Advertisement
प्रासंगिक

लॉकडाऊनमध्ये झालेलं नुकसान भरून कसं काढायचं?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


लॉकडाऊन व व्यवसायाचं होणारं नुकसान पाहून या चक्रातून बाहेर कसं पडायचं? विक्री कशी वाढवायची? व नफा कसा कमवायचा? हे प्रश्न प्रत्येक उद्योजकाला आज पडले आहेत. अशावेळी घाबरून न जाता किंवा निराश न होता पुढच्या योजना आखल्या पाहिजेत. ते करताना आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, परंतु आपण योजना तयार करणं व काळानुसार त्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे.

योजनेची सुरुवात कशी करायची?

मला लॉकडाऊनमध्ये झालेला सगळाच्या सगळा तोटा कसा भरून निघेल याचा विचार आधी करूच नका!

Advertisement

होय, याचा विचार अजिबात करू नका आता. सुरुवातीला एक रक्कम ठरवा. ही रक्कम कितीही लहान असेल तरी चालेल. समजा सुरुवातीला आपण पाच हजार रुपये ही रक्कम ठरवलीत. तर हे पाच हजार रुपये कमीत कमी काळात कसे कमवता येतील, याची योजना आखा आणि लगेच कामाला सुरुवात करा.

एकदा का हे पाच हजार रुपये कमावलेत का पुढचं ध्येय ठरवा.

पाच हजार कमवण्यासाठी किती दिवस आणि किती कष्ट लागले याचा विचार करून पुढची रक्कम ठरवा. समजा आता आपण १५ हजार ठरवलेत. तर त्या १५ हजारांची सखोल योजना आखा.असं करत करत… करत करत… ५ हजारवरून लाखो आणि करोडोंपर्यंतसुद्धा तुम्हाला व्यवसाय वाढवता येईल यावर विश्वास ठेवा.

उद्योजक मित्रांनो,
घाबरू नका. संकट सगळ्यांवरच ओढवलं आहे.

आपण पूर्ण तयारीनिशी याला सामोरे जाऊया.
ही आपली परीक्षा आहे असं समजून पूर्ण प्रयत्न करूया!

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!