पर्यटन उद्योग कसा सुरू करावा?

फिरणे फक्त आवड नाही तर एक उत्तम प्रोफेशन आहे. इच्छेला ध्यासाचे विलेपन मिळाले तर निर्माण होतो दिशेला आकार ह्याच स्वप्नांना ध्येयाचे क्षितिज लाभले तर तयार होतो उद्योगाचा आभास जर बोथट करायची असेल ह्या वास्तववादी उद्योगांची धार आणि पैश्याच्या स्पर्धेचा मार तर सुरु करायला हवा मनाला सुखावणारा प्रवास.. आणि ह्याच प्रवासाला इच्छेने स्वीकृत केले तर निर्माण होतो पर्यटन क्षेत्रात औद्योगिक अविष्कार.

मनाला हिंडायची, फिरायची, पळायची नेहमीच आवड असते. लहान असो वा वृद्ध सर्वांसाठी सुट्टी नेहमीच हक्काची परवणी असते, म्हणून तर बोलतात ना..दिल तो बच्चा हैं जी!.. अशाच मानसिकतेतून जन्म होतो प्रवासाचा आणि प्रवासावर निर्मित उद्योगधंद्यांचा… पर्यटन ह्या उद्योगाचा.

प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनशैलीचा, ताणाचा त्रास होतचं असतो. अशाच त्रासाला पर्यटनाच्या माध्यमातून सुखाची, कौटुंबिक आनंदाची झालर लावली जाते. म्हणूनच मी हमखास सांगू शकते की पर्यटन म्हणजे इतर माध्यमांतून, विशेषत: उद्योजकांवर उद्योगातून आलेल्या ताणावर प्रेमाची, आनंदाची आणि आपुलकीची फुंकर.

फुल टाईम असो वा पार्ट टाईम पर्यटन क्षेत्रात कधीच मावळती संध्याकाळ नसते तर सर्वांसाठी नेहमी आकांक्षेचा आणि संधीचा उगवता सूर्य आशेचे किरण घेवून येतो.

पर्यटन क्षेत्रात आवश्यक प्राथमिक गुण आणि विशेषता :

 • उच्च इक्यू (एट) : ही ट्रावेल आणि ट्युरिझम इंडस्ट्री त्या लोकांसाठी जास्त योग्य आहे ज्यांचा एोींळेपरश्र र्टीेींळशपीं (एट) उच्च आहे. खट जरी बेताचा असला तरी चालेल, पण एट उच्च हवा तरचं तुम्ही संवेदनशील होऊन तत्पर लोकांच्या गरजा समजून, योग्य असे ट्युर सुचित करू शकतात.
 • पर्यटन क्षेत्रात प्राथमिक, भौगोलिक परिस्थिती, वातावरण, देश, राज्ये, शहरे, चलन, ऐतिहासिक स्थळे ह्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
 • या उद्योगात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा उद्योग नेहमी आल्हाददायक, सकारात्मक, आनंदी, हरहुन्नरी, आशावादी विचारसरणीचा आहे. त्यामुळे या उद्योगात आळसाला, शिथिलतेला कसलाच वाव नाही. जर तुम्ही आनंदी असाल, मानसिकदृष्ट्या सकारात्मक व मदतशील असालं, तरचं तुम्ही लोकांना परदेशाची किंवा स्थळांची स्वप्न विकू शकतात.
 • या उद्योगात वेग महत्त्वाचा असतो. हा उद्योग शांत राहून सखोल विश्लेषण करण्याचा नाही. या उद्योगात गरज असते जलद, वेगवान राहून उत्तम आणि त्त्वरीत निर्णय घेण्याची. उत्तेजना या उद्योगाची मूलभूत चेतना आहे.
 • या उद्योगाचा मुख्य श्वास आहे तो म्हणजे लवचिकता, टीमवर्क आणि समाजशीलता.

वरील गुण किंवा विचारसरणी तुमची असेल तर नक्कीच तुम्ही पर्यटन क्षेत्रात यश मिळवू शकतात.

पर्यटन उद्योग कसा सुरू करावा?

पर्यटन उद्योग सुरू करताना खालीलपैकी तुम्ही कोणताही मार्ग निवडू शकता आणि स्वत:चा पर्यटन उद्योग सुरू करू शकतात.

