फक्त एका वर्षात लहान व्यवसाय मोठा कसा कराल?

एका वर्षात लहान व्यवसाय मोठा करणे हे एक आव्हानात्मक वाटणारे, पण साध्य करण्याजोगे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नियोजन, योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी, कार्यक्षम ऑपरेशन्स प्रणाली आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा आवश्यक आहे. एक वर्षात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला आणण्यासाठी काय काय कराल याची स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत.

१. तुमचं वार्षिक उद्दिष्ट ठरवा

तुमच्या व्यवसायाचे वार्षिक उद्दिष्ट स्पष्ट, मोजता येईल असं आणि ठराविक कालमर्यादेसह साध्य करता येईल असं ठरवा. नेमकं कुठे जायचं आहे हेच ठरलेलं नसेल तर तुमचं जहाज पाण्यात दिशाहीन फिरत राहिल.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

२. तुमची बाजारपेठ समजून घ्या

तुमची बाजारपेठ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला अपेक्षित असलेले ग्राहक ओळखण्यासाठी, त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बाजारातील मागणी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी तुमची उत्पादने किंवा सेवा तयार करण्यासाठी या माहितीचा वापर करा.

SWOT विश्‍लेेषण : तुमच्या व्यवसायाची ताकद, कमकुवतपणा, संधी आणि धोके ओळखण्यासाठी व्यवसायाचं SWOT विश्‍लेेषण करा. हे आपल्या सामर्थ्याचा फायदा घेण्यास, कमकुवतपणा सुधारण्यास, संधींचा लाभ घेण्यास आणि धोके कमी करण्यास मदत करतं.

३. तुमचा ऑनलाइन प्रेझेन्स वाढवा

प्रत्येक व्ययसायासाठी एक आधुनिक वेबसाइट आवश्यक आहे. ती स्मार्टफोनवरसुद्धा व्यवस्थित दिसली पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर तुमची वेबसाइट ही रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे.

वेबसाइटमध्ये कॉल-टू-अ‍ॅक्शन स्पष्ट असायला हवं. म्हणजे ग्राहकाने ज्या उद्देशाने तुमच्या वेबसाइटला भेट द्यावी असं तुम्हाला वाटतं ती कृती स्पष्ट असावी. जसं की तुम्हाला संपर्क करावा, ऑर्डर प्लेस करावी, इन्क्‍वायरी फॉर्म भरून पाठवावा, इत्यादी.

वेबसाइटमध्ये तुमची सविस्तर माहिती दिलेली असावी.तसंच ग्राहकांशी वारंवार जोडलेलं राहण्यासाठी ब्लॉग, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप इंटिग्रेट केलेलं असावं.

सोशल मीडियाचा योग्यरीत्या वापर करा

तुमच्या ग्राहकांशी कायम जोडलेलं राहण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करा. सोशल मीडियावर लोकांना आकर्षित कराल असा कंटेट पोस्ट करा. जाहिरातींचे पेड कँपेन्स करा.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हीसुद्धा अतीमहत्त्वाची प्रक्रिया आहे. आज काल कोणीही कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी प्रथम भेट देतो ती ‘गुगल’ला. या वेळी गुगलवर तुम्ही त्या ग्राहकाला पहिल्या १०-१५ मध्ये दिसलात, तरच तो तुमच्याकडे येईल आणि तुमचा बिझनेस होईल.

गुगल हे एक सर्च इंजिन आहे. त्यावर तुमचा व्यवसाय, तुमची वेबसाइट पहिल्या पानावर दिसण्यासाठी जी तांत्रिक प्रक्रिया करावी लागते, तिला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच एसइओ म्हणतात. यासाठी तुम्हाला एसइओ एक्स्पर्टची मदत घ्यावी लागेल.

४. ग्राहकांना चांगली सेवा द्या

तुमचे व्यवसाय प्रॉडक्टचा असो की सर्व्हिसचा त्यात तुमच्या ग्राहकाला इतकी उत्तम सेवा द्या की त्याला कधी तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडे जाण्याची गरजच पडायला नको. उलट तुमच्या व्यवसायातील गुणवत्ता बघून इतर लोक तुमच्याकडे धावत यायला हवे.

तुमच्या ग्राहकांकडून फीडबॅक घेण्याची प्रणाली विकसित करा. त्याने तुम्हाला तुमच्या गुणवत्तेत सुधारणा करायला मदत होईल. ज्या ग्राहकांचा तुमच्याबद्दल चांगला फीडबॅक आहे, त्यांना आवर्जून तो फीडबॅक गुगलवर रिव्ह्यूमध्येही द्यायला सांगा. गुगलवर लोकांनी तुमच्या व्यवसायाबद्दल चांगले रिव्ह्यू दिले तर ग्राहकांची रांग लागेल.

५. ऑपरेशन्स त्रुटी असतील तर त्या सुधारा

तुमच्या व्यवसायिक ऑपरेशन्समध्ये ज्या ज्या त्रुटी असतील त्या शोधून काढा आणि तिथे सुधारणेला सुरुवात करा. सतत, निरंतर सुधारणा करत गेलात तरच उत्तम कार्यप्रणाली विकसित करू शकाल. ‘कायझेन’ या जपानी कार्यप्रणालीविषयी माहिती करून घ्या. ‘कायझेन’चा ऑपरेशन्स सुधारण्यामध्ये खूप फायदा होईल.

विविध आधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, अ‍ॅप्स यांची मदत घ्या. जेणेकरून कामाची पद्धत सुधारत जाईल. त्यात गती येईल. तुमच्या खर्चाचे बारकाईने निरीक्षण करा. पुरवठादारांशी चांगल्या अटींवर माल खरेदी करा. खर्च नियंत्रणात ठेवल्याने नफ्यात वाढ होते.

६. उत्पादन किंवा सेवेत नावीन्य आणा

नवीन उत्पादने किंवा सेवा सादर केल्याने नवीन ग्राहक आकर्षित होऊ शकतात आणि विद्यमान ग्राहकांकडूनही व्यवसाय वाढू शकतो. मार्केटचा अभ्यास करून नवनवीन प्रॉडक्ट्स व सेवा लोकांसमोर घेऊन येत राहा. मात्र कोणतीही नवीन उत्पादने किंवा सेवा बाजारात आणताना त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका.

Author

  • हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?