रिसायकलिंग व्यवसाय कसा सुरू करावा?

आजच्या काळात अनेक माध्यमातून कचरा आणि निरुपयोगी गोष्टी वेगाने वाढत आहेत. यातून आपल्या निसर्गावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. पण याचा पुनर्वापर करून व्यवसाय सुरू करता येतो. यातून उद्योगाच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.

रिसायकलिंगचा व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे, ज्यामधून कोणतीही व्यक्ती अगदी कमी वेळात चांगला नफा मिळवू शकते. कोणताही पुनर्वापर व्यवसाय सुरू करण्यासाठी, पुनर्वापर केलेल्या उत्पादनांची विक्री करण्याचे उत्तम ज्ञान असणे महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला पुनर्वापरासाठी माल कधी आणि कसा मिळेल याची माहिती हवी.

रिसायकलिंग व्यवसाय हा पर्यावरणपूरक मार्गाने पैसे मिळवण्याचे साधन आहे. मुख्यत्वे लोक सोडा कॅन, बाटल्या किंवा जुना कागद गोळा करतात. खरं तर सर्वात फायदेशीर रिसायकलिंग व्यवसाय संगणक, सेल फोन आणि घरातील इतर वस्तूंमध्ये असतो. यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवे.

याचा वापर करून कोणता आणि कसा रिसायकलिंग व्यवसाय करू शकतो याचा अभ्यास करावा. यासाठी आपल्याला उत्पादनाची पुनर्वापर प्रक्रिया, आपण ज्या उत्पादनाचा पुनर्वापर करू इच्छिता त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.

व्यवसाय योजना आणि व्यवसायाची रचना

या प्रकारच्या व्यवसायामध्ये आपण प्रथम लक्षात ठेवले पाहिजे की आपण कोणती सामग्री रीसायकल करण्याचा विचार करीत आहोत. त्यानंतर त्या व्यवसायाची रचना तयार करायला हवी. उदाहरणार्थ, जर आपण कचर्यामधून कोणतेही इंधन तयार करणार असाल तर प्रथम त्याची उपकरणे खरेदी करा आणि त्यानुसार कंपनीची रचना तयार करा.

रिसायकलिंग व्यवसाय योजना, व्यवसाय रचना व्यवसायाच्या नावाची निवड यासाठी जागरूकपणे काम करायला हवे. आपल्याला आपल्या रिसायकलिंग कंपनीचे नाव ठरवून कंपनीची नोंदणी केली जाऊ शकते. यातून चांगला ब्रँड तयार होईल.

बजेट आणि जागेची निवड

कोणत्याही प्रकारच्या पुनर्वापराचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमचे बजेट किती आहे ते पहा, कारण असे अनेक पुनर्वापर व्यवसाय आहेत ज्यात जास्त गुंतवणूकीची मागणी केली जाते. म्हणूनच, आपल्या बजेटनुसार रिसायकलिंगचा व्यवसाय निवडा.

दुसरा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जागेची निवड, त्याची काळजीपूर्वक निवडण करणे फार महत्वाचे आहे. विशेषत: पुनर्वापर व्यवसायाशी संबंधित कारखाने ज्या ठिकाणी वाहतुकीची संसाधने सहज मिळतात अशा ठिकाणी उघडली जातात.

पुनर्वापर व्यवसायासाठी परवाना आवश्यक

रिसायकलिंग व्यवसाय चालविण्यासाठी, सरकारशी संबंधित सर्व नियमांमुळे नोंदणी करावी लागेल. ज्या शहरात आपण व्यवसाय सुरू करतो त्या शहरात व्यवसायाची नोंदणी करावी. या व्यतिरिक्त, सरकारच्या धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि ट्रान्स बाउंड्री मूव्हमेंट) संबंधित नियमांची तपासणी केली पाहिजे, जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केले आहेत.

व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी विहित कायदेशीर प्राधिकरणाकडून परवाना मिळवणेदेखील आवश्यक आहे, त्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा (ईपीए), ई-कचरा (कायमस्वरुपी व्यवस्थापन आणि हाताळणी) यासारखे आणखी काही नियम विचारात घ्यावे लागतील. नियम व नगरपालिका घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम इ.

भारतात पुनर्वापराच्या व्यवसायातील नफा

धातूंचे पुनर्वापर या व्यवसायात पन्नास टक्क्यांपर्यंत नफा कमावता येतो. सोन्यासारख्या व्यवसायात हाच नफा शंभर टक्क्यांपर्यंत असतो. इतर रिसायकलिंग व्यवसायात फायदा हा बाजार मूल्यावर अवलंबून असतो. घरगुती वस्तू किंवा सेकंड हँड स्टोअरचा पुनर्वापर करणारे एक माल केंद्र फंडांद्वारे २० ते ५० टक्के नफा सहजपणे कमावतो.

