उद्योजकता

व्यवसाय यशस्वी कसा करावा? : भाग-२

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

सुरुवातीला फक्त कृतीवर (ऑपरेशन्सवर) लक्ष केंद्रित करा

आपल्या व्यवसायात सुरुवातीपासूनच कामांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसारच काम करा. सगळीच कामे एकाच वेळी करायला घेतलीत तर त्यात काहीही चूक होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामे व्यवस्थित होणार नाहीत, त्यामुळेच जमल्यास एका वेळी एकच काम हातात घ्या आणि ते व्यवस्थित पूर्ण करा.

नफा आणि कॅश फ्लोवर लक्ष द्या

व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांत म्हणजेच साधारण तीन ते चार वर्षे, जसे नफा कमवणे हे निश्चितपणे महत्त्वाचे आहे तसेच कॅश फ्लोपण तितकाच महत्वाचा आहे. कारण याच कॅश फ्लोमुळे आपला व्यवसाय चालू राहण्यास मदत होते. म्हणजेच याच कॅश फ्लोतून तुम्ही तुमच्या व्यवसायाला लागणारा कच्चा माल विकत घेऊ शकता किंवा दुकानाचे भाडे भरू शकता. तसेच कालांतराने हे पैसे तुम्ही जाहिरातीसाठी वापरू शकता.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


बरेच व्यावसायिक या कॅश फ्लोचा चुकीचा वापर करतात आणि मग कालांतराने व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर उभा राहतो. म्हणजेच व्यवसायातून येणाऱ्या पैशातून नको असलेल्या गोष्टी किंवा स्वतःच्या वापरासाठी गोष्टी विकत घेणे.

सुरुवातीच्या दिवसांपासूनच व्यावसायिकाने आपल्यासाठी पगार किंवा मानधन ठरवून घ्यावे आणि राहिलेले पैसे हे व्यवसायासाठीच वापरावेत.

पैशाच्या व्यवहारांचे तपशीलवार रेकॉर्ड ठेवा

आपल्याला आपल्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कंपनीतील प्रत्येक खर्च आणि कमाई यांची व्यवस्थितरित्या नोंद ठेवली पाहिजे. आपल्या व्यवसायात आपले पैसे नक्की कोठून येत आहेत आणि कोठे जात आहेत हे कळाल्यास आपण खर्चात कपात करू शकतो.

आपण कॉफी शॉपचे उदाहरण घेऊ. मागील महिन्यात आपण किती कॉफी खरेदी केली आणि किती विकली, आपण कॉफी शॉपसाठीच्या मालासाठी किती पैसे भरले याची तपशीलवार नोंद ठेवा. म्हणजेच जर कॉफी बीन्सची किंमत सातत्याने वाढत असेल तर आपणास कॉफीची योग्य ती किंमत ठरवण्यास मदत होईल.

खर्चावर शक्य तितके नियंत्रण ठेवा

गरज असेल अशाच ठिकाणी आणि गरज असेल अशाच वस्तूंवर पैसे खर्च करा. अशाने तुमचे तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील आणि याचा फायदा नक्कीच तुमच्या व्यवसायाला होईल.

टीप – खर्च कमी करणे म्हणजे आपल्या उत्पादनाचा किंवा सेवेचा दर्जा कमी करू नका. याचा अर्थ असा की अनावश्यक वस्तूंवर पैसे खर्च करू नका.

सप्लाय चैनवर लक्ष द्या

तुमची सप्लाय चैन म्हणजेच तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा कच्चा माल अथवा सेवा किंवा मनुष्यबळ पुरवणारे. आपल्या पुरवठादारांशी चांगले संबंध ठेवा जेणे करून तुम्हाला ते चांगला दर आणि चांगली सेवा पुरवतील आणि आपल्या व्यवसाय वाढीसाठी अप्रत्यक्षरीत्या मदत करतील.

कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य द्या

कर्ज काढून एखादा व्यवसाय सुरू करणे आणि चालवणे नेहमीच धोक्याचे असते त्यामुळेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशाचे व्यवस्थित नियोजन करून सगळ्यात आधी आणि शक्य तितक्या लवकर कर्जाची परतफेड केली पाहिजे. त्यामुळे आणखी काहीही करण्यापूर्वी कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य द्या.

