व्यक्तिमत्त्व विकास

आठवड्याला ५ मिनिटे वेगळे काही वाचल्याने होतात हे फायदे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


“मी नाही अभ्यास केला.”

“सर, मला अजिबात वेळ मिळाला नाही. दुपारचे जेवण मी चार पाच वाजता जेवतो. अभ्यास करायला वेळ कुठून काढू?”

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अजयचे म्हणणे खरे होते. आज बर्‍याच वेळा लघु उद्योजक दुपारी जेवत नाहीत किंवा दुपारचे जेवण संध्याकाळी करतात. मी माझ्या सगळ्या क्‍लायंट्सना आज काय अभ्यास केला? असा प्रश्न मध्ये मध्ये विचारत असतो. बहुतेक वेळा अजयसारखे उत्तर मिळायचे. फार कमी वेळा काही तरी वाचले किंवा युट्यूबवर बघितले असे उत्तर मिळायचे.

आपल्या सगळ्यांना वेळ नाही हे मान्य पण म्हणून आपण बर्‍याचशा महत्त्वाच्या आणि आवडीच्या गोष्टी करायचे थांबवले आहे. यात बदल व्हायला हवा. आज अनेक गोष्टी शिकणे सोपे आहे आणि गरजेचेही आहे. ते कमी वेळात शक्यही आहे. शिक्षण म्हणजे पुस्तक वाचणे, रट्टा मारणे नाही. अभ्यासही एक मुलभूत गोष्ट आहे.

आठवतंय का पहा, जेव्हा पहिल्यांदा बाबा म्हणाला होतात, पहिले पाऊल टाकले होते, किती वेळ आणि परिश्रम घेतले होते. पण बाकी शब्द शिकताना आणि दुसरे पाऊल टाकताना कमी वेळ आणि कमी परिश्रम लागले होते. आता बहुतेक विषयाचा अभ्यास करणे म्हणजे दुसरे तिसरे पाऊल टाकण्यासारखे आहे. आता बहुतेक गोष्टींचा अभ्यास करणे कमी कष्टात आणि कमी वेळात शक्य आहे.

कसे? सांगतो. आपण आठवड्यात पाच मिनीटे वेळ काढला तर वर्षात २५० मिनिटे झाली. म्हणजे चार तास. आपण चार तास देवू शकतो? तर तसे नाही! आपण फक्त पाच मिनिटे देऊ.  चार तास आपणहून तयार होतात.

पाच मिनिटात काय अभ्यास होणार?  शंका बरोबर आहे. मी काही कंपन्यांमध्ये फक्त पाच मिनिटांची मिटींग घेतो. हेसुद्धा सुरुवातीला अशक्य वाटले होते. आता विश्वास बसला. तसेच ५ मिनिटात अभ्यास अशक्य वाटला तरी आरामात शक्य आहे.

कसा? सांगतो.

आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याची आधी यादी तयार करा. पहिल्या आठवड्यात फक्त यादी. यादी तयार करताना ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा नाही. आपण ती यादी नंतर पूर्ण करू शकतो. सुरुवातीला फक्त पाच विषय लिहून यादी बाजूला ठेवून द्या.

आता हे पाच विषय कुठले? ह्यातील पहिले तीन तुम्हाला आवडत असतील ते आणि रोज लागणारे म्हणजे, सेल्स किंवा जाहिराती, ह्युमन रिसोर्स वगैरे. नंतर दोन विषय तुम्हाला नावडणारे पण रोज लागणारे.

आता विषय ठरले. वेळ मिळाला. आता युट्यूबवर एक विषय टाकून त्याचा व्हीडीओ बघायचा. युट्यूब आपल्याला व्हिडिओचे डयुरेशन दाखवतो. आपण फक्त पाच मिनिटाचेच व्हिडिओ बघायचे. आणखी एक गोष्ट. व्हीडीओ बघून फक्त एका ओळीत आपण काय करणार ते लिहून टाकायचे. कुठे, कमेंटमध्ये नाही तर तुमच्या शेड्युलमध्ये.

आणखी एक सोर्स. बहुतेक मोठ्या कंपन्या त्यांच्या वेबसाईटवर खूप सुंदर माहिती देतात. ही माहितीसुद्धा आपण वाचून फक्त एका ओळीत आपण काय करणार ते लिहून टाकायचे, आपल्या शेड्युलमध्ये.

हे ज्यानी कुणी केले त्यांना वेगवेगळ्या अडचणीसुद्धा आल्या. उदाहरणार्थ, दर आठवड्याला ठरवलेली पाच मिनिटांची वेळ विसरून गेले. काळजी करत बसायची नाही. त्या आठवड्यात सुट्टी घेऊन टाकायची. किंवा दुसर्‍या दिवशी पाच मिनिटात काम करून टाकायचे.