नामूल्य मिळालेल्या वस्तूंमध्ये तर हा नफा शंभर टक्के असतो. जुन्या वर्तमानपत्रांचे पुनर्प्रक्रिया केल्यावर तुम्हाला प्रति टन ३,२४६ रुपयांचा नफा मिळू शकेल. तर रिसायकलिंगद्वारे पुठ्ठा मिळवण्यासाठी प्रति टन ४,८६९ रुपयांचा नफा होऊ शकतो.

ऑफिस पेपरमध्ये प्रति टन सुमारे १ लाख रुपयांची मोठी कमाई होऊ शकते, फक्त या पेपर रिसायकलिंग व्यवसायात अधिक जागेची आवश्यकता असते.

रिसायकलिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल किती लागू शकते तर एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर सुमारे १ लाखपर्यंत गुंतवणूक आवश्यक असेल, परंतु कोणत्या प्रकारचे पुनर्वापर व्यवसाय असेल त्या अनुसार किंमतदेखील वाढू शकते हे तथ्य कोणीही नाकारणार नाही. या व्यतिरिक्त नोंदणी, परवाना व तुमच्या फर्मच्या इतर कागदपत्रांमध्ये खर्च करावे लागतील.

रिसायकलिंग व्यवसायात अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. जेणेकरुन आपण याचा विचार करुन नफा मिळवू शकू. आपण काही रीसायकलिंग व्यवसाय संधी पाहू.

अ‍ॅल्युमिनियमच्या कॅन रिसायकलिंग : अ‍ॅल्युमिनियम हा एक धातू आहे जो संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर पुनरनिर्मित केला जाते. यासाठी अ‍ॅल्युमिनियमचे कॅन, औद्योगिक ठिकाणी असलेला अल्युमिनियम कचरा आणि घरगुती कचरा पुनर्वापर करण्यासाठी एकत्र केला जाऊ शकतो. हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे.

बॅटरी रिसायकलिंग : बॅटरीला सिड बॅटरी, कार्बन बॅटरी, अल्कीन बॅटरी, एनआरएचएम बैटरी, एलसीडी बॅटरी, लिथियम आयन बॅटरी आणि झिंक एअर बॅटरी अश्या प्रकारच्या विविध अनेक भागात विभागले जाऊ शकते. ही चांगली बाजारपेठ आहे.

बांधकाम कचर्‍याचे पुनर्वापर : लाकडी, लोखंडी खिळे, स्क्रू, फरशा, जुन्या घरातील विद्युत तारा, जुने पाईप्स आणि इतर कोणत्याही प्रकारचा कचरा हा बांधकाम कचरा असतो. त्यांचे स्वतंत्रपणे पुनर्वापर देखील केले जाऊ शकते.

ई-कचरा पुनर्वापर व्यवसाय : सध्या ई-कचरा पुनर्वापर हा जागतिक स्तरावरचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या व्यवसायात खूप वाव आहे. यासाठी आपल्याला एक वेगळा सेटअप उभारावा लागेल, परंतु हा एक फायद्याचा व्यवसाय असेल.

टायर रिसायकलिंग : वाहनांमधून येणारे जुने टायर गोळा करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. कार आणि ट्रकचे टायर रबर, स्टील, कृत्रिम आणि नैसर्गिक तंतूंनी बनलेले आहेत आणि या सर्व सामग्रीचे पुनर्चक्रण करता येते.

मुलांचे वापरलेले कपडे : मुलांची उंची खूप लवकर वाढते, म्हणून या कारणास्तव त्यांचे कपडे लवकर वापरातून बाद ठरतात. आपण हे कपडे लोकांकडून विकत घेऊ शकता त्यावर योग्य प्रक्रिया करून खेळणी तयार करू शकता.

जुन्या लाकडाचे पुनर्चक्रण करणे (वुड रिसायकलिंगचा) व्यापार : जुने फर्निचर, बांधकाम कचरा, लाकूड छाटणी अशा वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आपल्या व्यवसायासाठी कचरा लाकूड मिळू शकतो. आपण त्याची पुनर्प्रक्रिया करून चांगले पैसेदेखील कमवू शकता.

कचरा पुनर्चक्रण : हा एक पुनर्वापराचा व्यवसाय आहे जो इतर कोणत्याही पुनर्वापराच्या व्यवसाय कल्पनांपेक्षा कमी खर्चावर सुरू केला जाऊ शकतो. यासाठी आपण घरे व इतर सार्वजनिक ठिकाणांहून कचरा गोळा करू शकता आणि त्यावर प्रक्रिया करू शकता आणि नफा कमावू शकता.

