Smart Udyojak Billboard Ad

कंफर्ट झोनमधून बाहेर कसं पडायचं?

If you want to learn something new you should get out your comfort zone.

अर्थ : तुमच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडा, कारण पुढे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

दोन मित्र असतात अमोल आणि अजय. दोघे एकाच कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर काम करीत असतात. एके दिवशी चर्चा करत असताना अमोल अजयला बोलतो तुला नाही वाटत आपलं हे जे रुटीन चालले आहे जसे की रोज सकाळी नेहमीची लोकल पकडणे, एकाच डब्यात एकाच सीटवर बसने त्याच वेळेला ऑफिसला जाणे, तेच काम करणे, तोच बॉस तेच सहकारी तेच चेहरे तीच संध्याकाळची लोकल, तोच डबा, तीच सीट. सगळं तेच तेच तेच तेच.

अमोल आज वेगळ्याच मूडमध्ये दिसत होता. त्याला या तोच तोपणाचा कंटाळा आला होता. त्याला नवीन काही तरी शिक्याची संघर्ष करण्याची नवीन challenges घेण्याची तीव्र इच्छा होत होती व त्याने ठरवले की आपण आपली सध्याची नोकरी सोडायची व नवीन नोकरी शोधायची ज्यात नवीन काही तरी शिकायला मिळेल, नवीन अनुभवयाला मिळेल, कदाचित नवीन दिशा, नवीन विचार, नवीन क्षीतिजे पाताक्रांत करता येतील.

अजयला अमोलचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. त्यामुळे तो त्याचे मतपरिवर्तन करू लागला व त्याला नव्या बदलाची अक्षरशः भीती दाखवू लागला. जसे की नवीन काम कसे असेल, सहकारी कसे असतील नवीन काम तुला जमेल की नाही वगैरे वगैरे त्यापेक्षा तू इथेच थांब विनाकारण रिस्क घ्यायची गरज नाही.

अमोलने अजयचे ऐकले नाही व त्याने मनापासून तेच केले, जे त्याला मनापासून वाटत होते ते म्हणजे त्याने सध्याची नोकरी सोडली व तो नवीन काही तरी शिकण्याच्या, मिळवण्याच्या स्वतःला एक्सप्लोर करण्याच्या मार्गावर निघाला.

असो सांगायचे तात्पर्य असे की आपण ज्या वातावरणात गेला तो आहे ग्रोथ झोन व अजय ज्या वातावरणात आहे तो आहे कंफोर्ट झोन. आपण आज कंफर्ट झोन या विषयावर माहिती देणार आहोत.

कंफर्ट झोन म्हणजे सवयच! तर या सवयी आपल्या कशा अंगवळणी पडतात ते पुढील प्रसिद्ध कथेवरून समजु शकते. ही कथा बहुतेक लोकांनी ऐकली असेल, पण तरीही मला जे सांगायचे आहे ते अधिक उत्तमरीत्या स्पष्ट करण्यासाठी परत एकदा ही कथा सांगतो आणि तसेही प्रेरणात्मक कथा विचार कितीही वेळा वाचल्या तरी ते आपल्यासाठी हितकारकच असते.

एक हजार किलोपेक्षाही अधिक वजन सोंडेने उचलणारा अवाढव्य हत्ती आठवून पाहा. एका खुंटाला बारीक दोरखंडाच्या साहाय्याने बांधलेल्या स्थितिंत राहणं हत्तीच्या अंगवळणी पड्लेल असतं. हत्ती लहान असताना त्याला एका मजबूत साखळीने मोठ्या झाडाला बांधतात. हत्तीच्या मानाने साखळी आणि झाड भक्कम असते.

छोट्या हत्तीला बंधनात राहण्याची सवय नसते. म्हणून तो साखळीला हिसके देत ती तोडणायचा निष्फळ प्रयत्न करीत असतो. एक दिवस त्याच्या लक्षात येते की या ओढण्या-तोडण्याचा काही उपयोग नाही. तो थांबतो आणि एका जागी स्थिर होतो. आता साखळीने बांधून घेणं त्याच्या अंगवळणी पडलेलं असतं.

तोच छोटा हत्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला एका लहानश्या खुंटाला बारीक दोरखंडाने बांधलेलं भागतं. केवळ एका झटक्यात हत्ती मोकळा होऊ शकतो, परंतु तो जात नाही. कारण ते त्याच्या अंगवळणी पडलेल असतं. (हीच स्तिथी या हत्तीचा कंफर्ट झोन असतो.)

comfort zone

कंफर्ट झोन म्हणजे काय?

