एन.ए. प्लॉट, विकेंड होम, फार्म हाउस यामध्ये होणारे घोटाळे कसे टाळाल? आणि यामध्ये सुरक्षित व्यवहार कसे कराल?

जमीन व्यवहारांमध्ये घोटाळे होऊन आयुष्यभराची पुंजी घालवून बसलेल्यांची उदाहरणं आपण रोजच पाहतो. पण दुसर्‍या बाजूला हा अतिशय चांगला गुंतवणूक परतावा देणारा पर्यायही आहे. त्यामुळे नेमकं या क्षेत्राचं वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद साधला या क्षेत्रातील एक प्रतिथयश कंपनी असलेल्या ‘एकरएजेस डेव्हलपर’च्या एक्झीक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट शनी माळवे यांच्याशी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणुकदाराचे डोळे उघडेल अशी ही मुलाखत.

आमची कंपनी २०१२ साली स्थापन झाली. सेकंड होम, बंगले, फॉर्म हाउस, शेतजमीन, बिगर शेतजमीन या क्षेत्रात आम्ही कामं करतो. मुंबई आणि पुणे शहराच्या आसपास आम्ही काम करतोय. मुंबई आणि पुण्याच्या दीडशे किमीच्या परिघात आमचे सर्व प्रोजेक्ट्स सुरू आहेत.

जमीन, फार्म हाऊस किंवा विकेंड होमच्या व्यवहारात होणारी फसवणूक कशी टाळता येईल?

जमिनीच्या गुंतवणुकीत फसवणुकीच्या घटना बर्‍याच घडल्या आहेत. त्यामुळे परतावा जास्त अजूनही अनेक जण यापासून लांब राहणं पसंत करतात. अशा सगळ्या लोकांना आमचं एकच सांगणं असतं की कितीही जवळची व्यक्ती तुम्हाला बिगरशेतीची जमीन म्हणजेच एन.ए. प्लॉट किंवा विकेंड होमची एखादी स्कीम विकत असेल तरीही व्यवहार डोळसपणे करा.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

आता सगळी कागदपत्रं ही पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत ती मिळवण्याची तसदी तुम्ही घेतली पाहिजे. एका एन.ए. प्लॉट किंवा विकेंड होमचे कमीतकमी ७ डॉक्युमेंट्स असतात. ते सगळेच्या सगळे क्लीन असल्याची खात्री झाल्यावरच त्यामध्ये पैसे टाकले पाहिजेत. बरेच लोकं फक्त सातबारा बघतात आणि पुढे जातात, पण ते एकच डॉक्युमेंट्स नाही आहे तर इतरही ६-७ डॉक्युमेंट्स पाहूनच तुम्ही पुढे गेलं पाहिजे.

काही जमिनी या वेगवेगळ्या गोष्टींसाठी राखीव असतात; जसे की वनक्षेत्र, खाडीची जागा, आदिवासींसाठी राखीव इत्यादी. अशा कोणत्याही जागेवर व्यवहार करू नका. अशा जमिनीचे अधिग्रहण काढू असं आश्वासन देऊन या जागा जर तुम्हाला कोणी विकत असेल तर फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे.

असाही एक फ्रॉड अनेकदा घडलेला दिसतो की एकच जमीन एकहून अधिक म्हणजे कधी कधी तर १०-१२ जणांना विकलेली असते. हे कसं काय होतं?

नोंदणी प्रक्रियेतील काही त्रुटींचा फायदा लोकं घेतात. जमीनमालक जेव्हा एखाद्याला कायदेशीर जमीन विकतो आणि त्यांचा व्यवहार होतात नवीन खरेदीदारांची नोंद सातबारावर होण्यासाठी दरम्यानचा जो कालावधी जातो; त्या कालावधीत तो तीच जमीन अनेकांना विकून मोकळा होतो. हा उद्देशपूर्वक केलेला घोटाळा असतो.

हा फ्रॉड रोखता येऊ शकत नाही का?

