प्रगतिशील उद्योग

अडथळ्यांच्या शर्यती कशा पार कराल?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


अशा अनेक महान व्यक्ती आपल्याला ठाऊक असतात ज्यांना इच्छित स्थळी पोहचायला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. पण हार न मानता, शांतपणे ते आपले काम चालू ठेवतात व आपले स्वप्न पूर्ण करतात. आपल्या स्वप्नांचा पाठपुरवठा करणे जर या महान व्यक्तींनी सोडले असते, अडथळे ओलांडले नसते तर ते आज महान झालेच नसते नाही का?

आपल्यापैकी सर्वसामान्यपणे प्रत्येकाच्या समोर अनेक आव्हाने, अडथळे असतात. यावर मात करण्यासाठी काय करावे, हे पाहू :

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

१. तुमचे ध्येय साध्य करणे शक्य आहे याची खात्री बाळगा. हार न मानता आपले इप्सित साध्य करण्यावर भर द्या. एकदा तुमची नजर ध्येयावर स्थिर झाली की, किरकोळ अडथळ्यांनी तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. सोडणे सोपे आहे; पण ध्येयाला चिकटून राहणे खूप कठीण आहे.

२. ध्येयाच्या वाटेत नेहमीच अडथळे येतील; ते निघून जातील आणि गोष्टी नीट होतील अशी आशा बाळगणे व हातावर हात ठेवून बसून राहणे हा काही उपाय नव्हे. यश साध्य करण्यासाठी खात्रीदायक व वास्तववादी ध्येय तयार करा.

तुम्ही तयार केलेली उद्दिष्टे सोपी, स्पष्ट, इष्ट आणि मोजता येण्यासारखी आहेत याची खात्री करा. प्रगतीचे मापन करा आणि तुमची उद्दिष्टे अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी तुम्हाला सतत प्रेरित ठेवा.

बाजारात स्मार्ट उद्दिष्ट आणि त्याच्याशी संबंधित असंख्य पुस्तके आणि ब्लॉग उपलब्ध आहेत. जसे की विशिष्ट ध्येय, मोजता येण्याजोगे ध्येय, साध्य करण्यायोग्य ध्येय, वास्तववादी आणि वेळेवर आधारित ध्येय अशी अनेक आहेत; ती अभ्यासा. याच्या मदतीने तुमची उद्दिष्टे या मानकांची पूर्तता करतात याची खात्री करा आणि मग बघा तुम्ही अडथळ्यांवर कशी मात करता. आणि तुमच्या ध्येयांवर टिकून राहणे किती सोपे होईल ते ही पहा.

३. आपण काय काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. मला हे जमत नाही ते मी करू शकत नाही असा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो, मला काय जमते याचा विचार करा.

अडथळ्यांवर मात करण्यासाठी सर्जनशील मार्गांचा विचार करा. जिथे धडपडलात तिथे का धडपडलात ते शोधा. त्यातून बाहेर जाण्याचा मार्ग शोधा. मी का ? असे का? असा विचार करत राहण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा मार्ग शोधण्यावर लक्ष केंद्रित करा.

४. वेळ, काळ यावर आपला जोर असू शकत नाही पण आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवायला शिका. कोणताही विजय मिळवायचा असल्यास दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. स्वतःवर व स्वतःच्या क्षमतांवर अढळ विश्वास निर्माण करा. एखाद्याने तुमच्यावर पैज लावावी एवढा विश्वास तयार करा.

आपल्या मेंदूमध्ये एक मज्जातंतूची जाळीदार सक्रिय प्रणाली असते तिला आरएएस म्हणतात. आरएएस मेंदूच्या विविध भागांकडून दिशानिर्देश मिळवते. कोणताही आदेश प्राप्त करण्यासाठी कोणते तुकडे उपयुक्त आहेत हे ठरवते आणि ते घडवते.

याचाच अर्थ असा आहे की आपण आपले मन सकारात्मक होण्यासाठी प्रोग्राम करू शकतो आणि व्यवहार्य उपाय शोधू शकतो. अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी योग्य मानसिकता विकसित करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

अडथळे अपरिहार्य आहेत. सर्व यशस्वी लोकांनी स्वतःच्या अडथळ्यांचा सामना केला आणि त्यावर मात केली. म्हणूनच महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमच्या ध्येयांबद्दलची खात्री, एक स्मार्ट योजना, सर्जनशील उपाय आणि योग्य मानसिकता. अडथळे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी एक मजबूत निश्चय देतात.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!