Import-Export मध्ये फसवणुकीपासून कसे सावध राहावे?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आंतरराष्ट्रीय व्यापार करतेवेळी अनेक पैलू आपल्याला अभ्यासावे लागतात, तरच आपला व्यवसाय जोमाने विस्तारू लागतो. त्यापैकीच एक म्हणजे फसवेगिरी पासून सावधानता बाळगणे. व्यापारामध्ये आपण ज्या ग्राहकाशी व्यावसायिक हितसंबंध जोडू पाहतो, तोही आपल्याच सारखा माणूस आहे आणि स्वतःचा व्यावसायिक स्वार्थ साधण्यासाठीच आपल्याशी संधान सांधतो आहे.

असे म्हटले जाते, व्यक्ती तितक्या प्रकृती; हे निखालस सत्यही नाकारून चालणार नाही.. या जगात नानाविध स्वभावाची, प्रकारची माणसे वास करीत असतात आणि त्यांच्या एकूण जडणघडणीवर तेथील प्रदेशानुरूप संस्कृतीनुरूप संस्कार होत असतात आणि या सर्वाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यावसायिकतेवरही दिसून येतो.

व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर करताना आपला निर्यातदार म्हणून अशाच विविध प्रदेशातील ओळखीच्या अथवा संपूर्णपणे अनोळखी व्यक्तीबरोबर व्यावसायिक स्तरावर संबंध येतो. त्यावेळी आपली निर्यातदार म्हणून आणि त्याची आयातदार म्हणून व्यावसायिक नीतीमूल्ये समसमान असतीलच असे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही.

जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आंतरराष्ट्रीय व्यापारात सुसूत्रता आणण्यासाठी काही नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे नेमून दिली आहेत, त्यांचे पालन करणे प्रत्येक उद्योजकास अनिवार्यच आहे, परंतु आकडेवारी बघता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण व्यापाराच्या ५% व्यापार हे उद्धृत नियम व कायदयांची सपशेल पायमल्ली करून केले जातात हेही येथे नमूद करणे आवश्यक आहे.

अशा बहुतांश व्यवहारात अघोरी लालसेस बळी पडून फसगत निर्यातदाराचीच होते व पर्यायाने होणाऱ्या मनस्तापास व आर्थिक नुकसानास त्यास सामोरे जावे लागते. भारताच्या सद्यस्थितीतील निर्यात व्यवसायाचा विचार करता असे लक्षात येते की, आखाती देश (Gulf countries), श्रीलंका व मलेशिया या देशांशी होणाऱ्या व्यवहारांमध्ये भारतीय निर्यातदारांची अधिक प्रमाणात फसगत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा देशांतील ग्राहकांशी व्यवहार करताना अधिक सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

आता आपण जमेच्या बाजूचाही विचार करूया. जगातील ९५% व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापार नियमाच्या चाकोरीत राहूनच कायदेशीर मार्गाने केले जातात. याचा फायदा हा त्या व्यवहारात असलेल्या दोन्ही पक्षांना (निर्यातदार व आयातदार) होतो. तसेच उत्तम ग्राहकाभिमुखता जपली जाऊन अपेक्षित व्यवसायवृद्धीही साधता येते..

आपण निर्यातदार म्हणून व्यवसाय करताना निर्यातपूर्व कोणती खबरदारी घेणे अपेक्षित आहे पाहू.

१. उधारी / रोखीने कोणतेही आंतरराष्ट्रीय व्यवहार करू नयेत.
२. आगाऊ रक्कम देऊ करणाऱ्या आयातदार ग्राहकांशी व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे.
३. आयातदार ग्राहकाच्या परदेशातील व्यावसायिक अस्तित्वाबद्दल पूर्ण खात्री झाल्याशिवाय व्यवहारात शिरकाव करू नये.
४. आयातदार ग्राहकाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊनच त्याच्याबरोबरच्या व्यवहारास प्राधान्य द्यावे.
५. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित असलेल्या सर्व नियमांच्या चौकटीत राहूनच कायदेशीर मार्गाने व्यवहार पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य द्यावे.

योग्य माहितीच्या आधारे शक्य असल्यास स्वतः अथवा एखाद्या मान्यताप्राप्त अनुभवी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टींचा अभ्यास करून पूर्ण तयारीनिशी आंतरराष्ट्रीय व्यापार करणे केव्हाही हितकर ठरते. फक्त तारतम्य महत्त्वाचे!

– सौरभ दर्शने
निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार, मुंबई
संपर्क : ८१०४० ५५४८९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?