Advertisement
उद्योगोपयोगी

अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाईट्सवर आपले प्रॉडक्ट्स विकायचे कसे?

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page
भारतातील अनेक बाजारापेठांना ग्रहण लागत आहे. अनेकांच्या तक्रारी आहेत की ग्राहक इथे फिरकतच नाही, तो सगळं काही ऑनलाइनच खरेदी करतो. नुसत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरेच नाही, तर रोजचा भाजीपाला, किराणा या गोष्टीसुद्धा ऑनलाइन विकल्या जाऊ लागल्या आहेत. याचा थेट परिणाम झालाय तो दुकानदारांवर आणि छोट्या व्यापाऱ्यांवर.

या स्थितीत ९० टक्के व्यापारी या ऑनलाइन-बिनलाइनच्या नावाने बोटं मोडत बसली आहेत आणि नैसर्गिकरित्या आपल्या व्यवसायाला टाळ कधी लागेल याची वाट पाहत बसले आहेत. तर दहा टक्के असेही हुशार व्यापारी-उद्योजक आहेत, जे या ऑनलाइनचा आपल्या धंद्यात वापर करून तो कसा वाढवता येईल याचा विचार करत आहेत. खरं तर या ऑनलाइन व्यापाराची ताकद एवढी आहे की कोल्हापूरची चामड्याची चप्पच कोलालांपुरमध्ये विकली जाऊ शकते, रत्नागिरीचे आंबे लाओसमध्ये बसून माणूस ऑर्डर करू शकतो. तुम्ही जे काही बनवता, पिकवता, विकता ते सर्व ऑनलाइनच्या माध्यमातून तुम्ही जगभर विकू शकता.

दहा टक्के व्यापाऱ्यांनाच ही ऑनलाइन विक्रीची ताकद कळली आहे. पण हे प्रत्यक्षात करायचं कसं? आपल्या चालू व्यवसायाला ऑनलाइन न्यायचं कसं? आपण बाजारात जे विकतो ते ऑनलाइन बाजारात विकायचं कसं हा प्रश्न बहुतांश व्यापाऱ्यांना सतावतो आहे. शिवाय याबद्दल नेमकी, सविस्तर, मुद्देसूद माहितीही कुठे मिळत नाही. हीच गरज लक्षात घेऊन सचिन कंभोजे यांनी उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी अशा प्रकारचे ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेवर रजिस्टर कसं व्हायचं, तिथे आपला माल कसा dispay करायचा, विकायचा कसा? याचं सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आयोजित केली आहे.

पुण्यामध्ये १२ मे रोजी सकाळी १०.३० ते ४ अशी दिवसभराची ही कार्यशाळा असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही ९५५२२०६६४४ या क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क करू शकता.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: