी करू शकतो.

ई-कॉमर्समध्ये ग्राहक दोन प्रकारे खरेदी करू शकतो एक क्रेडीट किंवा डेबिट कार्डद्वारे आणि दुसरे म्हणजे वस्तू मिळाल्यानंतर रोख स्वरूपात पैसे देणे (कॅश ऑन डिलिव्हरी).

आज फ्लिपकार्ट, जबॉन्ग, मिंत्रा, स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन, ईबे, जंगली, नापतोल, येभी, बेबी ओय, शॉपक्लुस, इंडिया टाईम्स शॉपिंग, येपमी, इन्फीबीम, झोवी, उबर, ओला अशा अनेक ई-कॉमर्स वेबसाईट आपण बघतो.

ई-कॉमर्स या क्षेत्रात सॉफ्टवेअर, व्यवस्थापन, वित्तीय शाखा, अभियांत्रिकी पदवीधरांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. भारतातील ग्राहकांची ऑनलाईन खरेदी करण्याची मानसिकता दिवसेंदिवस वाढत आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील वाढ दरवर्षी तीस ते चाळीस टक्के वाढत आहे.

ई-कॉमर्स हे जलद गतीने वाढणारे आणि त्याच गतीने विकसित होणारे क्षेत्र असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी आहेत, मात्र यासाठी हवे तांत्रिक कौशल्य आणि सर्जनशीलता. देशातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालये, बिझिनेस स्कूलचा कल ई-कॉमर्सकडे आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रात नाविन्यपूर्ण वेबअ‍ॅप विकसित करू शकणारे तज्ज्ञ, ग्राफिक डिझायनर, डिजिटल मार्केटर्स, कंटेंट रायटर, एडिटर, प्रोफिट मॅनेजमेंट, ग्राहक सेवा, सप्लाय चेन, दरनिश्चिती, टेलिकॉम, ई-कॉमर्स अ‍ॅनालिस्ट, वेब डिझायनर, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंगतज्ज्ञ, संगणकीय प्रोग्रॅम, मल्टी मीडिया, डिझाईनचे कौशल्य

तसेच इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानातील कौशल्य असलेले आणि विक्री व्यवस्था बघणार्‍या तज्ज्ञांची गरज आहे. ई-कॉमर्स व्यवहारातील करिअरसाठी डिजिटल मार्केटिंग म्हणजेच इंटरनेटद्वारे विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य व तंत्र अवगत करणे गरजेचे आहे.

आज ई-कॉमर्स क्षेत्रात करिअर करू ईच्छिणार्‍या युवकांसाठी सरकारी तसेच खासगी शैक्षणिक संस्थेत विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एम कॉम इन ई-कॉमर्स, मास्टर ऑफ कॉमर्स इन ई-कॉमर्स, डिप्लोमा इन ई-कॉमर्स आदींचा समावेश आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रात करिअर करू ईच्छिणार्‍या युवकांना इंटरअ‍ॅक्टीव, डायरेक्टर अ‍ॅडव्हरटायझिंग मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, डिजिटल बिझिनेस मॅनेजर, डिजिटल सेल्स मॅनेजर, सप्लाय चेन मॅनेजर, इंटरनेट मार्केटिंग स्पेशालीस्ट, बिझनेस-टू-बिझनेस मार्केटिंग मॅनेजर, कन्सल्टंट आदी अनेक संधी उपलब्ध आहेत.

काळानुरूप बदल स्वीकारला नाही तर आपले अस्तित्व टिकवणे कोणत्याही सजीवाला किंवा यंत्राला शक्य नसते. युवकांनी स्वत:ला कालसुसंगत करत नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्य अवगत करत या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायलाच हवा.

– मधुकर घायदार
9623237135

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?