कंफर्ट झोन म्हणजे आराम, एखाद्या व्यक्तीची अतिविशिष्ट मानसिक स्थिती, दशा किंवा मनाचा कोपरा ज्यामध्ये त्याला अधिक समाधान, आनंद मिळत असतो आणि जर का त्या व्यक्तीने या मानसिक स्तिथीतून बाहेर पडण्याचा जरी विचार करा तरी त्याला असवस्थ वाटते. कंफर्ट झोनची उदाहरणे खालील प्रकारे आहेत :

विशिष्ट वेळ, विशिष्ट कपडे, विशिष्ट खाणं, जायचा-यायचा विशिष्ट मार्ग असे आपल्या सर्वांचेच काही कंफर्ट झोन असतात. त्याला वयाची अट नसते. लहान असताना सवयीची झालेली आजीच्या लुगड्याची गोधडी पंचविशीतही वापरणारी मुले जशी आपण पाहतो तशीच रोजची वाट जराही न बदलणारी माणसेही.

अनेक माणसे बाहेरगावी जाताना आपली सवयीची विशिष्ट बिस्किटं सोबत घेऊन जातात. एक प्रकार असतो कंफर्ट फूड म्हणजे आपली मुगाची खिचडी किंवा वरणभात. गावाहून आल्यावर किंवा खूप दिवसांनी घरी परतल्यावर फर्माईश होते ती खिचडीची. ती खाल्ल्यावर कसं घरी आल्यासारखं वाटतं.

परगावी शिकणाऱ्या व सुटीत घरी येणाऱ्या मुलांसाठी रात्री-बेरात्रीही साधं वरण, भात आणि बटाट्याच्या काचऱ्या अनेक जणींनी केल्या असतील. त्या वेळेला वडापाव, पावभाजी, डोसा, बिर्याणी, पराठे असं काही नको असतं, एरवी ते कितीही आवडीचं असलं तरी.

कंफर्ट झोनचे तोटे

आपल्याला सवयीचे वातावरण सर्वांनाच हवेहवेसे वाटते; पण त्याचा अतिरेक झाला तर नवीन काही पाहण्याची संधीच अशी माणसे घेऊ शकत नाहीत. नवीन माणसे, नवीन जागा, नवीन वास, नवीन चवी, नवीन शब्द या सगळ्यालाच ती मुकतात.

१) तुम्ही वाढीच्या संधी गमावू शकता व आयुष्यभर आत्मसंतुष्ट राहू शकता

जर तुम्ही खूप वेळ कंफर्ट झोनमध्ये राहिल्यास ते तुम्हाला आत्मसंतुष्ट बनवू शकते. जे काही प्रमाणात तुम्हाला घाबरवणारे किंवा आव्हान देणारे क्रियाकलाप करत नाहीत ज्यामुळे तुम्ही वाढीच्या संधी गमावल्या आहेत. भौतिकशास्त्रामध्ये ऐयझॅक न्यूटनचा गतीचा नियम आहे.

“बाहेरील शक्ती जोपर्यंत त्यावर कार्य करत नाही, तोपर्यंत विश्रांती घेतलेले शरीर विश्रांतीमध्ये राहील आणि जोपर्यंत बाहेरील शक्तीने कृती केली नाही, तोपर्यंत स्थिर राहून तुम्ही प्रगती करू शकत नाही.”

२) जोखीम नाही तर परतावाही नाही

एका प्रसिद्ध वेबसिरीसमधील गाजलेला संवाद आहे, “रिस्क है तो इष्क है।” जर तुम्ही काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही, तर तुम्हाला कोणत्याही नवीन किंवा मोठा परतावा भेटणार नाही, यश मिळणार नाही, यश हे जोखीम घेण्यास इच्छुक असलेल्यांना मिळेल. म्हणून म्हणतो जोखीम घ्यायला घाबरू नका.

३) नवीन कौशल्ये शिकत नाही

जर तुम्ही फक्त सध्याच्या ताकदीवर काम करत असाल तर तुम्ही नवीन कौशल्ये विकसित करण्याच्या संधीकडे दुर्लक्ष करता, ज्यामुळे तुम्ही कुठलेही नवीन तंत्र, कौशल्य किंवा ज्ञान आत्मसात करत नाही जे की तुमच्या वाढीला, प्रगतीला मारक आणि भविष्यकाळासाठी घटक ठरू शकतं.

४) स्वत:चा विकास खुंटतो

तुम्ही कंफर्ट झोनमध्ये इतके सरावलेले असतात की तुम्हाला या जगामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान, लर्निंग प्रोसेस, नवीन विचारसरणी याविषयी भानच नसते. उदाहरणार्थ : सध्याच्या तंत्रज्ञानयुगात दोन नवीन तंत्रज्ञान येत आहेत ते म्हणजे चॅट-जीपीटी आणि एआय आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या विषयाची माहिती नाही.