अनेक वर्षे जिथे अंधार असतो, तिथे ऊजेड आला की अंधार त्या क्षणी नाहीसा होतो, तसेच आत्तापर्यंत वेळ नव्हता त्यामुळे राहिलेला अभ्यास आता पटापट संपून जाईल. जसा उंदीर थोडे थोडे करून डोंगर पोखरून बिळ करतो. आपणसुद्धा थोडे थोडे करून भरपूर अभ्यास करुया.

अभ्यास ज्यानी केला त्यांचा खूप फायदा झाला. त्यांचे बोलणे जास्त इंटरेस्ट घेऊन लोक ऐकू लागले. कमी वेळात ही मंडळी जास्त इफेक्टीव्ह बोलू लागले. कस्टमर आणि सहकारी यांना समजून घेणे आणि समजावणे सोपे झाले. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामुळे एकमेकांना पूरक विषय समजून घेणे सोपे झाले. मित्रहो, जग जवळ येत आहे आणि खूप माहिती रोज निर्माण होते आहे, बदलते आहे.

आपल्याला कुणाला हरवायला अभ्यास करायचा नाही, आपले आयुष्य सुंदर आहे ते सुंदर ठेवण्यासाठी अभ्यास करायचा आहे. त्यामुळे हा अभ्यास आनंदाने व्हायला हवा, कुठल्याही प्रकारचा त्रास घेऊन नाही.

आता काही मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना अभ्यास आवडतच नाही. अशा मंडळींना एक पर्याय म्हणजे आऊट सोर्स. आमच्या सारख्या अभ्यास आवडणार्‍यांना अभ्यास करायला द्या. दुसरा पर्याय म्हणजे अभ्यासाशी दोस्ती करून घ्या. अहो अभ्यास म्हणजे काय फक्त वाचत बसणे नाही. तुमच्या एखाद्या मित्राला फोन लावून त्याचे एखाद्या विषयावर मत घेणे हाही अभ्यासच आहे.

ज्यांना अभ्यास आवडत नाही त्यांनी अभ्यास करण्याची पद्धत बदलून बघा. आठवड्यातून एकदा ५ मिनिटे ठराविक विषयावर ठराविक मित्रांशी बोलून बघा आणि बोलल्यावर काय करणार ते शेड्यूलमध्ये लिहा.

बर्‍याच वेळा आपण ठराविक विषयाची निवड करतो. काही वेळा आपला ज्या विषयाशी संबंध नाही असे विषय अभ्यासासाठी निवडा.  त्यामुळे बरेच नवीन शिकायला मिळेल आणि मजा येईल. उदा मी स्वतः सध्या न्युरोलॉजीवर अभ्यास करत आहे. त्यामुळे मेंदू कसा काम करतो, आपले विचार म्हणजे काय, भावना म्हणजे काय हे समजले.  ह्याचा उपयोग मला लोकांना समजून घ्यायला होतो आहे.

मध्यंतरी ज्ञानेश्वरी वाचली आणि स्वतःला शांत आणि आनंदी करण्यात मदत मिळाली. एखादी गोष्ट, कविता, ओवी, वाक्य तुमचे आयुष्य बदलून टाकू शकेल. एखाद्या शास्त्रज्ञाने सांगितलेले देवाविषयीचे मत एखाद्या पुढार्‍याने सांगितलेली माहिती, एखाद्या नटाने सांगितलेले मॅनेजमेंटवरचे विचार हेसुद्धा आपल्याला खूप काही सांगून जाते.

एका क्लायंटकडे जागेची खूप टंचाई होती. खूप विचार करून काही गोष्टी झाल्या पण आणखी काही करण्याची गरज होती. मी आणि त्या कंपनीचा जनरल मॅनेजर जेवून थोडे बाहेर पडलो आणि समोर पानवाला बघून हे जागेचे कोडे सुटले. पानवाल्याने इंच इंच जागा वापरली होती, आम्हाला मीटर मीटर जागा वापरायची होती.

हा अभ्यास पुस्तकाशिवाय युट्यूबशिवाय, न ठरवता अगदी सहज आणि काही मिनिटांत झाला होता. म्हणून मित्रानो, अभ्यास करायला सुरुवात करूया. काही अडचण आली तर मी आहेच. मग आता काय म्हणायचे? मी नाही अभ्यास केला. नाही नाही. आता म्हणायचे, मी थोडा थोडा अभ्यास केला.

– महेश साठे
(लेखक हे एक उद्योग सल्लागार आहेत)
९४२२६८२८१४


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!