व्यवसाय वाढवण्यासाठी ई-कॉमर्सचा वापर कसा करावा?

ई-कॉमर्स ही संकल्पना सध्या ग्राहकांच्या मनावर ठसली गेली आहे. कोणतीही सेवा किंवा वस्तू घ्यायची असल्यास ऑनलाइन मिळेल असे आपण सर्वत्र ऐकतो. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, झोमॅटो, ओला, ह्या कंपन्यांनी ई-कॉमर्स घराघरात पोहचवले.

जिथे सर्व वस्तू किंवा सेवा ऑनलाइन मिळवता येतात. त्याचे पैसेसुद्धा ऑनलाइनच भरावे लागते. ग्राहकाला मात्र कुठेही न जाता घरबसल्या सर्व गोष्टी मिळतात आणि विक्रेत्यालासुद्धा कुठे न जाता ऑनलाईन ऑर्डर्स मिळतात.

विक्रेत्याला आता ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी कुठे दुकान किंवा शोरूम उभे करायची गरज नाही. अशा या ई-कॉमर्सचा मी माझ्या व्यवसायात उपयोग करू शकतो का? हो नक्कीच करायलाच हवा, कारण ती ग्राहकांची गरज आहे. आता आपण त्याकरिता ई-कॉमर्स म्हणजे काय आणि त्याचा उपयोग मला माझ्या व्यवसायात कसा करून घेता येईल हे पाहू.

ई-कॉमर्स म्हणजे काय ?

इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इंटरनेट कॉमर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या ई-कॉमर्सचा अर्थ इंटरनेटद्वारे माल किंवा सेवा खरेदी आणि विक्री करणे. आणि असे व्यवहार करण्यासाठी पैसे आणि डेटा एक्सचेंज करणे. ई-कॉमर्स विविध प्रकारच्या फॉर्ममध्ये व्यवसाय आणि ग्राहकांमधील भिन्न ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप आणि या व्यवहाराचा भाग म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची देवाणघेवाण करणारी विविध फॉर्म घेऊ शकते.

ई कॉमर्स व्यवसायात चार मुख्य विभाग आहे.

  • व्यवसाय ते व्यवसाय (बी टु बी)
  • व्यवसाय-ते-ग्राहक (बी टु सी)
  • ग्राहक-ते-व्यवसाय (सी टु बी)
  • ग्राहक-ते-ग्राहक (सी टु सी)

ह्याचा अर्थ, मी एखादी सेवा आणि माल एखाद्या ऑनलाइन साईटवर ऑर्डर करणार आणि त्याचे पैसे ऑनलाइनच पाठवणार आणि ती सेवा अगर वस्तू/माल मला घरपोच मिळणार. ऑनलाइन फूड ऑर्डर असो, ट्रीवागोसारख्या वेबसाइटवरून हॉटेल बुकिंग असो, किंवा फ्लिपकार्टवरून मोबाईल ऑर्डर करणे असो. ग्राहक म्हणून मी जर ह्याचा उपयोग घेऊ शकतो तर विक्रेता किंवा व्यासायिक म्हणून का करू नये.

हे कसे करावे ?

मूलतः ई-कॉमर्सचे तीन भाग पडतात : माल / वस्तू / सेवांची माहिती, ऑर्डर व्यवस्थापन, पेमेंट.

स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट तयार करणे हे थोडे खर्चिक आहे. त्यामुळे आपण ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या माध्यमांचा वापर करूनसुद्धा करू शकतो. जसे माल / वस्तू / सेवांची माहिती आपण सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहचवू शकतो. आपल्या व्यवसायासाठी सोशल मीडियाचा वापर करा.

फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम ह्यासारख्या माध्यमांद्वारे आपल्या सेवेची अथवा मालाची जाहिरात करण्यास सुरुवात करा. त्याशिवाय सध्या सुरू असलेल्या ई-कॉमर्स वेबसाइटवर आपण विक्रेता म्हणून नोंदणी करा. त्यात आपले मालाचे किंवा सेवेचे सविस्तर वर्णन द्या. गूगलवर My Business Place ला रजिस्टर करा.

QR कोड तयार करा आणि सर्व ठिकाणी माध्यमांवर प्रसारित करा. Indiamart, Justdial ह्यासारख्या पोर्टल्सवर रजिस्टर करा आणि आपली ई कॉमर्स वेबसाइटची लिंक द्या. ऑर्डर व्यवस्थापनेसाठी फोन, ई-मेल, किंवा ऑनलाइन सॉफ्टवेअरसुद्धा आहेत (फुक्कट किंवा अगदी वाजवी किंमतीत उपलब्ध आहेत).

जाहिरातीसोबतच पेमेंट वॉलेट लिंक द्या जेणे करून ग्राहकांसाठी पेमेंट करणे सोईस्कर होईल. UPI, M-wallet, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग ह्या सर्वांचा उपयोग करा. पेमेंटच्या, मालाच्या, सेवेच्या नव्या नव्या योजना तयार करा आणि सोशल मीडियावर प्रसारित करा.

ह्याचे फायदे काय?

  • व्यावसायिकाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जागतिक बाजार पेठेत प्रवेश करता येतो. ह्याला भौगोलिक सीमा आणि आव्हाने नाहीत. ही प्रक्रिया विक्रेत्यांना जागतिक प्रेक्षकांना विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांना जागतिक निवड करण्यासाठी सक्षम करते.
  • थेट अंतिम ग्राहकांसोबत संवाद. ही प्रक्रिया विक्रेत्यांना ग्राहकांच्या जवळ येण्यास सक्षम करते ज्यामुळे उत्पादन क्षमता आणि परिपूर्ण स्पर्धा वाढते.
  • ई-कॉमर्स हे असे माध्यम आहे जे दिवसरात्र चालू असते. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय २४ तास कार्य करते जेणेकरून आपण आपला व्यवसाय चालू करता आणि कमाई करता.
  • ग्राहकांसाठी दुकानात जाणे, रांगेत उभे राहणे, कॅश पेमेंट करणे ह्यापेक्षा एका जागेरून ऑर्डर देणे सोईस्कर आहे म्हणून ग्राहक याकडे आकर्षित होतो.
  • ई-कॉमर्स व्यवसाय जगभरात केला जात आहे यामुळे आपल्या कंपनीची सद्भावना वाढवण्यात आणि आपल्याला अधिक नफा मिळवण्यासदेखील मदत होईल.

ई-कॉमर्स व्यवसायासाठी आपल्याला फक्त एक होस्टिंग सोल्यूशन आवश्यक आहे, जो आपल्याला काही क्षणांमध्ये साइनअप करेल. आपल्या होस्टिंग समाधानासह साइन अप केल्यानंतर आपण सहजपणे इंटरनेटवर आपले उत्पादन विकू शकता.

इंटरनेट आणि ई-कॉमर्स ही साधने व्यावसायिकाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यास नेहमी तयार असतात. त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून व्यवसाय समृद्ध व्हावे. आपण एक सज्ञान व्यावसायिक असल्यास, आपल्या सर्व साम्राज्याला वाढविण्याची संधी म्हणून हे सर्व फायदे पाहण्यासाठी दीर्घकाळ लागणार नाही.

– मयूर देशपांडे
(लेखक एक व्यवसाय विश्लेषक आहेत)
७७२१००५०५१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?