प्रगतिशील उद्योग

प्रोमोशन स्ट्रॅटेजी कशी बनवावी?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रमोशन स्ट्रॅटेजी ठरवणे हे एका उद्योजकाचे मुख्य काम असते. ते करताना अनेक छोट्या-मोठ्या घटकांचा विचार एकाच वेळी करावा लागतो. जसे आपले ग्राहक कोण आहेत, त्यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचू शकतो आणि त्यांपर्यंत नक्की कोणता निरोप आपल्याला पोहोचवायचा आहे, वगैरे वगैरे.

प्रमोशन स्ट्रॅटेजी उभी करण्याच्या दोन पायऱ्या आहेत.

पहिली पायरी : विभाजन (Segmentation)

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

मार्केटचे घटक वेगवेगळ्या भागांत विभाजित करणे

दुसरी पायरी : लक्ष्यीकरण (Targeting)

विभाजित केलेल्या भागांमधून आपण कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत हे ठरवणे आणि त्यानुसार त्यांच्याशी काय व कसे बोलायचे आहे हे ठरविणे.

१. विभाजन (Segmentation)

सर्व लोकांमध्ये एकत्रित प्रमोशन करण्यापेक्षा वेगवेगळ्या भागांत त्यांची विभागणी करून त्यांच्या कलांनुसार प्रमोशन करणे हे कधीही फायद्याचे ठरते. कारण जर आपल्याला माहीतच नसेल की आपण नक्की कोणत्या लोकांमध्ये काम करता आहात, तर आपल्याला त्यातून प्रतिसाद मिळणे जवळजवळ अशक्यच!

हे भाग आपण पुढील प्रकारे करू शकतो –

१. राहण्याचे ठिकाण
२. आवडी, सवयी
३. वय, लिंग, इत्यादी
४. शैक्षणिक दर्जा
५. विचार करण्याच्या पद्धती, इत्यादी.

आपण कोणत्या लोकांना आपले लक्ष्य मानले पाहिजे? एकावेळी आपण किती भागांवर काम केले पाहिजे? प्रत्येक भागाला पुढे किती पोटभागांमध्ये विभाजित केले पाहिजे?

या भागांतील साम्य- भेद काय? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या मार्केटच्या संशोधनातून (Market Research) मिळतात. एकदा आपल्याला या सर्वांची कल्पना आली की पुढील प्रश्नांची उत्तरे आपण मिळवली पाहिजेत :

लोकांचा मीडिया वापर कसा आणि किती आहे? त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षा काय आहेत? त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे? त्यांच्या उत्पन्नातील खर्च करता येईल असे उत्पन्न (Disposable Income) किती आहे? त्यांच्या खरेदीच्या सवयी कश्या आहेत?

त्यांचे कुटुंब कितीजणांचे आहे? त्यांच्या वर्षभरात किती सुट्ट्या होतात? आपल्या उत्पनांपैकी किती भाग ते दान म्हणून देतात? आपण त्यांना कश्याप्रकारे मदत करू शकता?

ही माहिती अनेक मार्गांनी आपण मिळवू शकता. एखाद्या उत्तम मार्केट संशोधन करणाऱ्या कंपनीशी करार करण्यापासून ते विक्रीचे परीक्षण करणे आणि असे अनेक नवीन पर्याय आपण शोधू शकता.

साधारणत: वापरले जाणारे पर्याय पुढील प्रमाणे आहेत :

  • विक्री आणि खरेदी परीक्षण
  • प्रश्नावली
  • उपलब्ध माहितीचे परीक्षण
  • वेबसाईटची आकडेवारी, मुख्यतः सोशल मीडिया वेबसाईट्स
  • विविध गट
  • प्रत्यक्ष भेटी
  • मार्केट रिसर्चमधील विशेषज्ञ कंपन्या

एकदा आपण आपला ग्राहक कोण हे अचूक ओळखलेत म्हणजे वेळ झाली ती त्यांपर्यंत पोहचण्याची!

२. लक्ष्यीकरण (Targeting)

पहिल्या पायरीत आपण ग्राहकांना वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेत. आता प्रत्येक भागापर्यंत आपला व्यवसाय पोहचविण्याची अर्थात प्रमोशनचे स्ट्रॅटेजी बनवण्याची वेळ आहे.

यासाठी आपण केलेले भाग आणि जाहिरात करण्याच्या उपलब्ध पद्धती यांच्या जोड्या जुळविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वात आधी जाहिरातीचे प्रकार पाहू-

पारंपारिक प्रमोशन

– आउटडोअर जाहिरात
– व्यवसायांच्या निर्देशिका (Business directories)
– मासिके/ वर्तमानपत्र
– टी. व्ही. / सिनेमा
– रेडिओ
– फलकांवरील जाहिराती

सेल्स प्रमोशन / सूट

– विविध कूपन्स
– सवलती
– स्पर्धा
– लॉयल्टी इंसेंटिव्हज (Loyalty incentives)

मीडियाचा वापर

– प्रेस लाँच
– जनसंपर्क वाढवणारे कार्यक्रम
– प्रेस रिलीज

प्रत्यक्ष भेटीद्वारे केली जाणारी विक्री

– विक्रेता (salesman)
– लोकांना गुंतविणारे मार्केटिंग
– डीलर किंवा शोरूममधील विक्री प्रक्रिया
– प्रदर्शने
– व्यापार कार्यक्रम

परस्पर वापरकर्त्यांकडे निरोप पोचवणे

– मेल ऑर्डर कॅटलॉग (आपल्या उत्पादनांची माहिती पाठविणे)
– बल्क मेल (एक पत्र लिहून ते अनेक लोकांना पाठवणे)
– व्यक्तींनुसार पत्रे
– ई-मेल

– फोनवरून संपर्क
– विक्रीच्या जागेवर विविध प्रकारे जाहिरात करणे
– उत्तम आणि आकर्षक पॅकेजिंग

डिजिटल मार्केटींग : यात दर दिवशी काही ना काही नवीन येतच आहे

– कंपनीची वेबसाईट
– सोशल मीडिया साईट्स जसे फेसबुक, ट्विटर, लिंकडीन, इ.
– ब्लॉग्स

– मोबाइलवरील विविध सुविधा, जसे ब्लूटूथ, पुश नोटिफिकेशन
– युट्युब
– ई-कॉमर्स

विभाजन आणि लक्ष्यीकरण हे कोणत्याही नवीन प्रमोशनचे मूळ असतात. यांबद्दल व्यवस्थित समजून घेऊन बारकाईने यांचे प्लॅनिंग केले असता प्रमोशन यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढते.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!