५) स्वत्वाचा शोध लागत नाही, संकुचित दृष्टिकोन

कंफर्ट झोनमध्ये व्यक्तीचा दृष्टिकोन हा संकुचित झालेला असतो व तो त्याने स्वतःहून आखून घातलेल्या परिघाबाहेर पडण्याचा विचारच करत नाही व काही तरी मोठं भव्यदिव्य जेणेकरून या जगाचा उद्धार होईल, असा दृष्टिकोन ठेवत नाही यालाच आपण दुसऱ्या शब्दात असे म्हणू शकतो की ती व्यक्ती स्वत्वचा शोध घेण्यास असमर्थ असते.

कंफर्ट झोनमधून बाहेर पाडण्याचे फायदे

काही माणसे अशी असतात ज्यांना नावीन्याचा जणू हव्यास असतो. प्रत्येक सुटीत नव्या ठिकाणी फिरायला जातील, नवीन भाषा शिकतील, नवीन खाद्यपदार्थ चाखून पाहतील, कपड्यांचे वेगवेगळे प्रकार वापरतील, अशी काही माणसे असतात. कंफर्ट झोनमधून बाहेर पडल्याने नक्कीच फायदे होतात ते असे :

१) तुम्ही एक मजबूत व्यक्ती व्हाल.
२) तुम्ही अधिक सर्जनशील व्हाल.
३) आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यास अनुमती देते.
४) तुम्हाला तुमचा वैयक्तिक विकास सुरू ठेवण्यास मदत करेल.
५) तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि नवीन फायद्याचे अनुभव जगाल.
६) नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात कराल.
७) कदाचित तुमचे या जगातील अस्तित्व कशासाठी आहे उमगेल ज्याला आपण कॉमन भाषेत (DESTINY) बोलतो.
८) इतरांची मदत कराल.
९) तुम्ही या जगाचे कल्याण करू शकाल.
१०) तुम्ही ज्ञानी होऊ शकता.

कंफर्ट झोनमधून बाहेर कसं पडायचं?

१) प्रयत्नांवर विश्वास ठेवा : कंफर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आपली प्रयत्नांवर विश्वास ठेवा. “केल्याने होत आद्धी केलेची पाहिजे.” यासाठी खाली दिलेल्या सुप्रसिद्ध सुविचार लक्षात ठेवा. “Try and fail, but don’t fail to try.” प्रयत्न करा आणि अयशस्वी व्हा, परंतु प्रयत्न करण्यात अयशस्वी होऊ नका.

जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला जे आत्मसात करायचे आहे तर ते तुम्हाला मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि जर तुमच्या प्रयत्नांमध्ये निरंतर सातत्य असेल तर तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, परंतु जर तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुम्हाला ते मिळणार नाही.

change your mentality to become successful

२) मानसिकता बदला : मराठीमध्ये एक महन आहे ‘मनि दिसे ते स्वपनि दिसे’, याचा अर्थ असा की आपण आपल्या मनामध्ये जो काही चांगला किंवा वाईट विचार करतो त्याप्रमाणेच घडते. यामुळे कधीही नकारात्मक बोलू नये व सकारात्मक विचार करावा. मानसिकता बदल्याण्यासाठी तुमच्या अचेतन मनाला सूचना द्या व त्याप्रमाणे कृती करा.

३) सकारात्मक व्हा : नेहमी पॉसिटीव्ह राहा. तुमचं रक्तगट नेगेटिव्ह असलं तरी! त्यासाठी अफर्मशन्स बोला. अफर्मशन्स म्हणजे एक निश्चित किंवा सार्वजनिक विधान की काही तरी सत्य आहे किंवा आपण एखाद्या गोष्टीचे जोरदार समर्थन करतो. सकारात्मक विधान जे की आपल्याला आपलया जीवनात सत्य करून दाखवायचे आहे उदाहरणार्थ मी महान गोष्टी करण्यासाठी जन्मलो आहे.

४) शिकत राहा : स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि नोकरीच्या बदलत्या मागण्यांशी जुळवून घेण्यासाठी नवीन कौशल्ये आत्मसात करणे. नवीन कौशल्ये शिकण्याची प्रक्रिया आहे, जी तुमच्या संस्थेला आता आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही खाली दिलेल्या मार्गांद्वारे शिकू शकता :

अ) आभासी अभ्यासक्रम आणि ऑनलाइन शिक्षण

ते दिवस गेले जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी वर्गात हजेरी लावायची होती. आजकाल, तुमची पात्रता वाढवण्यासाठी तुम्ही आभासी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करू शकता. याचा अर्थ असा की जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचे काम करू शकता.