वेस्ट कलेक्शन सेंटर (टाकावू वस्तूंचे संग्रहण व विक्री) : यात सर्व प्रकारचे टाकाऊ घटक एकत्र करून आपण ते विविध पुनर्वापर व्यावसायिकांना पुरवण्याचा व्यवसाय उभा करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची जुना रद्दी, सामग्री, जुने टाकाऊ साहित्य विकत घेणे व त्यास योग्य ठिकाणी विकणे हा व्यवसायही आजच्या काळामध्ये फायदेशीर आहे.

कार रिसायकलिंग : आपण जुन्या कारमधून बर्‍याच समान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुनर्वापराची विक्री करू शकता. जगभरात या व्यवसायाला मोठी मागणी आहे. जुन्या वस्तूंचे नूतनीकरणसुद्धा होते.

पॅकेजिंग मटेरियल रिसायकलिंग : ही एक खूप चांगली आणि मोठी उद्योग संधी आहे. आजकाल वाढत्या ऑनलाइन व्यवसायामुळे प्रत्येक वस्तू ग्राहकाला पोचवण्यासाठी पॅकेजिंगची आवश्यकता असते. बहुतांश घरात ऑनलाईन शॉपिंगद्वारे मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग मटेरियल जमा होते.

आपण ते कचर्‍यात टाकतो, परंतु योग्य पद्धतीने त्याचे रिसायकलिंग झाले तर खूप मोठा वाव आहे. एकदा ही पॅकेजिंग सामग्री रीसायकल झाली की आपल्या पृथ्वीवर वाढणार्‍या कचर्‍यापासून मुक्तता मिळेल.

पुठ्ठा बॉक्स किंवा पुठ्ठा पुनर्चक्रण व्यवसाय : या व्यवसायात आपल्याला जुना वापरलेला पुठ्ठा गोळा करावा लागेल आणि त्यांचे रिसायकल करून आणि वापरण्या योग्य बनवावे लागेल. यात काही शंका नाही की हा व्यवसाय एक फायदेशीर व्यवसाय आहे आणि तो स्थापित करण्यासाठी आपल्याला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. हा मध्यम गुंतवणूकीचा व्यवसाय आहे.

पॉलिथिन मटेरियल रिसायकलिंग : पॉलिथीन ही अशी एक वस्तू आहे जी संपूर्ण निसर्गाच्या प्रदूषणास कारणीभूत आहे. पॉलिथिनमुळे अनेक मुक्या जनावरांचा जीव आज धोक्यात आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, पॉलिथीनचे पुनर्चक्रण करणे हा एक अतिशय यशस्वी व्यवसाय आहे, ज्यामध्ये जुना पॉलिथीन वितळवला जातो आणि एका नवीन रूपात रुपांतरित केला जातो.

दूषित पाण्याची पुनर्प्रक्रिया : दूषित पाणीदेखील पुनर्चक्रण करून पुन्हा वापरात आणले जाऊ शकते. विविध मशीन पाण्याचे रिसायकल करण्यासाठी वापरली जातात. ज्या भागात पाण्याची कमतरता आहे अशा भागात हा व्यवसाय एक यशस्वी व्यवसाय आहे.

आपण या व्यवसायांद्वारे जुन्या गोष्टींचे पुनर्चक्रण करू शकता आणि त्या पुन्हा वापरण्यायोग्य बनवू शकता आणि त्याच वेळी आपण निसर्गाचा ढळणार समतोलही सावरू शकता. अशाप्रकारे या व्यवसायाच्या माध्यमातून, आपल्याला पर्यावरण संरक्षणामध्येदेखील एक महत्त्वपूर्ण स्थान असेल.

आजच्या काळामध्ये आपण यापैकी कोणताही व्यवसाय निवडल्यास आपल्या व्यवसायात नक्कीच नफा होईल, परंतु यासाठी प्रथम आपल्याला या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती मिळवावी लागेल आणि योग्य प्रशिक्षण आणि सेटअप नंतरच आपण हा व्यवसाय सुरू करावा.

केवळ भारतातच नव्हे तर सर्व देशांमध्ये पुनर्वापराचा व्यवसाय वेगाने वाढत आहे, कारण भविष्यात या कारणास्तव मानव जातीचे अस्तित्व धोक्यात आहे. आज बर्‍याच कंपन्या या क्षेत्रात कोट्यवधी रुपये कमवत आहेत. यासाठी गुंतवणूकदेखील खूप कमी लागते.

भविष्याचा आणि दूरदृष्टीने विचार करून व्यवसाय निवड करायची असेल तर रिसायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. पुनर्वापर व्यवसाय संपूर्ण जगात चांगला वाढत आहे, म्हणून या व्यवसायात गुंतवणूक करणे सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?