नक्कीच रोखला जाऊ शकतो. खरेदी व्यवहार ते सातबारावर नाव बदलणे या काळात हा जो फ्रॉड घडतो, तो रोखण्यासाठी काही कायदेशीर कागदपत्रं तुम्ही पाहणं खूप गरजेचं असतं. ज्यांच्यामध्ये ही जमीन आणखी कोणाला विकली आहे का हे कळू शकतं. सर्च रिपोर्ट काढणं, टायटल सर्च, सातबार्‍याच्या बाकीच्या सर्व डॉक्युमेंट्सची पडताळणी करणं गरजेचं असतं.

land and farm house

तुमचे सध्या कुठे कुठे प्रोजेक्ट सुरू आहेत?

लोणावळा, मुरबाड, नवीन महाबळेश्वर म्हणजे कोयना धरणाच्या भागात आमचे प्रोजेक्ट सुरू आहेत. या आधी सात प्रोजेक्टस रोहा, शहापूर, मुरबाड, नवीन महाबळेश्वर, उल्वे (नवी मुंबई) इथे यशस्वीरीत्या पूर्ण झालेले आहेत.

तुमच्या सेकंड होमची वैशिष्ट्ये काय?

आमचं वैशिष्ट्यं म्हणजे आम्ही बजेट होम सेगमेंटमध्ये आहोत. मध्यमवर्गाला परवडेल अशा १० ते ३० लाखांच्या दरम्यान फार्म हाउस आणि एन.ए. प्लॉट्स उपलब्ध असतात.

आज विकेंड होमकडे गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातंय, तर मुंबई पुण्याजवळ ज्या भागात तुम्ही काम करता तिथे साधारण परतावा किती मिळतो?

मुंबई, पुण्याजवळ बरीच प्रगती सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे नवनवीन प्रोजेक्ट्स येतायत त्यामुळे या भागात परतावा खूप जास्त आहे. अगदी ४० ते ६० टक्केसुद्धा परतावा दरवर्षी या भागात मिळतोय. आपण एखाद्या ठिकाणी सेकंड होम घेतो आणि तिथे जवळ एखादा सरकारी किंवा खाजगी प्रोजेक्ट घोषित झाला तर परतावा खूप वाढतो. जसं की समृद्धी महामार्ग, आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे लोकांना परतावा खूप जास्त मिळाला.

अशा ठिकाणी शहरांपेक्षा जास्त वाढ मिळते. राज्यात पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त प्रगती या दोन शहरांच्या दरम्यान झाली आहे म्हणून या मुंबई-पुणे शहराच्या दरम्यानच्या भागातच गुंतवणुकीला सगळ्यात चांगला परतावा मिळतो.

मुंबई-पुणे शहराच्या दरम्यान जमीन किंवा विकेंड होम वगैरेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगला काळ कोणता?

आजचाच. कारण सध्या या भागात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होते आहे. इथे गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आणखी काही काळ थांबलात तर चढ्या भावाने खरेदी करावी लागेल. त्यामुळे या भागात आज खरेदी करणे हेच गुंतवणुकीच्या दृष्टीने संयुक्तिक आहे.

जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांना तुम्ही कशाप्रकारे मार्गदर्शन करता?

आमचा असा अनुभव आहे की या क्षेत्रातील नव्या गुंतवणूकदाराला याबद्दल माहिती खूप कमी असते. त्यामुळे आम्ही जमिनीत गुंतवणूक करू इच्छिणार्‍या कोणत्याही गुंतवणुकदाराला मोफत कायदेशीर सल्ला देतो.

कोणती कागदपत्रं पाहावीत, बजेट आणि तत्सम गोष्टी, काय फसवणूक होऊ शकते अशा सगळ्या बाबतीत आम्ही त्यांच्यात जागृती निर्माण करतो. आमचा उद्देश हा आहे की जमीन किंवा विकेंड होममध्ये लोकांनी डोळसपणे गुंतवणूक करावी, यात कोणाची फसवणूक होऊ नये.

गुंतवणूकीचे जे इतर पर्याय आहेत, जसं की सोने, फिक्स्ड डिपॉजिट, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि जमीन किंवा विकेंड होम यामध्ये काय फरक तुम्हाला वाटतात?

यामध्ये बेसिक फरक हा आहे की तुम्ही गुंतवणूक केलेल्या काळातसुद्धा तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. जसे की तुम्ही बँकेत पैसे गुंतवले तर त्याला कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्याचा काहीच आनंद घेता येत नाही.