खालीलप्रमाणे अनेक व्हर्च्युअल कोर्स प्लॅटफॉर्म ऑनलाइन उपलब्ध आहेत.

लिंक्डइन लर्निंग, स्किलशेअर, MIT मधून मुक्त शिक्षण, खान अकादमी

ब) Mentoring

मेंटॉरिंगमध्ये तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी किंवा करिअरच्या शिडीवर तुमच्या वर बसलेल्या व्यक्तीकडून शिकणे समाविष्ट आहे. तुम्ही त्यांना काम करताना पाहू शकता, त्यांना तुम्हाला थेट शिकवण्याची परवानगी देऊ शकता किंवा तुम्हाला ज्या कौशल्यांवर काम करायचे आहे त्याबद्दल चर्चा करू शकत

क) कोचिंग

मार्गदर्शकांच्या विपरीत, प्रशिक्षकांना तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण मिळते. तुमच्या कौशल्यातील अंतर कमी करण्याचा आणि तुमची क्षमता ओळखण्याचा कोचिंग हा एक अत्यंत प्रभावी मार्ग असू शकतो. हे व्हर्च्युअल कोर्सपेक्षा तुमच्यासाठी किंवा तुमच्या गटासाठी अधिक अनुकूल आहे. तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे स्थापित करू शकता आणि त्यांच्या दिशेने हळूहळू कार्य करू शकता.

५) चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा

“सुसंगती सदा घडो” सुप्रसिद्ध कवी “मोरोपंत” यांची ही कविता, “सुसंगती सदा घडो” या कविता मध्ये महत्त्व “सुसंगती सांगताना म्हणतात की, माणसाला चांगली संगत लाभली आणि त्याच्या कानावर सुसंस्कारित असे चार शब्द पडले तर त्याची आदर्श व्यक्ती म्हणून जडण-घडण व्हायला नक्कीच उपयोग होईल. त्याला समाजात योग्य ते स्थान मिळेल. त्यामुळे व्यक्तीने योग्य ती संगत धरावी.

जीवनात संगतीचे फार महत्त्व आहे. चांगल्या संगतीने माणसाची समाजात किंमत वाढते आणि वाईट संगतीने समाजात किंमत कमी होत असते. त्यासाठी काही क्षण साधू वृत्तीच्या माणसाच्या संगतीत घालवले तर आपल्या जीवनाचे सार्थकता साधू शकतो.

संगत ही चांगल्याची केली पाहिजे. म्हणून कवी सुसंगती सदा घडो या कवितेमार्फत आपल्याला संगतीचे महत्त्व सांगत आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता सुसंगत कशी मिळवायची तर ती सुसंगत तुमच्या घरामध्येच आहे हो ती सुसंगत म्हणजे प्रेरणात्मक पुस्तके, आत्मचरित्र असे म्हणतात की जर आपण काश्मीर पर्यटनाचे पुस्तक वाचत असू तर आपल्याला घरबसल्या काश्मीर फिरल्यासारखे वाटते.

एवढी ताकत पुस्तकांमधील शब्दामध्ये असते. त्याचप्रमाणे जर आपण DR. APJ अब्दुल कमल सरांचे आत्मचरित्र वाचले तर नक्कीच आपल्याला त्यांची सुसंगती भेटल्याशिवाय राहणार नाही.

कंफर्ट झोनमधून बाहेर पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये

  • भीतीवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करा.
  • अधिक माहिती मिळवण्यासाठी काही संशोधन करा.
  • तुमच्या घनिष्ट मित्रांचा सल्ला घ्या.
  • स्वतःला विचारा की तुम्हाला या नवीन अडथळ्यांचा सामना का करायचा आहे.
  • तुम्हाला आव्हान देणारे उपक्रम निवडा.
  • तुमच्या नेहमीच्या सवयी बदला व नवीन सवयी लावून घ्या. (कुठलीही नवीन सवय लागण्यासाठी कमीत कमी २१ दिवसांचा कालावधी लागतो असं संशोधन आहे)
  • लहान दैनंदिन क्रिया करा जे तुम्ही सहसा करत नाही, जसे की पहाटे ५ वाजता उठा, व्यायाम करा, बाहेर चालायला जा.
  • वाचन करा (वाचन म्हणजे आपल्या मनाची मशागत करणे होय) जे वाचले आहे त्याचे टिपण काढा त्याची उजळणी करा व चिंतन मनन करा.
  • ध्यान करा (ध्यान म्हणजे आपलया मनाचा व्यायाम)
  • प्रेरणात्मक विडिओ आणि चित्रपट बघा.

– अमोल वसंत तायडे
मोबाइल : 8879110874
ई-मेल : amolwork24@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top