अंकशास्त्राचा वापर करून व्यवसाय कसा वाढावावा?

आपल्या सगळ्यांनाच जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये यशस्वी व्हायचे असते. जेव्हा आपण आपला व्यवसाय सुरू करतो तेव्हा हे अधिक महत्त्वाचे आणि आवश्यक होते. एक उद्योजक हा आत्मविश्वास असलेला, विजेता, मोठे ध्येय पाहणारा, जोखीम घेण्यास तयार असलेला, अनुकूलनीय, जिज्ञासू, ध्येय गाठणारा, स्पर्धात्मक, विश्लेषक, प्रक्रियाभिमुख आणि एक चांगला टीम लीडर असतो.

प्रत्येक व्यावसायिकाचे स्वप्नं असते की, त्याच्या वरील गुणांमुळे किंवा त्याच्याकडे असलेल्या विविध पैलूंमुळे त्याची भरभराट व्हावी. या विश्वातील सर्व गोष्टी विशिष्ट व्हायब्रेशन्सने कंपन पावत असतात. जेव्हा व्हायब्रेशन्स व्यवसाय किंवा माणसाशी जुळते तेव्हा त्याची वाढ होते व जेव्हा ती जुळत नाही, तेव्हा त्याची कार्यशैली स्थिर राहते किंवा गळून पडते.

आपल्या संस्थेमधील ही व्हायब्रेशन्स किंवा हे कंपन समजून घेणे महत्त्वाचे आहे, जरी ते संघटनेचे नाव असो, कर्मचारी, उत्पादन व अजून काही असो. त्यातील स्पंदने (व्हायब्रेशन्स) जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांची आणि स्वतःची व्हायब्रेशन्स जाणून घेतली पाहिजे, कारण या विश्वाने आपल्याला जे हवे ते तयार करण्याची प्रचंड क्षमता दिली आहे. म्हणूनच प्रत्येक उद्योजकाला आत्मनिरीक्षण करणे गरजेचे आहे, की तो कशाप्रकारेे अध्यात्माचे सिद्धांत शिकून आपला व्यवसाय वाढवू शकेल.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

आध्यात्मिक सिद्धांत असे सूचित करतो की, कशाप्रकारे प्रत्येकाला विचारांची स्पष्टता आवश्यक आहे. त्याला किंवा तिला काय करायला आवडते; शिस्तबद्धता, प्रक्रियाभिमुख, समंजस, आनंदी, शांत व कशा प्रकारे कृतज्ञेत राहता येते. या सर्व गोष्टी शिकणे खूपच महत्त्वाचे आहे. आज-काल लोकांना या सर्व गोष्टींमध्ये रस आहे व त्यांना ते शिकायचेसुद्धा आहे.

डॉ. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक यशस्वी नेत्यांनी एक यशस्वी व्यक्ती, व्यवसाय व राष्ट्रनिर्माण करण्यासाठी उपरोक्त गुणधर्मांना महत्त्व दिले होते. जेव्हा एखाद्या संघटनेत उच्चस्तरीय व्यवस्थापन असलेले सर्व कर्मचारी असतात, जे अध्यात्माच्या मार्गावरून चालतात तेव्हा संघटनेची प्रगती वेगाने होते.

Indian numerologist

असेही म्हटले जाते की, जेव्हा लोक एखादी संस्था सोडून देतात तेव्हा ते ती संस्था त्यांच्या व्यवस्थापकांच्या किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे सोडतात, त्याच वेळी अनेक संस्थांमध्ये तिथे काम करणारे लोक निवृत्त होतात व निवृत्त झाल्यानंतरही आपली सेवा वाढवून घेतात, कारण त्यांचे त्या संघटनेवर प्रेम असते.

सर्वांनीच या गोष्टीची सुनिश्चितता केली पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीने एक उत्तम माणूस होणे अतिशय महत्त्वाचे आहे. संस्थेत काम करणाऱ्यांनी प्रत्येक पैलूमध्ये प्रामाणिक असणे गरजेचे आहे, कारण स्पंदने कधीही खोटे बोलत नाही.

आपल्याकडे एक साधन आहे जे प्रत्येकाच्या गुणांचे अनुमान दर्शवते. व्यक्तीची व्हायब्रेशन्स वाढवून त्यात सुधारणा घडवून आणते. एक असे साधन जे व्यक्ती, व्यावसायिक नाव, उत्पादनाच्या कंप्रतेचे अनुमान करते व स्थळाचेसुद्धा अनुमान करते. ते साधन म्हणजे अंकशास्त्र.

numerologyअंकशास्त्र ही एक संख्यांची भाषा आहे. आपला जन्म दिनांक आणि जन्माच्या वेळी आपल्याला जे नाव दिले जाते, त्यापासून आपल्या प्रत्येकाला एक विलक्षण संख्या प्राप्त होते. ही संख्या आपली सुप्त शक्ती उघडण्यास मदत करते.

तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठीचा हा दरवाजा आहे व आपण इतरांशी कसे वागतो, इतर आपल्याबद्दल काय विचार करतात, आपण काय शिकलो आहोत व आपल्याला मिळालेली संधी व आपण जे आवाहन स्वीकारले आहे, या सर्व गोष्टींचा खुलासा करते.

तुमच्या ग्राहकांना आकर्षित करून घेईल, अशा प्रकारची स्पंदने तुमचा व्यवसाय निर्माण करत आहे का? तुम्ही तुमच्या नातेसंबंधात आनंदी आहात का? तुम्ही पैसे आकर्षित करत आहात का? आपला व्यवसाय ग्राहकांना मूल्य देत आहे का? आपण हे पैलू कसे ओळखू शकता? तर अंकशास्त्र या प्रयत्नांमध्ये तुम्हाला मदत करते व तुम्हाला व तुमच्या संस्थेला स्पंदने वृद्धिंगत करण्यासाठी मदत करते. आपल्याला सहजपणे व आनंदाने यशस्वी होण्यास मदत करते.

आनंदी व समाधानी वातावरण निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यवसायात कर्मचारी आनंदी असतात, ते तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला आशीर्वाद देतात. तुमचे नाव आणि व्यवसायाची स्पंदने तुम्हाला मिळतात. ती स्पंदने तुम्ही अंकशास्त्र तज्ज्ञाकडून आताच तपासून घ्यायला हवीत.

– प्रीती जोशी
9833396326
(लेखिका अंकशास्त्रतज्ज्ञ आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?