व्यक्तिमत्त्व विकास

आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे मी, मला, माझे याच्या पलीकडे जाऊन विचार करणे. एकदा का असा विचार आपल्या मनात ठसला की, आनंदी आनंदच! आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधायला हवा.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेला दिसतो. मग यातून कोणीच सुटलेले नाही. लहान बाळापासून म्हातार्‍या माणसापर्यंत सारेच आज यांच्या कचाट्यात आहेत; पण याची मात्रा आहे आनंद. ती असेल तर नक्कीच आपल्या अर्ध्याहून अधिक समस्या सहज सुटतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

आनंदी राहणे हे बहुतालच्या परिस्थितीबरोबरच आपल्या स्वत:वरही अवलंबून असते; किंबहुना जास्त आपल्यावरच अवलंबून असते. आपण इतरांशी स्वतःची तुलना करणे, ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, असा आपण विचार करत राहणे अशा गोष्टींनी आपण आनंदी राहू शकत नाही. म्हणूनच आपण आनंदी राहण्याची काही सूत्रे पाहू.

 • आनंदाची परिभाषा व्यक्तिपरत्वे बदलते. त्यामुळे आपण त्याचा आदर करायला शिकायला हवे.
 • छंद माणसाला आनंदी ठेवण्यात निश्चितच खूप फायद्याचे ठरतात. प्रत्येकाने आयुष्यात एक तरी छंद जोपासावा.
 • सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, समाधानी राहा. आयुष्यात सारेच मनाप्रमाणे घडत नाही, त्यामुळे हे सत्य स्वीकारा.
 • भूतकाळ आणि भविष्यकाळ या विचारात न अडकता वर्तमानात जगायला शिका.
 • आपल्या आयुष्यातल्या चांगल्या, वाईट गोष्टींची तसेच यशापयशाची जबाबदारी स्वतः घ्या. इतरांना दोषी ठरवू नका.
 • आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या आणि घडणार्‍या चांगल्या घटनांना नेहमी आठवत राहा.
 • आपले दुःख, त्रास याचा बाऊ करू नका. इतरांचे दुःख, त्रास समजून घ्या. त्यामुळे आपले दुःख आपल्याला किती कमी आहे याची जाणीव होईल.
 • इतरांच्या आनंदात सहभागी व्हा.

 • आपल्या जीवनात घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. इतरांशी तुलना करू नका.
 • सतत नावीन्याचा शोध घ्या.
 • स्वतःच्या क्षमता ओळखा. स्वतःवर विश्वास ठेवा. पूर्ण क्षमतेने मेहनतीने काम करा. त्यामुळे आपण आनंदी होतोच.
 • जर कधी उदास वाटलेच तर आपल्या विश्वासातल्या व्यक्तीशी बोला. व्यक्त व्हा किंवा शांत आवडत्या ठिकाणी फेरफटका मारा, संगीत ऐका.

जगण्याचा भरभरून आनंद घेणे आपल्यावरच अवलंबून असते. तुम्ही कोणतेही काम करत असाल तरी ते चांगले होण्यासाठी आपण स्वतः आनंदी असायला हवे.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!