धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


उद्योगांना कितीही समस्या असल्या तरी एका चालू उद्योगासाठी त्याचा स्पर्धक उद्योग हीच मुख्य समस्या असते. आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात जेव्हा तुमचे ग्राहक तुमच्या प्रतिस्पर्ध्यापासून केवळ एक click दूर असतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्पर्धकाची, त्याच्या उद्योगाची किंवा आगामी डावपेचांची माहिती असणे स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते.

सध्या अस्तित्वात असलेले स्पर्धक, नवीन स्पर्धक बाजारात उतरण्याची शक्यता, तुमच्या व्यवसायाची लवचीकता, पुरवठादार आणि ग्राहकांची वाढती ताकद या गोष्टी तुमच्या उद्योगाचे अस्तित्व ठरवतात, त्यामुळे एका व्यावसायिकाला या गोष्टींवर नजर ठेवणे गरजेचे असते. आता आपण त्या गोष्टींचा आढावा घेऊन ज्या एखाद्या व्यवसायाशी असलेली स्पर्धात्मकता ठरवतात. त्या गोष्टी पाहू.

तीव्र अंतर्गत स्पर्धा

जेव्हा एखाद्या व्यवसायात संख्येने खूप आणि आक्रमक स्पर्धक असतात, तेव्हा तो व्यवसाय हा अनाकर्षक असतो. अशा व्यवसायात वरचढ ठरण्यासाठी उत्पादनाच्या किमतीबाबतीत संघर्ष निर्माण होतो. भारतातील व जगातीलच telecommunication इंडस्ट्री याचे एक उदाहरण आहे.

नवीन स्पर्धक बाजारात उतरण्याची भीती

जेव्हा एखाद्या व्यवसायात उतरणे सोपे असते, पण त्या व्यवसायातून बाहेर पडणे अवघड असते तेव्हा खूप सारे व्यवसाय निर्माण होतात आणि त्या इंडस्ट्रीत एकमेकांशी स्पर्धा करत राहतात. अशा व्यवसायांमध्ये उद्योगांची संख्या अधिक असल्याने साहजिकच त्यांचा नफा कमी असतो; परंतु ज्या व्यवसायात उतरणे अवघड असते व बाहेर पडणे सोपे असते तसे व्यवसाय नफ्याच्या दृष्टिकोनातून आकर्षक असतात.

यात परिणामकारक उद्योग टिकतात आणि सुमार दर्जाचे उद्योग बंद पडतात. ज्या व्यवसायात उतरणे आणि बाहेर पडणे सोपे असते असे उद्योग सहजपणे चालू व बंद होतात या प्रकारात परतावे हे स्थिर पण कमी असतात.

वैकल्पिक उत्पादनांची भीती

जेव्हा एखाद्या उत्पादनाला अनेक पर्याय उपलब्ध असतात तेव्हा असे व्यवसाय अनाकर्षक ठरतात. पर्यायी उत्पादने मूळ उत्पादनांच्या किमतीवर आणि नफ्यावर मर्यादा आणतात. भारतात माफक दरातील flights मुळे रेल्वेच्या प्रवास भाड्यावर बंधने निर्माण केली आहेत.

स्पर्धक ओळखणे : स्पर्धकाला वरचढ ठरण्यासाठी स्पर्धक ओळखणे प्रथमतः आवश्यक असते. एखाद्या व्यवसायाचे स्पर्धक हे त्याच व्यवसायात असणे आवश्यक नाही; त्याचे स्पर्धक इतर व्यवसायातसुद्धा असू शकतात. यासाठी आपण एका कागद निर्माण करणार्‍या उद्योगाचे उदाहरण घेऊयात.

या उद्योगासाठी कागद निर्माण करणारे इतर उद्योग स्पर्धक आहेतच, शिवाय संवादांची डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे हे उद्योगसुद्धा स्पर्धक आहेत म्हणून त्या उद्योगाला तंत्रज्ञानात होणारी प्रगती यावरदेखील लक्ष ठेवावे लागेल. एखाद्या कंपनीचे खरे स्पर्धक आणि संभवनीय स्पर्धक यांची व्याप्ती मोठी असते. एखाद्या टेलीव्हिजन निर्माण करणार्‍या कंपनीसाठी मोबाइल निर्माण करणारी कंपनी हीसुद्धा स्पर्धक असते.

स्पर्धकांचे विश्‍लेषण :

एकदा स्पर्धक ओळखल्यानंतर त्या व्यवसायाचे डावपेच, उद्दिष्टे, बलस्थाने आणि कमकुवतपणा या गोष्टींचे विश्‍लेषण व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असते.

१) स्पर्धकाची व्यूहरचना :

एक स्पर्धक जेव्हा एखाद्या उद्योग व्यवसायात काही निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयांचे इतर उद्योगांवर विपरीत परिणाम होतात. त्या उद्योगाच्या स्पर्धकांना त्याने घेतलेले निर्णय, त्याचे आपल्या उद्योगावर होणारे परिणाम यांचा अभ्यास ठेवावाच लागतो, अन्यथा व्यवसायातून बाहेर पडण्याची वेळ येते. स्पर्धकांनी उत्पादनांच्या ठरवलेल्या किमती, उत्पादनाचा बदलेला दर्जा आणि पुरवठादार आणि विक्रेत्यांची त्याने केलेली जोडणी या गोष्टी इतर उद्योजकांसाठी मारक ठरतात.

२) स्पर्धकाची उद्दिष्ट्ये :

स्पर्धकाची उद्दिष्टे, ध्येये जाणून घेतल्याने त्याच्या आगामी डावपेचांना समजण्यास सोपे जाते. जेव्हा स्पर्धक त्याच्या ठरवलेल्या उद्दिष्टांच्या रोखाने वाटचाल करत असतो तेव्हा त्याच्या हालचालींचा अंदाज बांधणे व पर्यायी डावपेच अवलंबिणे सोपे ठरते.

जेव्हा स्पर्धकाची उद्दिष्टे आपल्या उद्योगासाठी मारक ठरण्याची शक्यता असते तेव्हा योग्य निर्णय घेऊन स्पर्धकाला निकामी करणे उद्योग टिकविण्यासाठी व उद्योगाची वाढ करण्यासाठी निर्णायक असते. स्पर्धक नेहमीच नफा, विक्री, मार्केटचा समभाग, कॅश फ्लो वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात.

३) बलस्थाने आणि कमकुवतपणा :

एखाद्या कंपनीला त्याच्या स्पर्धकाची बलस्थाने आणि कमकुवतपणा यांच्या बाबतीत माहिती गोळा करणे गरजेचे असते. यासाठी कंपनी स्पर्धकाची पाच गृहीतके ठरवते. स्पर्धकांचा सर्व्हे करून त्या गृहीतकांना grades देते. ती गृहीतके खालीलप्रमाणे आहेत:

१) ग्राहकांची स्पर्धकांच्या उत्पादनाबद्दलची जागरूकता
२) उत्पादनांचा दर्जा
३) उत्पादनांची उपलब्धता
४) तांत्रिक साहाय्य
५) विक्री कर्मचारी

स्पर्धकाची क्षमता किंवा गुणवत्ता ठरवून कमकुवत गोष्टींवर कंपनी हल्ला करते. समजा, एखाद्या स्पर्धकाचा उत्पादनाचा दर्जा चांगला आहे, पण ग्राहकांत त्याबाबत जागरूकता नाही तसेच स्पर्धक कंपनीकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, तर कंपनी या गोष्टींचा फायदा घेऊन आपली मार्केट ध्येये गाठू शकते.

एकदा स्पर्धकाच्या बाबतीत इत्थंभूत माहिती झाल्यानंतर स्पर्धकापासून आपला मार्केट शेअर कसा वाचवायचा व स्पर्धकाचा मार्केट शेअर कसा काबीज करायचा हे आपण पाहू.

मार्केट शेअर वाचवण्यासाठी व्यूहरचना

निरंतर नावीन्य आपल्या स्पर्धकापासून मार्केट वाचवण्याचा एक मुख्य उपाय आहे. त्यासाठी उद्योजकाला निरंतर नवीन उत्पादने आणि नवीन सेवा बाजारात उतरवाव्या लागतात. तो त्याचा बिझनेस मॉडेल परिणामकारक वितरण व्यवस्था व अनावश्यक कॉस्ट कटिंग करून विस्तृत करू शकतो.

  • पोझिशन्स डिफेन्स: मार्केटमध्ये आपल्या ब्रँडची व्हॅल्यूवृद्धी करून उद्योजक त्यांचा position डिफेन्स करतात.
  • फ्लॅक डिफेन्स: यामध्ये उद्योजक त्यांच्या व्यवसायातील कमकुवत बाजार क्षेत्रांना संरक्षित करतात.
  • प्रिमिटिव्ह डिफेन्स: यामध्ये उद्योजक वेगवेगळ्या स्पर्धकांना वेगवेगळ्या ठिकाणी कमजोर करून त्यांना असंतुलित करतात, त्यामुळे स्पर्धकांचे लक्ष विचलित होते आणि ते त्यांच्या मार्केट शेअरचे रक्षण करण्यात व्यस्त होतात. अशा प्रकारे उद्योग संभावित हल्ल्यांपासून स्वत:चा बचाव करतात.
  • काऊंटर ऑफेन्सिव्ह डिफेन्स: यामध्ये जेव्हा उद्योगाच्या बाजार क्षेत्रांना लक्ष्य केले जाते तेव्हा उद्योग त्यांच्या स्पर्धकांच्या मुख्य बाजार क्षेत्रांनाच लक्ष्य करतात, त्यामुळे स्पर्धकांना काढता पाय घ्यावा लागतो व आपल्या बाजार क्षेत्राचे रक्षण करावे लागते.

मार्केट शेअर मिळवण्यासाठी व्यूहरचना

मार्केटचा जास्तीत जास्त भाग काबीज करण्यासाठी उद्योजक मोठ्या स्पर्धकांच्या बाजार क्षेत्रांना लक्ष्य करतात. मोठ्या स्पर्धकांकडे भांडवल आणि विक्री कर्मचार्‍यांचे पुरेसे मनुष्यबळ असल्याने त्यांना हरवणे सोपे नसते. त्यासाठी योग्य ठिकाणी योग्य promotion mix यांचा आधार घ्यावा लागतो.

१) Frontal अटॅक : यामध्ये उद्योजक मोठ्या स्पर्धकांच्या उत्पादनांची, जाहिरातींची, किमतींची बरोबरी करतात. यामध्ये उद्योजक बाजाराला विश्वास देतात की, त्यांची उत्पादने, सेवा या किमतीत समानता असून जास्त मोबदला देतात.

२) फ्लॅक अटॅक : यात उद्योजक स्पर्धकाच्या कमजोर बाजार क्षेत्रांना लक्ष्य करून त्यांचा हिस्सा बळकावण्यात यशस्वी ठरतात. मोठ्या स्पर्धकांचे कमजोर बाजार क्षेत्र निवडणे आवश्यक असते. स्पर्धकाची कमजोर भौगोलिक क्षेत्रे किंवा कमजोर segments लक्ष्य केल्याने उद्योगाचे मार्केट शेअर विस्तारते.

– रिहाज शेख
७३७८९२६२९५

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?