नावात काय आहे असं म्हणतात, पण उद्योजक यशस्वी होताना कंपनीचे नाव खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. योग्य नाव असणारी कंपनी त्या त्या क्षेत्रात स्वत:च स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरते. एखादया कंपनीचं नाव काय असावं, कसं असावं, कोण कोणत्या गोष्टीचा विचार करून ते ठरवावं अशा अनेक गोष्टीचा अभ्यास उद्योजकांनी करावयास हवा.
आपल्या उद्योगाची ओळख ही आपल्या नावात असते. सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी नावाची खूप मदत होते त्यामुळे नव्याने उद्योगविश्वात येणार्यांनी या गोष्टींचा नीट व सखोल अभ्यास करायला हवा.
नाव हे आकर्षक, सोप आणि लक्षवेधी असावे, परंतु असे नाव निवडणे प्रत्येकाला जमते असे नाही अशा वेळी तुम्ही ब्रॅण्डींग अथवा जाहिरात क्षेत्रातील कंपनींची मदत घेऊ शकता. आजचा उद्योजक याबाबत चोखंदळ झालाय. तो हळूहळू या विषयी आग्रहीही होतो.
समर्पक नावाचा फायदा व्यवसायवृद्धीसाठी होतो. कंपनीच्या नावातच जर व्यवसाय काय आहे याचा अंदाज येत असेल तर ग्राहकांना नव्याने त्याची माहिती करून देण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता कमी लागते.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)नाव निवडताना काही गोष्टींची काळजी जरूर घ्या.
- तुमचा संभाव्य ग्राहक डोळ्यासमोर ठेऊन कंपनीचे नाव निवडा.
- आपल्या क्षेत्रातील इतर कंपनीचा अभ्यास करावा जेणे करून आपल्या क्षेत्रातील ट्रेंड कळतो.
- ग्राहकाच्या भावनांना हात घालणारे नाव असावे परंतु ते संभ्रमित होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.