ई-कॉमर्स :: सुरू करा एकविसाव्या शतकातील आधुनिक व्यवसाय
उद्योगसंधी

ई-कॉमर्स :: सुरू करा एकविसाव्या शतकातील आधुनिक व्यवसाय

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

ई-कॉमर्स हा माहिती तंत्रज्ञानाशी निगडित आधुनिक व्यवसाय आहे.

यामध्ये ऑनलाइन विक्री करता येऊ शकेल असे वेब पोर्टल तयार करून घेणे गरजेचे आहे. फ्लिपकार्ट वा स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स मार्केटप्लेसेस ही सर्व प्रकारच्या वस्तू विकतात, तर मिंत्रा, उर्बन लॅडरसारखी मार्केटप्लेसेस एखादेच उत्पादन विकतात.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


ई-बे हे मार्केटप्लेस प्रत्येक उत्पादकाला आपले उत्पादन ई-बेच्या माध्यमातून ऑनलाइन विकण्याची संधी देते. आपणही वरीलप्रमाणे कोणते उत्पादन कशा प्रकारे विकायचे आहे त्यानुसार ई-कॉमर्स वेब पोर्टल तयार करून घेऊ शकता. वेब पोर्टल तयार करण्याचा खर्च आपल्या गरजेनुसार सुमारे ४० हजार रुपयांपासून काही लाखांपर्यंत असू शकतो.

ई-कॉमर्स पोर्टलवर आलेली मागणी त्या वस्तूच्या उत्पादकाकडे पाठवणे. उत्पादकाने ग्राहकाला माल पुरवला का आणि ग्राहकाला वस्तू मिळाली का याचा पाठपुरावा करणे. यामध्ये ग्राहकाकडून बिलाचे पैसे घेण्याचे दोन प्रकार असू शकतात.

एक म्हणजे जेव्हा तो ऑनलाइन खरेदी करतो तेव्हाच तेथे ऑनलाइन पेमेंट करू शकतो किंवा ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ म्हणजे वस्तू ग्राहकाला मिळाल्यावर पैसे घेऊ शकतो. ग्राहकाकडून आलेल्या पैशातून उत्पादकाला त्याचे पैसे दिले जातात.

या व्यवसायामध्ये ई-कॉमर्स वेबसाइट आणि सक्षम लॉजिस्टिक यंत्रणा असणे गरजेचे आहे. तुम्ही ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून ठरावीक काही उत्पादने विकत असाल तर तुम्हाला तशी ब्रॅण्डिंग करणे सोपे जाईल. त्याचबरोबर पोर्टलवर अधिकाधिक ग्राहकांनी यावे यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग होणे गरजेचे आहे.

– शैलेश राजपूत
shailesh@udyojak.org


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!