Advertisement
Advertisement
उद्योगोपयोगी

कर्मचार्‍यांचे मानसिक स्वास्थ्य कसे सांभाळाल?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

उद्योग कोणताही असो- सूक्ष्म, लघू, मध्यम अथवा मोठा, या प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळ हे आवश्यक आहे. उद्योग चालवायला आस्थापन, पैसा याची जशी गरज असते तशीच आवश्यकता असते कुशल कर्मचार्‍यांची; त्यांच्या विचारांची, कष्टाची, विश्वासाची.

आजच्या स्पर्धेच्या युगात उद्योगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे प्रत्येक जण एक प्रकारे धावतोय.. २४ x ७ च्या या काळात सतत स्वतःला update ठेवावे लागतेय. आपल्या अगोदर दुसर्‍याने बाजी मारली तर? सतत या दडपणाखाली काम होतंय. कर्मचार्‍यांचा जास्तीत जास्त वेळ हा कार्यालयात जातो. आजकाल कामाच्या व्यापात अनेक वेळा रात्रभर ऑफिसमध्ये काढावा लागतो. अनेक प्रकारचे मानसिक ताणतणाव सोबत घेऊन आज प्रत्येक जण वावरतोय ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम कामावर पर्यायाने उद्योगाच्या वाढीवर आणि व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक स्वास्थावर होतो. या सार्‍या परिणामांच्या मुळाशी असते मानसिक ताणतणाव. अशा वेळी गरज आहे मानसिक स्वास्थ्य जपण्याची.

Advertisement

स्टार्टअप्स आणि ऑनलाइनच्या जगात हा तणाव पर्यायाने जास्त आहे. अशा ठिकाणी उद्योजकांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. जाणून घेऊ काय करता येईल.

१. आपल्याकडे काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या या मानसिक ताणतणावाची उद्योजकाने वेळीच दखल घ्यायला हवी. तणावाखाली काम करताना त्याचा परिणाम कामावर होतो. त्यामुळे त्याची कारणमीमांसा समजून घ्यायला हवी. त्यासाठी काही ठोस उपाययोजनाही करायला हव्यात.

२. नोकरदार व्यक्तीचा जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या कार्यालयात जातो. या गोष्टीला विचारात घेऊन आपल्या कार्यालयात हसतखेळत, घरची ऊब देणारे वातावरण असावे.

३. काम करताना मतस्वातंत्र्य, कामाच्या पद्धती आदी बाबतीत प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे. विचारविनिमय, चर्चा वेळोवेळी व्हायला हव्यात. आपले मत ठाम आणि निर्भयपणे मांडता येईल, हा विश्वास प्रत्येकात निर्माण होईल असे वातावरण असावे.

४. उद्योजकाने आपल्या कर्मचार्‍यांसाठी योगा, तज्ज्ञ मार्गदर्शनसारख्या काही कार्यशाळा आयोजित कराव्यात. कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या असल्यास त्या समजून घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून दोघांनाही त्याचा फायदा होईल.

५. अनेक वेळा कामाच्या वेळा, अति कामाचा ताण यामुळेही अनेक समस्या निर्माण होतात. वेळीच ते समजून घेऊन, कर्मचार्‍यांच्या सोयीच्या वेळा किंवा घरातून काम करण्याची मुभा दिल्यास अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो. अनेक वेळा work life balance करणे अवघड होऊन जाते आणि ताणतणाव तयार होतात. अशा पर्यायाने बराच फरक पडू शकतो.

– टीम  स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!