या उलट विकेंड होममध्ये तुम्ही राहू शकता. तुमच्या कुटुंबासाठी वेळ घालवू शकता. एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता. एकीकडे तुमची गुंतवणूक केलेल्या गोष्टीची किंमतही वाढत असते आणि त्याच वेळी तुम्ही तिचा आनंदही घेत असता.

एखादा विकेंड होम प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तुम्ही जागेची निवड कशी करता?

यासाठी आम्ही दोनच गोष्टींना आधार मानतो. एक तर तिथे जवळपास एखादा सरकारी किंवा खाजगी प्रकल्प येणारा असावा; जेणेकरून आमच्याकडे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर निसर्गाचा त्याला आनंद घेता आला पाहिजे. या दोन गोष्टींचा जिथे मेळ होईल तिथे आम्ही आमचा प्रोजेक्ट सुरू करतो.

विकेंड होममध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार काही कस्टमायझेशन शक्य आहे का?

हो. आम्ही ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार बंगला/फार्म हाउस कस्टमाइज करून बांधून देतो. त्यासाठी थोडी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. ती करून देतो.

एनआरआयज् तुमच्याकडे गुंतवणूक करू शकतात का?

एनआरआय लोक आमच्याकडे अगदी सहज गुंतवणूक करू शकतात. आम्ही त्यांना एक डेडीकेटेट मॅनेजर देतो, जो त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रकारचं सहकार्य करतो. ज्यामुळे त्यांना इथे गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी होऊन जाते. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळून एनआरआय ग्राहक जोपर्यंत निश्चिंत होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांची बुकिंग घेत नाही.

कर्जसुविधा उपलब्ध असते का?

शेतजमीन घेण्यासाठी कोणतेही बँक भारतामध्ये कर्ज देत नाही. अशांना आम्ही आमच्याकडून इंटरेस्ट फ्री ईएमआय योजना देतो. बिगरशेती जमीन व बंगल्यांसाठी सर्व बँका ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देतात.

विकेंड होम किंवा फॉर्म हाउस बांधून त्याद्वारे व्यवसाय करता येतो का?

हो. आता हा मार्केटमध्ये नवीन ट्रेण्ड आला आहे. तुम्ही ओयो, एअर बीएनबी अशा ऑनलाइन ट्रेवेल एजन्सीजशी टायअप करून चांगले उत्पन्न कमवू शकता.

तुमच्या कंपनीची चॅनल पार्टनरशिप योजना काय आहे?

या क्षेत्रातील आम्ही एक प्रतिथयश कंपनी आहोत. कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ न देता ग्राहकांना समाधानकारक गुंतवणूक करून देणं हे तत्त्व आम्ही पाळलं आहे म्हणून कोणालाही आमच्याशी जोडलं जायचं असेल तर ते चॅनल पार्टनर म्हणून जोडले जाऊ शकतात. त्यांना यामध्ये चांगले कमीशन कमावता येते.

तुम्ही व्यवसायात कोणाला आदर्श मानता?

नीतिमूल्ये जपूनसुद्धा व्यवसायात यश मिळवता येतं, ही रतन टाटांनी दिलेली शिकवण आम्ही आमच्यात उतरवली आहे. त्यामुळे मी व्यक्तिशः आणि आमची कंपनी रतन टाटा सरजी यांना आमचे आदर्श मानतो.

तुमच्या कंपनीच्या भविष्यातील प्लॅनिंग काय आहे?

२०२७ साली आम्ही आमच्या कंपनीचा आयपीओ घेऊन येतोय. सोबतच आम्ही लक्झरी सेगमेंटमध्येसुद्धा प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत. दरम्यानच्या काळात आम्ही महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतसुद्धा व्यवसाय सुरू करतोय. विकेंड होम्समध्ये वेगवेगळ्या लोकांच्या कॉलनी तयार करणं हाही आमचा भविष्यातील प्लॅन आहे, जसं की फक्त सैनिकांची वसाहत. आता एक नवीन ट्रेंड येतोय रिसॉर्ट होम. भविष्यात लवकरच आम्ही यामध्येही येणार आहोत.

संपर्क : 90290 12529
Website: www.acreages.co.in

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?