यशस्वी वाटाघाटी म्हणजेच (negotiation) हा यशाचा मार्ग आहे. प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला अत्यंत स्वारस्य असलेल्या बाबींविषयी वाटाघाटी करण्याची तुमची क्षमता व्यवसायातील आणि आयुष्यातील तुमचे यश निश्चित करते. आपले रोजचे जीवन ही वाटाघाटीची मालिका आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. या वाटाघाटींसाठी तुम्ही सदैव तत्पर असले पाहिजे.
प्रभावी वाटाघाटी म्हणजे दुसऱ्याची सहज संवाद साधताना आपल्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला हवे ते मिळवणे. तुम्ही चांगल्या प्रकारे वाटाघाटी करू शकत नसाल तर तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे वाटाघाटी करणाऱ्यांसमोर तुम्ही अपयशी होता.
लोकांना देण्याची किंवा स्वीकारण्याची इच्छा असलेल्या किमती या नेहमीच त्या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तीवर आणि व्यवहाराच्या वेळी व्यक्तीच्या गरजा सापेक्ष व्यक्तीवर अवलंबून असतात. प्रभावी वाटाघाटी म्हणजे सहज संवाद साधत त्याचा विश्वास संपादन करणे यातील आपल्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला हवे ते मिळवणे. आता आपण घरखरेदीमध्ये याचा नक्की कसा उपयोग होईल हे बघूया.
घर खरेदी करणे हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे व सर्वात मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय म्हणता येईल. पहिले घर खरेदी करताना गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक असू शकते. यातील आव्हानात्मक बाब म्हणजे घराची योग्य किंमत योग्य अथवा किमतीला खरेदी करणे हा सर्व ग्राहकांचा मानस असतो आणि ते थोडी तयारी आणि योग्य धोरणाने आपण आपल्या इच्छित घरांसाठी उचित किंमत यशस्वीरित्या चर्चेत आणू शकता.
तुमच्या घरखरेदीच्या प्रवासातील वाटाघाटी व महत्त्वाचे टप्पे जाणून घेऊया. कोणत्याही व्यवहाराची चर्चा पूर्ण करण्यापूर्वी त्याचा गृहपाठ करणे महत्त्वाचे असते.
१) बाजारपेठेचा अभ्यास करणे ( Market Research) : आपल्याला हव्या त्या लोकेशनच्या घरांच्या किमती व रिअल इस्टेट बाजार पेठेचा अभ्यास करा. या भागात घराच्या किमतींचा आलेख चढता आहे की उतरता आहे, त्या भागात घरविक्रीचे प्रमाण कसे आहे व इतर बाजारभावांबद्दल माहिती मिळवा.
२) आपले बजेट निश्चित करणे : आपले घरखरेदीचे बजेट ठरवा. जास्तीत जास्त किती किमतीचे घर खरेदी करायचे आहे हे आधीच निर्धारित करा. गृहकर्ज घेणार असेल तर ते पूर्वमंजुरी मिळवा त्यामुळे बजेटचा पूर्ण अंदाज येईल व आपल्याला वाटाघाटी करताना काय करू शकेल याची कल्पना मिळेल.
३) बिल्डरच्या स्थितीचे आकलन करा : तुम्हाला जितक्या तातडीने एखादी खरेदी करायची असेल तेवढीच तुमच्याकडे घासाघीस करण्याची ताकद कमी असते, म्हणून बिल्डरच्या स्थितीचा अंदाज घ्या. विक्रेत्याला प्रकल्प त्वरीत विकून मोकळ व्हायचं असेल तर तो तुम्हाला चांगली किंमत देऊ शकतो.
४) वाजवी ऑफरने सुरुवात करा : खूप कमी किंमत सांगणे हे व्यवहार पूर्ण न होण्याचे प्रमुख कारण आहे. स्पर्धात्मक बाजारात आपल्या संशोधनावर आधारित वाजवी ऑफरने सुरुवात करणे हे फायदेशीर ठरते.
५) चर्चेसाठी तयार राहा : विक्रेता तुमच्या ऑफरला प्रती ऑफर (counter offer) देतो, त्यावेळेस चर्चेची तयारी दर्शवा व दोन्ही पक्षांना समाधानकारक मध्यबिंदू शोधण्याचा प्रयत्न करा.
६) कालमर्यादा (Time limit) आखून तिचा वापर करा : वेळ आणि अचूक मोक्याची वेळ साधणे हे दोन वाटाघाटीतील प्रभावी घटक आहेत. ज्या ज्या वेळी शक्य असेल तर त्यावेळी निर्णय घेण्यासाठी दुसरा पक्षाला म्हणजेच बिल्डरला ठराविक कालमर्यादा आखून द्या.
७) खरेदीदार म्हणून आपली ताकद ठळक करा : आपली घर विकत घेण्याची असलेली तयारीची माहिती विक्रेत्याच्या द्या. मंजूर असलेले गृहकर्ज व स्वहिस्सा (own contribution) तेव्हा लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी त्यामुळे चांगली ऑफर मिळण्याची शक्यता वाढते.
८) वाटाघाटींवर भावनांचा परिणाम होऊ देऊ नका : इच्छा, गरज, लोभ, भीती किंवा संताप या भावनांचा तुमच्या वाटाघाटीच्या वेळी तुम्हाला उपयोग होतो म्हणून वाटाघाटी करताना भावना आपल्यावर हावी होऊ न देता शांत राहण्याचा प्रयत्न केल्यास चांगला व्यवहार पार पडतो.
घरांच्या किमती चर्चा करणे ही गोष्ट ताण आणणारी, आव्हानात्मक वाटणारी, मनात शंका निर्माण करणारी असू शकते. त्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे नेहमी फायदेशीर ठरते.
घरांच्या किमतींची चर्चा करणे, प्रथमच खरेदी वेळी वाटाघाटी करणे अवघड वाटू शकते, परंतु तयारी, योग्य धोरण, तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन मिळाल्यास आपण आपल्या स्वप्नातील घरावर उचित सौदा करू शकतो व योग्य किमतीत घर खरेदी करू शकतो. अशाच वाटाघाटी व इतर माहितीसाठी आपण आम्हास संपर्क नक्की साधावा.
– मयुर जयस्वाल
8788680836
(ग्लोबल व्हिजन प्रॉपर्टीज)