उदाहरणार्थ, आपण आपले कॉफी शॉप सुरू करण्यासाठी दीड लाख रुपायांचे कर्ज घेतले आहे, आणि कालांतराने आपण कॉफी शॉपचे इंटिरियर सुधरवण्याचा विचार करत असाल जे कि सध्या इतके महत्वाचे नाही तसे करण्या ऐवजी कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य द्या.

आपला व्यवसाय वाढवा

आपण एखादे उत्पादन किंवा एखादी सेवा विकत असाल तर आपल्या व्यवसायाबद्दल स्पष्टीकरण देणारे साधारण तीस सेकंदाचे भाषण तयार करा. यामध्ये आपल्या उद्देशाबद्दल, आपली सेवा / उत्पादने आणि आपल्या व्यवसायाचे शक्य तितक्या थोडक्यात आणि कार्यकुशलतेने स्पष्टीकरण करा.

याचा उपयोग आपणास विक्री करण्यास तसेच व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी व गुंतवणूकदारांना आपल्या व्यवसायाची सखोल माहिती देण्यासाठी होईल.

सकारात्मक प्रतिष्ठा मिळवा

सकारात्मक प्रतिष्ठा मिळवणे हे विनामूल्य जाहिरातीसारखे आहे, जर आपले ग्राहक आपल्या व्यवसायाबद्दल समाधानी असतील तर ते आपोआपच आपल्या व्यवसायाची जाहिरात करतील, म्हणजेच आपले समाधानी ग्राहक हे आपल्या व्यवसायाला अजून नवीन ग्राहक मिळवून देतील.

उदाहरणार्थ, जर तुमच्या कॉफी शॉपमध्ये येणारे ग्राहक तुमच्या सेवेमुळे समाधानी असतील तर ते नक्कीच त्यांच्या मित्रपरिवारास किंवा नातेवाईकांना आपल्या कॉफी शॉपमध्ये घेऊन येतील. त्यामुळेच प्रत्येक ग्राहकाला व्यवस्थित सेवा किंवा उत्पादन देणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

व्यवसायातील स्पर्धेवर बारकाईने लक्ष ठेवा

व्यवसाय करत असताना नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, असे केल्याने मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे तसेच तुमचा प्रतिस्पर्धी ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी काय करत आहे किंवा कोणत्या नवीन सेवा तसेच काय ऑफर देत आहे हे कळू शकेल.

हे आपण समजावून घेतल्यास, आपण ते आपल्या स्वतःच्या व्यवसायात अंमलात आणू शकता आणि यामुळेच तुम्हाला मार्केटमध्ये अपडेट राहण्यास व आपल्या व्यवसायाचा दर्जा सुधारण्यात खूप फायदा होईल.

व्यवसाय वाढीच्या संधी शोधत राहा

आपण आपला व्यवसाय विस्तारित करू शकता, अशा संधीच्या शोधात आपण नेहमीच असले पाहिजे. याचा अर्थ मोठे स्टोअर फ्रंट उघडणे, उत्पादन क्षमता वाढवणे किंवा नवीन लोकेशनवर आपले स्टोअर फ्रंट उघडणे, आपल्या व्यवसायाचे ऑनलाईन स्टोअरफ्रंट उघडणे.

यशस्वी व्यवसाय मालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की योग्य वेळ आल्यानंतर आपल्या व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीसाठी आहे त्या स्थानावर विश्रांती घेण्याऐवजी व्यवसाय विस्ताराचा विचारदेखील केला पाहिजे.

व्यवसायाचे व्हर्टिकल एक्सपान्शन करा

सोप्या शब्दात सांगायचे म्हणजेच आपल्या उत्पादन किंवा सेवा यासंबंधीतच नवीन उत्पादन किंवा सेवा प्रदान करणे आणि आपला व्यवसाय आणि ग्राहकवर्ग वाढवणे. उदाहरणार्थ आपल्या कॉफी शॉपमध्ये कॉफी सोबतच पेस्ट्री किंवा सँडविच सर्व करणे.

वरील या गोष्टींचा आपल्या व्यवसायवाढीसाठी नक्कीच उपयोग होईल अशी मला खात्री आहे. ,

– चंदन इंगुले
७२७६५८०१०१
(लेखक डिजिटल मार्केटर आहेत तसेच व्यवसाय सल्लागार व मार्गदर्शक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!