उद्योगोपयोगी

फेसबुक पेजचा प्रभावी उपयोग कसा करायचा?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपण फेसबुक या सोशल मीडियाचा आपल्या वाढीसाठी मूलभूत वापर कसा करावा हे पाहिले आहे. त्यात आपण डिजिटल मार्केटिंगसाठी फेसबुक का वापरावे, फेसबुक मार्केटिंगचे फायदे, फेसबुक खाते, ग्रुप, इव्हेन्ट, अॅप व फेसबुक पेजेस यांची माहिती करून घेतली.

प्रत्येक उद्योगासाठी ग्राहक वा प्रमोशनसाठी ‘फेसबुक पेज’ हेच अधिकृत माध्यम आहे आणि फेसबुक पेजवरून अधिकाधिक लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचणे शक्य होऊ शकते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

या लेखात आपण फेसबुकवरील आपल्या बिझनेस पेजवर दररोज काय काय अॅक्टिव्हिटी करू शकतो, जेणेकरून आपले बॅण्डिंग होईल व अधिकाधिक लोकांपर्यंत आपला उद्योग पोहोचू शकतो हे पाहणार आहोत.

वेबसाइटवर पेज बॉक्स असावा : कंपनी वेबसाइटवर फेसबुक पेजचा बॉक्स असावा, जेणेकरून वेबसाइटला भेट देणारे ग्राहक तुमच्याशी सतत जोडलेले राहण्यासाठी पेज लाइक करतील. तसेच फेसबुक पेजवरही कंपनी वेबसाइट दिलेली असावी म्हणजे पेजवरील ग्राहक तुमच्या वेबसाइटला भेट देतील आणि विक्री होण्याची शक्यता वाढेल.

हा फेसबुक पेज लाईक बॉक्सचा कोड तुम्हाला developer.facebook.com वर जाऊन तयार करावा लागतो. हा कोड तयार करताना दोन पर्याय उपलब्ध असतात की नुसते चेहरे दिसायचे आहेत का फेसबुक पोस्टही दिसायल्या हव्या आहेत.

तिथे तुम्ही हे दोन्ही पर्याय निवडा की लाईक केलेल्यांचे चेहरे आणि पोस्ट दोन्ही दिसावे. हा कोड तयार करणं तुम्हाला जमेलच असं नाही, मग तुम्ही तुमच्या वेबसाइट तयार करणार्याला सांगून हे जातीने करून घ्या. त्याने तुमच्या फेसबुकवरील तुमच्या वेबसाइटवरही दिसू लागतील.

ग्राहकाकडून शिफारस घ्यावी : फेसबुक पेजवर ग्राहकांना ’Testimonials’ आणि ’Reviews’ द्यायला उद्युक्त करावे. पेजमध्ये ’Reviews’ हा पर्याय उपलब्ध असतो. तेथे ग्राहक आपली शिफारस नोंदवू शकतात जी इतर ग्राहक वाचू शकतात. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी फेसबुक पेजचे यूआरएल दिलेले असावे व आम्हाला येथे Reviews द्या असे नमूद करा. यातील चांगल्या प्रतिक्रिया या वेबसाइटवरही नक्की घ्याव्यात. त्याने ग्राहकाचा सन्मान होतो.

ग्राहकोपयोगी माहिती देणे : तुमच्या बिझनेस पेजवरून तुम्ही जर फक्त स्वत:च्या प्रमोशनच्याच गोष्टी सतत देत असाल, तर ग्राहक कंटाळून तुमचे पेज ‘अनलाइक’ करतील. त्यामुळे तुमच्या उद्योग वा इंडस्ट्रीशी संबंधित आणि ग्राहकोपयोगी असलेल्या गोष्टींची माहिती पेजवरून जास्तीत जास्त द्यावी. यामुळे ग्राहकाला तुमचे पेज माहितीपूर्ण वाटेल आणि तो त्यामध्ये प्रतिक्रिया, लाइक इ. करून गुंतलेला राहील.

मजकूर प्रसारित करण्यापूर्वी आपण या आठवड्यात वा महिन्यात काय काय प्रसारित करणार आहोत आणि त्याचा ग्राहकावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो याची एक योजना तयार करावी. ज्यामध्ये ७५ टक्के ग्राहकोपयोगी पोस्ट्स आणि फक्त २५ टक्के तुमच्या व्यवसायाशी संबंधित पोस्ट्स असाव्यात.

ग्राहकाचा अभिप्राय मागा : आपल्या उत्पादन वा सेवेसंदर्भात ग्राहकाकडून अभिप्राय मागणार्या पोस्ट करा. त्यातून तुम्हाला तुमचा दर्जा वाढवता येईल व तुमचे उत्पादन वा सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करता येऊ शकेल. यासाठी काही ‘पोल’ अॅप्लिकेशन्सचीही मदत घेता येऊ शकेल. फेसबुक अॅप्लिकेशन सेंटरमध्ये तुम्हाला पोल अॅप्लिकेशन्स मिळू शकतात.

