‘फेसबुक मार्केटप्लेस’चा वापर करून तुमची विक्री कशी वाढवाल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


फेसबुक पहिल्यापासून लोक आपल्या करमणुकीसाठी वापरत. त्यानंतर ते हळूहळू व्यवसाय वाढवण्यासाठीसुद्धा वापरले जाऊ लागले. मग ते कंपनी पेज असो किंवा आपल्या ग्राहकांचा ग्रुप तयार करणे असो. याच ग्रुप्समध्ये फेसबुकने ‘बाय अँड सेल’ ग्रुपसुद्धा आणले. जिथे लोक वेगवेगळ्या सेवा आणि उत्पादनांची खरेदी-विक्री करू शकतील.

या ‘बाय अँड सेल’ ग्रुप्सचे प्रस्थ हळूहळू इतके वाढले की दर महिना ४५ कोटी लोक या ग्रुप्सना भेट देऊ लागले. याशिवाय कंपनी पेजवरून वस्तू विकण्याचा उपक्रमही जोरदार सुरू होता. याच सर्वातून जन्म झाला फेसबुक ‘मार्केटप्लेस’चा.

‘फेसबुक मार्केटप्लेस’ हे असे एक फिचर आहे जिथे उद्योजक विविध वस्तू, उत्पादने, सेवा विकू शकता. त्याचप्रमाणे फेसबुकवरील इतर लोक विक्रेत्याशी थेट संपर्क साधून हे सर्व तिथूनच विकत घेऊ शकतात. ‘फेसबुक मार्केटप्लेस’वरून तीन प्रकारच्या उत्पादनांची खरेदी विक्री होते :

१. प्रत्यक्ष उत्पादने (मोबाईल्स, साड्या, दागिने, फर्निचर, इ.)
२. गाड्या (दुचाकी, चारचाकी)
३. घरं (भाड्याने किंवा विक्री)

आता आपल्यालाही असे वाटत असेल की आपणही या संधीचा लाभ घ्यावा.

कोणत्याही उद्योजकासाठी आपले ग्राहक सर्वात महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण ग्राहकानुसार या मार्केटप्लेसचा विचार करू. खरेदी करताना फेसबुक मार्केटप्लेस पाहण्यासाठी फेसबुकमधील शॉप आयकॉनवर क्लिक करा. त्यात गेल्यावर आपल्या आसपासच्या लोकांनी विक्रीसाठी ठेवलेल्या विविध उत्पादनांचे फोटो आपल्याला दिसतील. सर्वात वरच्या पट्ट्यात our items, Saved items, For Sale, Sale Groups, Top Sellers अशी अनेक बटणे आपल्याला दिसतील.

Screenshot of Facebook Marketplace

त्याखाली सर्च बार असेल जिथे आपण विविध उत्पादने शोधू शकाल आणि त्याखाली विविध बटणे असतील ज्यातून आपण आपले ठिकाण, उत्पादनांचे प्रकार वगैरे ठरवू शकता. आपल्याला एखादे उत्पादन आवडले तर त्याच्या फोटोवर क्लिक करा. त्या उत्पादनाचा तपशील आपल्याला दिसेल. सर्वात वर फोटो, त्याखाली नाव, किंमत वगैरे दिसेल, त्याखाली ‘मॅसेज सेलर’ हे बटन व त्याखाली सेव्ह, शेअर आणि रिपोर्ट अशी तीन बटणे असतील.

या सर्वांखाली विक्रेत्यांचे नाव आणि इतर तपशील दिलेला असेल. वस्तू खरेदी करण्याचे नक्की झाल्यास ‘मॅसेज सेलर’ या बटनावर क्लिक करा आणि पुढे विक्रेत्याशी मेसेजद्वारे थेट संपर्क साधा. अजूनतरी फेसबुकने कोणतेही पेमेंट गेटवे आणलेले नाही.

ग्राहक खरेदी कशी करेल हे आपण पाहिले. आता हे सर्व लक्षात घेऊन आपण आपले उत्पादन कसे विक्रीसाठी ठेऊ शकतो हे पाहू.

  • मार्केटप्लेसमध्ये ‘व्हॉट आर यु लिस्टिंग’ (What are you listing) वर क्लिक करा.
  • तुम्ही जे विकणार आहेत त्यांची कॅटेगरी म्हणजेच उत्पादन/ गाडी/ घर निवडा
  • तुमच्या उत्पादनाचा फोटो अपलोड करा
  • उत्पादनाचे नाव लिहा
  • त्याची किंमत लिहा
  • जर वेगवेगळ्या आकारांत उत्पादन उपलब्ध असेल तर त्यानुसार किंमत निवडा
  • आपल्या उत्पादनाची कॅटेगरी निवडा (उदा. इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, वगैरे)
  • आपले ठिकाण निवडा
  • आपल्या उत्पादनाबद्दल इतर तपशील भरा
  • आपण हे उत्पादन घरपोच देणार की नाही हे निवडा

या दहा पायर्यांत आपण फेसबुक सारख्या भल्यामोठ्या सोशल मीडियावर अगदी निःशुल्क विक्री करू शकता. आपल्या ठिकाणाच्या आसपासच्या लोकांना आपले उत्पादन दिसेल. त्यांना ते खरेदी करायचे असल्यास ते तुम्हाला मेसेज करतील.

फेसबुक मार्केटप्लेस भारतात नवीनच असल्याने ते सध्या असंख्य गोष्टींचा अभ्यास करत आहे. जसे ग्राहकांच्या आवडी-निवडी, सवयी, उत्पादन शोधण्याची पद्धत, वगैरे. त्यामुळे आगामी काळात त्यात अनेक बदल आणि सुधारणा होतील. या संधीचा फायदा मोठ्या उद्योजकांना तर होईलच शिवाय स्टार्टअप्स सुद्धा योग्य पद्धतीने नियमित आपली उत्पादने या मार्केटप्लेसवर विकून या संधीचं सोनं करू शकतात.

फेसबुक मार्केटप्लेसवरून उत्तम प्रकारे विक्री करण्यासाठी काही टिप्स :

  • आपल्या उत्पादनांचे स्पष्ट आणि आकर्षक फोटो काढा. कारण ते पाहूनच ग्राहक आकर्षित होणार आहेत.
  • आपल्या उत्पादनाचा तपशील अचूक, संपूर्ण आणि थोडक्यात लिहा.
  • आपल्या उत्पादनांची किंमत आपल्या स्पर्धकांना साजेशी आहे का हे पहा. कारण ग्राहक एक वेळी सहज अनेक विक्रेत्यांची उत्पादने पाहू शकता.
  • आपले उत्पादन किती लोक पाहतात यावर लक्ष ठेवा. जर भरपूर लोक आपले उत्पादन पाहतात आणि त्या मानाने विक्री कमी असेल तर आपल्याला कदाचित आपली किंमत कमी करण्याची गरज असेल.
  • ट्रेंड आणि गरज या दोन्हींवर लक्ष ठेवा. उदा., थंडीच्या दिवसांत लोकांच्या पसंतीच्या रंगांचे स्वेटर विकणे, इ.
  • आपली फेसबुक प्रोफाइल प्रोफेशनल करा. कारण ग्राहक बऱ्याचदा खरेदी करण्याआधी आपली प्रोफाइल पाहतात.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?