Advertisement
उद्योगोपयोगी

आपल्या योग्य ग्राहकांना टार्गेट कसे करायचे?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


एखादं उत्पादन योग्य लोकांपर्यंत पोहचलं तरच त्याची जास्तीत जास्त विक्री होऊ शकते. मग या योग्य लोकांपर्यंत आपलं उत्पादन नेमकं पोहचवायच कसं?

हे दोन गोष्टींमार्फत होऊ शकतं –

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. आपले ग्राहक नेमके कोण आहेत हे जाणून घेणे.
२. ग्राहकांसारखा विचार करणे.

आपले ग्राहक नेमके कोण हे ओळखण्यासाठी काय करावे हे पाहूया.

पहिली पायरी : आपले ग्राहक कोण आहेत?

सर्वात आधी आपले संभाव्य ग्राहक नेमके कोण आहेत याचा विचार करूया. ते कोणत्या वयाचे आहेत, महिला आहेत का पुरुष आहेत, कोणती भाषा वापरतात अशा जितक्या सुचतील तितक्या गोष्टींचा विचार करावा व ते लिहून काढावे.

दुसरी पायरी : आपले ग्राहक कुठे आहेत?

आपले ग्राहक कोण आहेत हे समजल्यावर ते कुठे आहेत याचा विचार करावा. मुंबईत रहातात का पुण्यात, नाशिक का नागपूरला राहतात, महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही राहतात का याचा विचार करून ते लिहून काढावे.

तिसरी पायरी : आपले ग्राहक काय करतात?

ते कुठे आहेत हे आपल्याला माहीत झाल्यावर ते विद्यार्थी आहेत का कर्मचारी आहेत का उद्योजक आहेत की गृहिणी आहेत का निवृत्त झालेले आहेत हे पहावे. यातील दोन किंवा तीन किंवा सगळे गटसुद्धा आपले ग्राहक असू शकतात. उदा. पार्लेजी बिस्कीट हे सगळेच लोक खातात.

चौथी पायरी : आपले ग्राहक होण्यासाठी त्यांची क्रयशक्ती काय हवी?

आपलं उत्पादन कोणत्या प्रकारचं आहे यानुसार ते विकत घेण्यासाठी आपल्या ग्राहकाने किती पैसे कमवणं गरजेचं आहे हे काढावे. उदा. आपण जर ब्रॅण्डेड कपडे विकत असू तर आपल्या ग्राहकांची मासिक कमाई किती असावी, ज्यातून ते आपल्याकडून कपडे घेऊ शकतील, आपण गाडी विकत असू तर दर वर्षाला आपल्या संभाव्य ग्राहकाने किती कमवायला हवेत ज्याने ते पूर्ण पेमेंट किंवा ई.एम.आय. भरू शकतील, इत्यादी.

पाचवी पायरी : त्यांना कशात रस असू शकतो?

वरील चार गोष्टी लिहून काढल्यावर त्यांचा एकत्रित अभ्यास केला तर आपल्याला समजेल की आपल्या संभाव्य ग्राहकांना साधारणपणे कोणत्या गोष्टींत रस आहे. या गोष्टींची एक यादी बनवावी.

आपले ग्राहक नेमके कोण आहेत हे आपण आता जाणतो. त्यांच्या परिस्थितीनुसार ते कसे वागतील याचाही आपण अंदाज बांधला. आता त्यांना आणखी उत्तमरीत्या जाणण्यासाठी आपण जर ग्राहक असतो तर कसा विचार केला असता हे काढूया.

आपण जाहिराती कुठे कुठे बघतो?

आपण रोजच्या जीवनात जाहिराती कुठे बघतो याची एक यादी काढावी. वर्तमानपत्रात असेल, टीव्ही वर असेल किंवा आणखी अनेक ठिकाणी असेल. याने ग्राहक कोणती जाहिरात कशी व किती बघतात याचा आपल्याला अंदाज येईल.

एखादी जाहिरात पाहिल्यापासून प्रत्यक्ष ते उत्पादन खरेदी करेपर्यंत आपण काय काय करतो, किती वेळ घेतो याचाही बारकाईने विचार करावा.

या सर्वामुळे आपण ग्राहकांना उत्तमोत्तम समजून घेऊ शकू. आपली जाहिरात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त योग्य लोकांपर्यंत पोहचेल व यामुळे आपला कन्व्हर्जन रेट अर्थात जितक्या लोकांपर्यंत जाहिरात पोहचली त्यातील किती लोकांनी खरेदी केली याचा आकडा वाढत जाईल.

– शैवाली बर्वे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!