फेसबुक पेजचा ब्लॉगवरील प्रतिक्रियांसाठी उपयोग : आपल्या बिझनेस ब्लॉग/वेबसाइटवरील पोस्टच्या खाली या संदर्भातील चर्चा आपण फेसबुक पेजवर करू असे म्हणून सदर चर्चेची Embedded Link तेथे द्यावी. जेणेकरून फेसबुक पेजवर ग्राहकांमध्ये बिझनेस ब्लॉगबद्दल चांगली चर्चा घडवून आणता येऊ शकते किंवा ब्लॉगवरीच ‘कॉमेंट्स’ बंद करून त्याऐवजी फेसबुक कॉमेंट हे अॅप्लिकेशन ठेवा.

म्हणजे फेसबुकवर लॉगइन असलेली कोणतीही व्यक्ती तेथे प्रतिक्रिया देऊ शकेल आणि ती प्रतिक्रिया त्याच्या फेसबुक पेजवर ही दिसेल आणि आपसुकच तुमच्या ब्लॉग/वेबसाइटची लिंक त्याच्या फेसबुकवर शेअर होईल. याचा दुसरा फायदा म्हणजे ब्लॉग/वेबसाइटवर येणाऱ्या स्पॅम मेसेजेस्च्या त्रासापासून सुटका होईल.

पेज इनसाइट्स अभ्यासणे : आपल्या पेजवर आपण जे जे प्रसारित करत आहोत त्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहण्यासाठी ‘पेज इनसाइट्स’मध्ये जावे. त्यात आपल्याला ‘पोस्ट रीच’ कळू शकतो. ‘पोस्ट रीच’ म्हणजे आपली पोस्ट किती लोकांपर्यंत प्रसारित झाली. आपली पोस्ट पेज लाइक केलेल्यांपैकी किती लोकांपर्यंत पोहोचते त्याला ‘ऑरगॅनिक रीच’ म्हणतात.

या लोकांपैकी जे त्यावर लाइक, कॉमेंट अथवा शेअर करतात त्यांच्या मित्रयादीपर्यंत आपली पोस्ट पोहोचते अशा वाढीव रीचला ‘वायरल रीच’ म्हणतात आणि एखादी पोस्ट पैसे भरून ‘बुस्ट’ केली असता ती जितक्या लोकांपर्यंत पोहोचते त्याला ‘पेड रीच’ म्हणतात.

ग्राहक ऑनलाइन असल्यावरच पोस्ट करणे : फेसबुकवर तो ताजा मजकूर असतो तोच वॉलच्या वर दिसतो आणि जुना मजकूर खाली खाली जातो. त्यामुळे आपले अधिकाधिक ग्राहक कोणत्या वेळेत ऑनलाइन असतात याचा अभ्यास करून त्याच वेळेस पोस्ट करावे म्हणजे ती पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल.

‘पेज इनसाइट्स’मध्ये आपले ग्राहक ऑनलाइन कधी असतात हे नेमके कळू शकते. पेजवर दिवसाला कमीत कमी एक पोस्ट असावी आणि दोन पोस्टमधील अंतर हे दोन दिवसांहून जास्त असू नये.

कॉमेन्ट्सवर उत्तर देणे : ग्राहकाने आपल्या पेजवर काही कॉमेन्ट्स केली असता त्यावर प्रतिसाद द्यावा. त्याने कौतुक केले असेल तर किमान त्याला धन्यवाद म्हणावे अथवा तक्रार केली असेल तर त्याबद्दल क्षमा मागावी. याने ग्राहकाशी चांगले संबंध प्रस्थापित होतात. कॉमेंटवर प्रतिक्रिया देताना त्या व्यक्तीला त्यात ‘टॅग’ करावे, जेणेकरून त्याच्या मित्रपरिवारात तुमचे पेज पोहोचते आणि वायरल रीच वाढतो.

ग्राहकाच्या आवडत्या पोस्ट पुन्हा शेअर करा : पेज इनसाइट्समध्ये तुम्हाला कोणत्या पोस्ट ग्राहकांना जास्त पसंत पडल्या हे कळू शकते. अशा जुन्या झालेल्या पोस्ट तुम्ही पुन्हा पेजवर शेअर करू शकता. मात्र हेच सतत करू नका. फेसबुक पेजचा व्यवसायवाढीच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे अधिकाधिक उपयोग करता यावा आणि यातून तुमचा ग्राहक वर्ग वाढावा, तुमचे चांगले ऑनलाइन ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी वर सांगितलेल्या गोष्टींचा नक्की उपयोग करा.

– शैलेश राजपूत
९७७३३०१२९२


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!