‘गुगल’चा वापर करून कसा वाढवाल व्यवसाय?

‘गुगल’ सर्च इंजिन तर आपण सर्व जण वापरतोच, त्याचाच वापर करून आपण आपला उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवू शकतो, हे आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. जाणून घेऊ या गुगल माय बिझनेस या अॅपविषयी. ‘गुगल माय बिझनेस’ या अॅपद्वारे आपण आपल्या बिझनेसची नोंद गुगलवर मोफत करू शकता. गुगल माय बिझनेस अॅप अँड्रॉइड आणि अॅलपल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये –

फ्री गुगल लिस्टिंग – जेव्हा कोणी तुमचा किंवा तुमच्यासारखा व्यवसाय गुगलवर किंवा गुगल मॅपवर सर्च करेल त्या वेळी उजव्या बाजूस आपल्या व्यवसायाची सर्व माहिती दिसू लागेल.

फ्री वेबसाइट – गुगल माय बिझनेसद्वारे वेबसाइट तयार करणे अगदी सोपे आणि मोफत आहे. या वेबसाइटवर आपण फोटो, आपल्या व्यवसायाची माहिती (पत्ता, दूरध्वनी क्रमांक) अपलोड करू शकता तसेच आपल्या आवडीनुसार फॉन्ट, डिझाइन थीम बदलू शकता. अधिक फीचर्ससाठी आपण वेबसाइटचे पेड व्हर्जन घेऊ शकता.

वेबसाइटची वैशिष्ट्ये-

मोबाइल फ्रेंडली- ही वेबसाइट कॉम्प्युटर, मोबाइल, टॅबलेट अशा प्रत्येक डिवाइसवर उत्कृष्टरीत्या दिसण्यासाठी ऑटो अॅटडजस्ट होते.

कस्टम डोमेन – कस्टम डोमेनमुळे आपली वेबसाइट आपला व्यवसाय प्रतिबिंबित करेल.

ऑटोमॅटिक अपडेट – वेबसाइट स्वयंचलितपणे आपल्या गुगल सूचीवर माहितीसह अपडेट करते, त्यामुळे ती माहिती नेहमी अपटुडेट असते.

मॅनेज ऑन द गो – कोणत्याही डिव्हाइसवरून आपण आपली वेबसाईट तयार किंवा त्यात बदल करू शकता.

कॉल अँड व्हिजिट – तुमचा फोन नंबर आणि पत्ता गुगल मॅपवर ठळकपणे प्रदर्शित केले जाईल.

बिझनेस इन्फो – गुगल माय बिझनेसवर आपण आपल्या कामाच्या वेळा, सुट्टी, फोन नंबर, पत्ता अशी सर्व माहिती भरू शकता आणि कधीही त्यात बदल करू शकता.

कॉल – जर कोणी आपला बिझनेस मोबाइलवरून सर्च करत असेल तर तो आपणास डायरेक्ट फोन करू शकतो.

फोटोज – आपण आपल्या व्यवसायासंदर्भातले फोटो अपलोड करू शकता. (उदा : शॉपचे, प्रॉडक्टचे, मेनूचे फोटोज)

रिव्हिव्यू – याद्वारे आपले ग्राहक आपल्या व्यवसायाबद्दल अभिप्राय नोंदवू शकतात.

इन्साइट्स – ग्राहक आपण नोंदविलेल्या सूचीवरून परस्परसंवाद कसा साधतात, ते कुठून आपला व्यवसाय सर्च करतात, त्यांनी सर्च कसे केले, आपण याद्वारे कस्टमर अॅठक्शन्स, जसे की आपल्या कोणता फोटो सर्वाधिक पाहिला जातो हे पाहू शकतो.

पोस्ट्स – याद्वारे आपण आपल्या सूचीमध्ये विशेष किंवा हंगामी ऑफर्स पोस्ट करू शकता.

‘गुगल माय बिझनेस’ अॅपवर नोंद कशी कराल?

  • गुगल माय बिझनेसवर आपला बिझनेस नोंदविण्यासाठी तुमचे जीमेलवर अकाऊंट असणे आवश्यक आहे.
  • साइन इन किंवा स्टार्ट नाऊवर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यवसायाची पूर्ण माहिती भरावी.
  • पूर्ण माहिती भरून झाल्यावर उजव्या कोपर्या्त मेल बटण दिसेल, त्यावर क्लिभक करा.
  • त्यानंतर सेंड पोस्टकार्ड या ऑप्शनवर क्लि‍क करा.
  • तुमच्या बिझनेसचा पत्ता गुगलतर्फे पोस्टकार्ड पाठवून व्हेरिफाय केला जातो. (पोस्टकार्ड साधारण ५ कामाच्या दिवसांपर्यंत तुमच्या दिलेल्या व्यवसायाच्या पत्त्यावर येते.)
  • पोस्टकार्ड मिळाल्यानंतर व्हेरिफाय नाऊवर क्लिदक करून व्हेरिफिकेशन कोड भरावा.
  • पोस्टकार्डमधील कोड फीड केल्यानंतरच आपला व्यवसाय गुगलवर ऑनलाइन दिसू शकेल.
  • सविस्तर माहितीसाठी हेल्प सेंटरवर क्लिक करून हिंदीमध्ये माहिती वाचू शकता.
  • गुगल माय बिझनेस अॅहपमुळे तुमच्या बिझनेसला नक्कीच फायदा होईल.

– चंदन इंगुले
संपर्क: ७२७६५८०१०१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?