प्रकार १ : घरगुती पर्यटन एजंसी

सर्वात सोप्पा आणि कमी खर्चिक मार्ग म्हणजे घरगुती किंवा घर बसल्या पर्यटन क्षेत्राची एजन्सी सुरू करणे. ज्यांना घर बसल्या किंवा पार्ट टाईम उद्योग करण्याची इच्छा असते, विशेषत: गृहिणी महिला किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. नगण्य भांडवलात तुम्ही हा उद्योग सुरू करु शकता. यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत,

 • संपर्क क्रमांक/मोबाईल, इंटरनेट आणि कंप्यूटर/लॅपटॉप
 • पर्यटन क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी सलोख्याचे नातेसंबंध
 • लोकांचा डाटाबेस किंवा संपर्क
 • स्वत:ची टार्गेटशीट आणि पर्यटन क्षेत्राची प्राथमिक माहिती.
 • मार्केटिंग आणि सेल्सची साधने.

प्रकार २ : ट्रावेल फ्रांचाईझी

सर्वात सुरक्षित आणि शाश्वत प्रकार म्हणजे पर्यटन क्षेत्रातील कंपनीची फ्रांचाईझी घेऊन उद्योग सुरू करणे. त्यामध्ये तुम्हांला कंपनीचा लोगो, ब्रांड, मटेरिअर, जाहिरात आणि त्याचा दर्जा वापरायला मिळतो, यामुळे तुम्ही, तुमचे व्यक्तिमत्त्व आणि उद्योगाचे अस्तित्व टिकवू आणि वाढवू शकता. यासाठी खालील गोष्टी जाणून घ्याव्यात.

 • पर्यटन क्षेत्राविषयी प्राथमिक माहिती.
 • तुमच्या गरजांचे विश्लेषण आणि त्या पध्दतीने फ्रांचाझर- मालकिच्या कंपनीचा अभ्यास व योग्य निवड
 • फ्राचाईझी लायसेन्स/सर्टिफिकेट
 • फ्रांचाईझरचे मार्गदर्शन, ट्रेनिंग व सपोर्ट
 • मोक्याची जागा आणि मनुष्यबळ
 • मार्केटिंग व सेल्स आराखडा

प्रकार ३ : स्वत:ची ट्रावेल कंपनी

स्वत:चा ब्रांड मार्केटमध्ये निर्माण करून कंपनी सुरू करणे सर्वात कठीण असते. तुम्हाला बर्‍याच गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. त्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.

 • संपूर्ण देशांची, राज्याची व शहरांची तसेच त्यांच्या वेंडरची माहिती आणि संपर्क क्रमांक.
 • स्वत:च्या कंपनीचे ब्रांडिग, लोगो, कंपनी रेजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन आणि कायदेशीर तरतूद.
 • मार्केटिंग व सेल्स आराखडा
 • मनुष्यबळ, औद्योगिक संपर्क आणि डाटाबेस
 • स्वत:ची वेबसाईट व सोशल मिडियाचा वापर
 • खेळते भांडवल आणि बिझनेस प्लानिंग

या पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा पर्याय निवडून पर्यटन क्षेत्राचा व्यवसाय सुरू करू शकता. वरील तीन्ही पर्यायात सोप्पा आणि सुरक्षित पर्याय म्हणजे फ्रांचाईझी विकत घेऊन सुरक्षित उद्योग करणे.

ट्रावेल आणि ट्युरीझममध्ये कोणत्या सेवांचा समावेश असतो?

मुख्य सेवा :

 • कौटुंबिक टुर
 • हनिमून पॅकेज आणि डेस्टीनेशन वेडिंग
 • एफ आय टी व ग्रुप टुर
 • बिझिनेस / कोर्पोरेट / शैक्षणिक (एज्युकेशनल) टुर

इतर सेवा :

 • पासपोर्ट, विझा आणि टिकीट बुकिंग
 • हॉटेल बुकिंग आणि कार रेंटल
 • करन्सी आणि मनी ट्रान्सफर

पर्यटन उद्योग वैशिष्टे आणि फायदे :

 • GST चा रेट इतर उद्योगांहून कमी आहे.
 • हा उद्योग अगदी कमी पैशात सुरू करता येतो.
 • या उद्योगात मुख्य सेवा व इतर सेवांमधून चांगला नफा मिळू शकतो.
 • या उद्योगात कमीत कमी १०% ते ३५% पर्यंत चांगले प्रॉफिट रेशो आहेत.
 • हा उद्योग फुल टाईम किंवा पार्ट टाईम करु शकतो.

पर्यटन उद्योग ही अशी सुवर्ण किल्ली आहे की कोणत्याही उद्योगाला जोडून हा उद्योग यशस्वीरित्या करता येतो आणि नफा कमवू शकतो. म्हणून जर उद्योग क्षेत्रात पदार्पण करायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. फिरण्यासाठी जग थोडे नाही आणि फिरवण्यासाठी पर्यटनासाठी इतर कोणता चांगला पर्यायही नाही.

– अमृता गव्हाणकर-जोशी
संचालिका – ट्रॅव्हलोग्राफी व ट्राव्हेलोबिझ
८४२१८२८२८८

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?